Posts

Showing posts from March, 2010

दंगल

प्राजक्ता पुन्हा एकदा सायलीचा नंबर फिरवावा काय या विचारात होती. इतक्यात तिचाच फोन वाजला. कॉलर आयडी मुंबईचा नंबर दाखवत होता.
सायोचाच फोन असणार असं मनाशी म्हणत सोफ्यावर बसकण मारत तिनं रिसीव्हर उचलला.
"हॅलो..."
"हॅलो... हं, प्राजू, बोल, सायली बोलतेय. फोन केला होतास? निरोप मिळाला मला दिपककडून..."
"आहात कुठे नोमॅडिक नेमाडेबाई? सकाळपासून सारखा फोन लावायचा प्रयत्न करतेय. मगाशी तुझ्या रूमपार्टनरलाही करून बघितला. ती म्हणाली की तू अजून ऑफिसमधेच आहेस. शेवटी निरोप ठेवला तुझ्या त्या दिपकजवळ."
"ए, ‘तुझ्या’ दिपकजवळ काय? आमचा ऑफिस बॉय आहे तो. कशासाठी फोन करत होतीस?"
"घ्या! आज तुझा स्पेश्शल दिवस. म्हटलं तुला फोन करावा, गप्पा माराव्यात..."
"अर्र तिच्या! सॉरी, सॉरी, लक्षातच नाही आलं माझ्या."
"अगं सायो, काय हे! स्वतःचा वाढदिवसही विसरलीस? इतकी काय अगदी कामात गढलीयेस?"
"ए बाई, जरा बाहेरच्या जगात काय चाल्लंय ते पण बघत जा! टी.व्ही. लावलायस का सकाळपासून?"
"छे! मी तर सकाळपासून तुला फोन लावण्यातच बिझी आहे."
"प्राजू, आ…

गोरखगड ट्रेक

Image
दहा जानेवारीच्या रविवारी मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरातल्या काही जणांनी गोरखगडाचा ट्रेक करायचा ठरवला. त्याची कुणकुण लागताच गोरखगड खूष झाला. गोरखगड - मुरबाडपासून अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर उभा. मुरबाडहून निघाल्यावर म्हसे गावाकडे जाताना एका वळणानंतर अचानक समोर दिसणारा
डावीकडच्या आपल्या छोट्या भावाला, मच्छिंद्रगडाला सतत साथसोबत करणारा. पण या दोघांच्या शेजारीच सिध्दगड आणि त्याच्या मागे दमदम्या असे दोघं मल्ल उभे... त्यामुळे हे दोघं भाऊ त्यांच्यासमोर लांबून तसे खुजेच वाटत होते.
ट्रेकर्सपैकी काही मंडळींना ते पाहून मनात वाटूनही गेलं असेल की हॅत्तिच्या! इतकसंच तर चढायचं आहे! पण पायथ्याच्या देहरी गावातल्या रस्त्यावर उभे राहून आरामात चहा पिणार्‍या त्या तेवीस जणांपैकी काहींची अवस्था आणखी तासाभराने काय होणारे ते ओळखून गोरखगड त्यांच्याकडे बघून मनातल्यामनात हसत होता.
सव्वानऊला मंडळींनी चढायला सुरूवात केली. चढण फार कठीण नव्हती. ज्यांना नेहमीचा सराव होता अशी मंडळी झपाझप पुढे निघाली. हपापत, दमत, हळूहळू चढणार्‍या काहीजणांना मात्र आसपासची सुंदर दृश्यं बघण्याचीही सवड नव्हती.
तासाभरानंतर सर्वजण एका ठिकाणी थोड…