Posts

Showing posts from April, 2023

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

Image
 बंगलोरमध्ये राहणारी तरुण नायिका. दक्षिण भारतीय. तिचं कुटुंब आधुनिक विचारांचं आहे. कुटुंब म्हणजे आता फक्त वडील. आईने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली. आई मानसिक रुग्ण असते. त्यापायी अधूनमधून तिचं वागणं कधी अति मनस्वी, तर कधी पार तर्‍हेवाईक होत असतं. एरवी हे इतर चारचौघांसारखंच कुटुंब. सुट्ट्यांमध्ये ट्रिपला जाणारं, घरी पार्ट्या आयोजित करणारं, मित्रमंडळींना जेवायला बोलावणारं. सगळ्यात आईचाच पुढाकार. पण या पार्ट्या, ट्रिप्स सुरळीतपणे पूर्ण होतीलच याची शाश्वती नाही, त्याला कारणही आईचा आजार. वडील आणि मुलीला त्याची कल्पना असते. दोघं शक्यतो आईला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आईचा आजार आणि त्यांची कौटुंबिक वीण हे कादंबरीचं मुख्य कथानक नाही. या गोष्टी नायिकेच्या बालपणीच्या फ्लॅशबॅकमधून आपल्याला समजतात. मुख्य कथानक आहे ते Far Field, म्हणजे काश्मिर खोर्‍यातलं. नायिकेच्या लहानपणी त्यांच्या घरी एकदा काश्मिरी गालिचे, हस्तकला वस्तू वगैरे विकणारा एक विक्रेता येतो- बशीर अहमद. आईची बशीरशी ओळख वाढते. दुपारच्या वेळी तो दारावर आला की आई त्याला घरात घ्यायला लागते. त्याच्याशी ता