Posts

Showing posts from January, 2009

अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि अश्वेत टी. व्ही. स्क्रीन!

मी कीर्ती सुपुत्रे. इ. ९ वी.
सध्या आमच्या वर्गात वार्षिक परीक्षेसाठी निबंधलेखनाचा सराव चालू आहे. आमच्या बाई म्हणतात की "नेहमीच्या ’दूरदर्शन : शाप की वरदान’, ’फलाटाचे आत्मवृत्त’, ’जिचे हाती पाळण्याची दोरी... ’ यांसारख्या हमखास येणाऱ्या विषयांव्यतिरिक्त - (त्याला आम्ही मैत्रिणी ’हमखास भेडसावणारे विषय’ म्हणतो! ) - तर त्यांव्यतिरिक्त चालू घडामोडींपैकी एखाद्या विषयावर पण निबंध लिहिता आला पाहिजे. " आला पाहिजे तर आला पाहिजे! पण आजच्या ’चालू घडामोडी’ या परीक्षेच्या वेळेपर्यंत ’घडून गेलेल्या घडामोडी’ नाही का होणार? मग आता केलेल्या सरावाचा काय उपयोग तेव्हा? आणि परीक्षेच्या वेळी ज्या घडामोडी चालू असतील त्यावर तेव्हा बिनसरावाचा निबंध कसा काय लिहायचा?
मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर बाईंनी आम्हाला "त्यासंदर्भात एकतरी निबंध येणारच" असं ठामपणे सांगितलंय. "पुढचे काही दिवस रोजचा पेपर वाचा, अग्रलेख वाचा, त्या विषयाची तयारी करून ठेवा" असंही त्या सांगत असतात. पण रोजच्या पेपरमध्ये त्याविषयी जास्त काही माहिती मिळतच नाही. ’कसाब आमचा नाही’ आणि ’तुमच्या देशातले अतिरेकी तळ उद्ध्व…

पु. ल. आणि आजकालची मुलं

स्त्री मासिकाच्या जुलै-२०१२च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.


----------------------------------------------------


लहानपणी शाळेत असताना जून महिन्यात नवीन वर्षाची पाठ्यपुस्तकं आणली की त्यातलं मराठी (बालभारती)चं पुस्तक मी सगळ्यात आधी अधाश्यासारखं वाचून काढायचे। इयत्ता सातवी किंवा आठवीत मराठीच्या पुस्तकात ’परोपकारी गंपू’ असा एक धडा होता. तो मला वाचल्यावाचल्याच अतिशय आवडला होता. आमच्या सुदैवानं तेव्हा शाळा-शिक्षकही चांगले होते. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरही बाई तो धडा केव्हा शिकवायला घेतील याची मी आतुरतेनं वाट पाहिल्याचं मला आजही चांगलं आठवतंय. ’पु. ल. देशपांडे’ या असामीशी ती माझी पहिली भेट होती. आमच्या अजून एका मोठ्या सुदैवानं त्या धड्याच्या सुरूवातीलाच कंसात एक टीप दिलेली होती की हा धडा पु. ल. देशपांडे लिखित ’व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातून घेतलेला आहे. वाचनालयातून ताबडतोब आणून तेही पुस्तक मी अधाश्यासारखं वाचून काढलं होतं...
त्याच्या पुढच्याच वर्षी (बहुतेक इयत्ता नववीत) ’अपूर्वाई’ पुस्तकातला एक उतारा धडा म्हणून होता. सविस्तर उत्तरे लिहा, संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, लेखकाचा दृष्टीकोन स्पष…

... गेला सूर्यास्त कुणीकडे!

"काय अप्रतिम आलाय फोटो!... रंग कसले सॉलिड दिसतायेत!... मावळत्या सूर्याचा केशरी गोळा बघ ना, काय छान वाटतो फोटोत...!... आणि त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब... " मी आनंदून म्हणाले।
यावर, माझ्या एकुलत्या एक श्रोत्याचा म्हणजे माझ्या मुलाचा चेहेरा कोराच! मला नाही म्हटलं तरी रागच आला। आदल्याच दिवशी मी काढलेला तो सूर्यास्ताचा फोटो इतका सुंदर आला होता पण जरा कौतुक होईल तर शप्पथ!
"मी काढलाय ना हा फोटो! नाहीच आवडणार तुला... तू काढलेल्या फोटोंचं मात्र मी अगदी तोंडभरून कौतुक करायचं... " मी जरा घुश्श्यातच त्याला म्हटलं.
पण पठ्ठ्या चेहेऱ्याच्या कोऱ्या कागज पे या फोटोच्या प्रशंसेचं नाम लिखायला काही तयार नव्हता। उलट मगाशी त्या कोऱ्या कागदावरच्या आडव्या ओळी तरी किमान दिसत होत्या, माझ्या या वाक्यानंतर त्या पण गायब झाल्या।
"छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंदच घेता येत नाही तुम्हाला... " मी माझी टेप पुढे सुरू ठेवली।
"आई, आजपर्यंत अश्याच किमान शंभर-दीडशे छोट्या गोष्टींचा आनंदही घेतलाय आणि कौतुकही केलंय, बरं का! " चेहेऱ्याच्या कोऱ्या कागदावर अखेर एक वाक्य खरडून तो तिथून उठून टी।…