Posts

Showing posts from 2012

पुस्तक परिचय - ’आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.'

सध्या चाळीशीत किंवा पन्नाशीत असलेल्या पिढीला निरुपमा प्रधान या भारताच्या एक प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू होत्या हे कदाचित आठवत असेल. काही अपवाद वगळता (खासकरून क्रिकेट) आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेले आपले खेळाडू नंतर काय करतात, कुठे जातात याबद्दल आपल्याला फारसे ठाऊक नसते. त्याबद्दल जाणून घेण्याचा आपण विशेष प्रयत्नही करत नाही. या अनुषंगाने ‘आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.’ हे पुस्तक म्हणजे निरुपमा प्रधान यांनी बॅडमिंटन कारकीर्दीला निरोप दिल्यानंतरच्या त्यांच्या आयुष्याचा दीर्घ असा लेखाजोखा म्हणता येईल, जो त्यांनी स्वतःच्या शब्दांमधे वाचकांसमोर मांडलेला आहे. शीर्षकावरून सूचित होते, त्यानुसार जर्मनीतील तीस-पस्तीस वर्षांच्या वास्तव्याचे हे अनुभवकथन आहे. अतुल सोनाळकर यांच्याशी लग्न करून १९६८ साली निरुपमा प्रधान यांनी जर्मनीत (तेव्हाचा पश्चिम जर्मनी) पाऊल ठेवले. जास्तीत जास्त दीड ते दोन वर्षे तिथे रहायचे आहे या तयारीने त्या तिथे गेल्या होत्या. पण त्यांचे तिथले वास्तव्य वाढत गेले आणि पुढील पस्तीस वर्षे त्या तिथल्या मातीत जणू रुजूनच गेल्या. त्यांचा संसार, दोन्ही मुलांचे जन्म, त्य

पुस्तक परीचय - ’सोन्याच्या धुराचे ठसके’

पूर्णपणे भिन्न भाषेशी, संस्कृतीशी, जीवनमानाशी काही कारणाने संबंध आला, तर त्याची तुलना आपल्या स्वतःच्या राहणीमानाशी, संस्कृतीशी करणे, दोन्हींतली साम्यस्थळे शोधणे, विरोधाभासांवर बोट ठेवणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी आठ-पंधरा दिवसांची परदेशी सहल केली, तरी प्रत्येकाच्या मनात अशा तौलनिक निरीक्षणांचा भरपूर साठा जमा होतो. मग काहीजण त्याला प्रकट रूप देतात, गप्पांचे फड रंगवून आपले अनुभवरूपी किस्से इतरांना सांगतात. त्या सहल-संचिताचा जीव तेवढाच असतो. पण जेव्हा पोटापाण्यासाठी प्रदीर्घ काळ परदेशात वास्तव्य करण्याची वेळ येते, तेव्हा परक्या संस्कृतीशी जुळवून घेतानाच्या अपरिहार्यतेतून झालेली सुरूवातीची ओढाताण, स्वतःला त्या मुशीत जाणीवपूर्वक घडवत जाण्याचा हळूहळू झालेला सराव आणि त्या ओघात व्यक्तीमत्त्व आणि वयोमान या दोहोंपरत्त्वे स्वतःशीच नोंदली गेलेली विविध निरीक्षणे ही नुसती निरीक्षणे न राहता सखोल आणि अभ्यासू चिंतनाची डूब घेत मनाचा तळ गाठतात. ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ हे डॉ. उज्ज्वला दळवी यांनी केलेले असेच एक प्रकारचे सखोल आणि अभ्यासू चिंतन आहे. हे चिंतन जगासमोर आणताना त्याचे स्वरूप तितक

नाते : भक्तीचे आणि मातीचे

मायबोली गणेशोत्सव-२०१२ साठी लिहिलेला  लेख --------------------------------------------------------------------- गणपती आले. आता दहा दिवस सगळीकडे मंगलमय वातावरण असेल. "गणपती बाप्पा मोरया" च्या गजराने अवघा आसमंत दुमदुमून जाईल. भक्तीरसाला उधाण येईल. गणेशोत्सवाशी संबंधित काहीही लिहायचे झाले, तर त्याची सुरूवात अशीच करायची पध्दत आहे. पण multitaskingच्या जमान्यात केवळ भक्ती एके भक्ती करून भागत नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेशभक्तीशिवाय इतर अनेक गोष्टी कराव्या लागतात. भर रस्त्यांत मांडव उभे करावे लागतात; मांडवाच्या अलिकडच्या-पलिकडच्या शंभर मीटरच्या परिसरात दिव्यांची रोषणाई करावी लागते; त्यासाठी राजरोस वीजचोरी करावी लागते; रोषणाईत उजळून निघतील असे स्थानिक राजकारण्यांचे चेहरे असलेले मोठाले फ्लेक्स टांगावे लागतात; परिसरातल्या नागरिकांकडून वर्गणी उकळावी लागते; त्याबदल्यात दहा दिवस लाऊड-स्पीकरवर आरत्या, भक्तीगीतं आणि अभक्तीगीतं जोरजोरात वाजवून त्यांना जेरीस आणावे लागते. यंदा तर दर्शनाला येणार्‍या भक्तांच्या पेहरावाकडे लक्ष ठेवण्याच्या कामाचा अतिरिक्त

