Posts

Showing posts from August, 2015

येऊरच्या जंगलात...

Image
अनुभवच्या जून-२०१५ अंकात प्रकाशित झालेला लेख. ----------
कुठल्याही हौशी, भटक्या ठाणेकरासमोर ‘येऊर’ हा शब्द उच्चारून बघा, त्याचे डोळे चमकतील. कारण तो किमान एकदा तरी येऊरच्या जंगलात फिरून आलेला असतो आणि त्या एका फेरीतच त्या जंगलाच्या प्रेमात पडलेला असतो.
येऊरचं हे जंगल म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाण्याकडील भाग. नकाशा पाहिलात, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उत्तर-दक्षिण पसरलेलं आहे. उत्तरेकडे वर्सोव्याची खाडी ते दक्षिणेकडे विहार तलाव असा त्याचा विस्तार आहे. त्याच्या पूर्वेकडे ठाणे शहर आणि मुलुंड-भांडुप ही मुंबईची मध्य उपनगरं येतात; तर पश्चि मेकडे दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव ही मुंबईची पश्चिेम उपनगरं येतात. म्हणजे मध्यात घनदाट जंगल आणि चहुबाजूंनी पसरलेली शहरं असं साधारण स्वरूप. या राष्ट्रीय उद्यानाला ‘मुंबईची फुफ्फुसं’ असं म्हटलं जातं ते याचमुळे.
हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांमध्ये ‘बोरिवली नॅशनल पार्क’ म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. बोरिवली का, तर राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठीचं मोठं प्रवेशद्वार, तिकीटखिडक्या बोरिवलीत आहेत. ‘लायन सफारी’, लहान मुलांची लाडकी ‘टॉय ट्रेन’, सुप्रसिद…