Posts

Showing posts from February, 2010

एका शर्टाची गोष्ट

नुकतीच एका लग्नाला जाऊन आले. लग्नासारखे समारंभ म्हणजे एकत्र भेटण्याचे, गप्पाटप्पा करण्याचे अगदी हुकुमी प्रसंग. अशा कुठल्याही समारंभाला हजेरी लावण्यामागे निदान माझं तरी हेच प्रमुख उद्दीष्ट असतं. एकाच ठिकाणी, एकाच वेळी अनेक नातेवाईक, सुहृद, मित्रमैत्रिणी भेटतात. सर्वजण बोलावल्यासरशी आले म्हणून यजमानही खूष असतात (निदान तसं दाखवतात) आणि याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे एक साग्रसंगीत जेवणाचं ताट आयतं पुढ्यात येतं! मला माहितीय, मनातल्या मनात सर्वांना हे कारण अगदी पुरेपूर पटलेलं आहे. विशेषतः दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघरातल्या ओट्याशी झुंजणार्‍या तमाम महिलावर्गाला... आणि काही अपवादात्मक पुरूषांनाही. (हो! आजकाल या रटरटत्या क्षेत्रात ही जमातही हळूहळू पाय रोवते आहे.)
तर असंच ते ही एक लग्न होतं. ‘लग्न’ नामक मोतीचुराचा हा लाडू खाऊन पस्तावलेले, पस्तावूनही काही उपयोग नसतो हे उमगलेले अनेकजण आपापसांत गप्पा मारण्यात, सुखदुःखाच्या गोष्टी करण्यात मग्न होते. पस्तावलेली इतकी माणसं आसपास असूनही डोळ्यांवर कातडं ओढून घेऊन त्या मोतीचुराच्या लाडूची चव घेण्यास आसुसलेलं त्यादिवशीचं ‘उत्सवमूर्ती’ जोडपं एकीकडे …

एक अविस्मरणीय दिवस : आय.एम.एस.विक्रांतच्या सहवासात

Image
नौदल सप्ताहाची जाहीरात वर्तमानपत्रात पाहिली आणि अंगात एकदम उत्साह संचारला. विक्रांत या आपल्या युध्दनौकेला भेट देण्याची माझी फारा वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता बळावली होती.
२८ नोव्हेंबर २००९ ते ६ डिसेंबर २००९ अशी (फक्त) आठ दिवस विक्रांत सर्वसामान्यांसाठी खुली राहणार होती. लग्गेच कॅलेंडर काढून सोयीचा २९ नोव्हेंबरचा रविवार मुक्रर करून टाकला. भेट द्यायची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी छापली होती. ‘सकाळी लवकरच तिथे पोचू, म्हणजे काही भानगडच नको’ असं म्हणून मी घरादाराला नवाच्या ठोक्यालाच बाहेर काढलं.
दरम्यान, विक्रांतला भेट देऊन आलेल्या काही जणांचं ब्लॉगरूपी लेखन नेटवर सापडलं. ते वाचून काढलं. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार सी.एस.टी.च्या टॅक्सीवाल्यांना ‘टायगर गेट’(विक्रांत जिथे नांगरून ठेवली आहे तिथे जाण्याचा नौदलाच्या ताब्यातला दरवाजा) सांगितलेलं पुरतं असं कळलं. पण तेवढा जाणकार टॅक्सीवाला नेमका आमच्या नशिबी नव्हता. त्यानं टॅक्सी बरोब्बर उलट दिशेला नेली. मग यू टर्न मारून काही ठिकाणी विचारत विचारत शेवटी ठीक ११ वाजता आमची वरात त्या टायगर गेट परिसरात पोचली. टॅक्सीतून उतरल्यावर समोर पह…