Posts

Showing posts with the label अनुभव

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ४

Image
दगडधोंडे, डोंगरकपारी - ३ ‘हर्मानसचं सरप्राइज पॅकेज’ असं मागच्या लेखात म्हटलं, कारण आमच्या Hermanus experience चा काही भाग दगडधोंडे कॅटेगरीत मोडणारा आहे. तर काही भाग nature trails कॅटेगरीत मोडणारा आहे. शिवाय ओंजळभर हर्मानस उरणारच आहे, जमलं तर त्यावरही लिहिणार आहे. केप टाऊनहून हर्मानसची day tour करणे v/s हर्मानसमध्ये निवांत मुक्काम करणे, हे म्हणजे टूरिस्ट आणि ट्रॅव्हलर यांच्यातला फरक सांगणारे forwards येतात त्यातला प्रकार आहे. (मी टूरिस्ट आणि ट्रॅव्हलरच्या अधेमध्ये कुठेतरी आहे, ट्रॅव्हलरच्या बाजूला जरा जास्त आहे.) सांगायचा मुद्दा असा, की द.आ.ला गेलात आणि दक्षिण किनारपट्टीवर customised भटकंती करणार असाल, तुमच्या यादीत हर्मानस असेल, तर एकवेळ हर्मानसहून केप ऑफ गुड होपला आणि केप पॉइंटला day tour करा, पण उलट करू नका. एकवेळ केप टाऊनमध्ये मुक्काम केला नाहीत तरी चालेल, पण हर्मानसचा भोज्जा करू नका. असो. तर आधी हर्मानसचे दगडधोंडे. हर्मानस हे लहानसं टाऊन असावं. आम्ही तिथला जेवढा भाग पाहिला त्यावरून तरी तसंच वाटलं. समुद्रकिनार्‍याला समांतर मुख्य रस्ता, रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला हॉटेल्स, द...

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३

Image
  गार्डन रूट – दगडधोंडे, डोंगर-कपारी : २ टूरचा नववा दिवस. हर्मानसचं सरप्राइज पॅकेज बॅगेत बांधून आम्ही Knysna ला पोहोचलो होतो. (उच्चार : नाय्ज्ना, ‘ज’ जहाजातला). हर्मानस ते नाय्ज्ना अंतर बरंच आहे. इतका कार प्रवास करण्याऐवजी आम्ही एक पर्याय शोधला. हर्मानसहून कॅबने उलटं केप टाऊनला आलो. (तास दीड तास प्रवास). केप टाऊनहून विमानाने George ला गेलो. (एक तास). जॉर्जहून कारने नाय्ज्नाला गेलो. (अर्धा तास). motion sickness वाल्यांना असे उलटे घास घ्यावे लागतात. असो. तर, नाय्ज्ना. हे एक टुमदार टाऊन आहे. नाय्ज्नात दुपारी १-२ वाजता पोहोचलो. रिपरिप पाऊस आणि प्रचंड गारठा होता. टाऊनचा काही रहिवासी भाग उंचावर वसलेला आहे. हे नुसतं टेकाड किंवा चढ नाही. याला तिथे ‘नाय्ज्ना हेड’ असं नाव आहे. तिथे अशी दोन हेड्स आहेत- east head आणि west head. दोन्हींच्या मधून नाय्ज्ना नदी समुद्राला मिळते. आमचा मुक्काम east head च्या अगदी हेडवरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये होता. (टूरमध्ये आम्ही बहुतेक ठिकाणी मोठी घरं converted into guest houses अशा ठिकाणी राहिलो. सगळीच घरं छान होती. आणि मुळात ‘घरं’ असल्यामुळे खोल्यां...

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

Image
  स्टॉकहोममधल्या आमच्या भटकंतीचा तो दुसरा दिवस होता. स्टॉकहोम, स्वीडनची राजधानी. सर्वच युरोपियन राजधान्यांच्या शहरांमध्ये इतकं काही बघण्यासारखं असतं की एक वारी कमीच पडते. त्यात कला, स्थापत्यशास्त्र, इतिहास, म्युझियम्स सगळ्यांतच रस असेल तर आणखीच धांदल उडू शकते. तुम्हाला केवळ भोज्यांना शिवायचं आहे, की निवांत आरामात फिरत एक-एक गोष्टी पहायच्या आहेत यावरही बरंच अवलंबून असतं. ज्याचा त्याचा आपापला पर्यटकी choice. आम्हाला निवांत फिरायचं होतं. अमुक इतक्या गोष्टी बघायच्याच आहेत असा आमचा आग्रह नव्हता. एखादं म्युझियम आवडलं तर तिथेच ३-४ तास घालवण्याची आमची तयारी होती. अचानक दिसलेली एखादी बाग छान वाटली तर अर्धा दिवस तिथेच घालवायलाही आमची हरकत नव्हती. स्टॉकहोममध्ये पाय ठेवल्यापासूनच तिथल्या भुयारी रेल्वे नेटवर्कच्या प्रेमात पडलो होतो. त्यामुळे ठिकाण कोणतंही असो, तिथे जाण्यासाठी भुयारी रेल्वे घ्यायचीच हे पक्कं होतं. तर त्यादिवशी तसंच मुक्कामाच्या ठिकाणापासून दोन ठिकाणी ट्रेन्स बदलून मध्य स्टॉकहोममध्ये अवतरलो. जमिनीखाली ४-५ मजल्यांवर शांतपणे इकडे-तिकडे धावणार्‍या state of the art trains, स्टॉकहो...