सर्वोकृष्ट `रिअ‍ॅलिटी शो’

महिलांच्या पळण्याच्या कुठल्यातरी शर्यतीची (बहुतेक ४०० मीटर्स) एक प्राथमिक फेरी चालू होती. शर्यत सुरू होताच प्रेक्षकांचा सुरू झालेला गोंगाट हळूहळू वाढत गेला. स्पर्धक महिलांनी एक एक करून अंतिम रेषा ओलांडली. एकमेकींचं अभिनंदन केलं. ज्यांनी पात्रता निकष पूर्ण केले होते त्यांना कॅमेरावाल्यांनी घेराव घातला. शर्यत पूर्ण होताच प्रेक्षकांचा टिपेला पोहोचलेला टाळ्यांचा गजर थोडासा कमी झाला आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू झाला. आधी वाटलं, प्राथमिक फेरीतच एखादं रेकॉर्ड वगैरे मोडलं गेलं की काय; ते प्रेक्षकांच्या उशीराने लक्षात आलं की काय. पण नाही. कारण निराळंच होतं. शर्यत पूर्ण केलेल्या, थकल्या-भागल्या, कॅमेर्‍याला किंवा प्रेक्षकांना अभिवादन करणार्‍या धावपटूंवरून कॅमेरा एकदम पॅन झाला आणि पुन्हा एकदा ट्रॅकवर स्थिरावला. प्रथम तिथे कुणीच नजरेस पडलं नाही. नक्की काय प्रकार चाललाय--असं मनात येईपर्यंत ट्रॅकवरून धावणारी एक आकृती दिसली. कॅमेरा हळूहळू झूम-इन होत गेला आणि लक्षात आलं, की अजून एका धावपटूची शर्यत पूर्ण व्हायची होती. जरा आश्चर्यच वाटलं आधी. Faster, Higher, Stronger या शब्दांना लाजवेल अशा ऑलिंप

...अनुभवू हा वैविध्यसोहळा

मायबोली डॉट कॉम तर्फे महिला दिनानिमित्त  लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख परिसंवाद विशेषांक  प्रकाशित करण्यात आला. त्या विशेषांकातला हा माझा लेख. मूळ लेख इथे  वाचता येईल. ------------------------- मी कॉलेजमधे असतानाची गोष्ट. ग्रूपमधली आमची एक मैत्रीण होती. हुशार, उत्साही, भरपूर बडबडी, जराशी टॉमबॉयिश. तिच्या बोलण्यात कायम एका मुलाचा उल्लेख यायचा. तो आमच्याच वयाचा, पण आमच्या कॉलेजमधला नव्हता. कौटुंबीक मैत्री किंवा दोघांचेही वडील बिझिनेस पार्टनर अशा कुठल्याशा कारणामुळे लहानपणापासून ते दोघं एकमेकांना चांगले ओळखत होते. आमची त्याच्याशी केवळ तोंडओळख होती, पण त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री होती, हे आम्हांला पदोपदी जाणवत असे. परीक्षेचा अभ्यास असो, सुट्टीतले कार्यक्रम असोत, इतर काही मौजमजा अथवा अडीअडचणी असोत किंवा एखाद्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असो, त्यांच्या एकमेकांशी सल्लामसलत-गप्पा-गुजगोष्टी या ठरलेल्या असायच्या. बरं, ती त्याला सोडून आमच्यात मिसळायची नाही म्हणावं, तर तेही नाही. ग्रूपच्या धमाल मस्तीत कायम हजर असायची, कॉलेजच्या सगळ्या उपक्रमांमध्येही पुढे असायची. हे कॉलेज सोडून त्या

घरोघरी मातीच्या चुली - 3

घरोघरी मातीच्या चुली - 1 घरोघरी मातीच्या चुली - 2 ---------- "ए, जरा मुलांकडे बघशील ना दुपारी? माझी ब्यूटिशियन येणारे घरी." "पुन्हाऽऽ?" "ओरडायला काय झालं इतकं?" "अगं, पंधरा-वीस दिवसांपूर्वीच आली होती ना?" "छे! महिना होत आला." "अगं, पण मग इतक्यात पुन्हा?" "हो, मग! असंच जाणार आहोत का आपण?? बरं दिसेल का ते?" "कुठे जाणार आहोत? आणि आपणऽऽ?? म्हणजे मी पण??" "(जरासा त्रासिक चेहरा करत) ओरडत जाऊ नकोस रे साध्या साध्या गोष्टींत..." "पण जायचंय कुठे?" "अरे, गेला आठवडाभर नाही का मी त्या डान्सच्या प्रॅक्टिसला जात होते..." "(हायसं वाटून) अच्छा, तो कार्यक्रम आहे होय." "शी! कार्यक्रम काय म्हणतोस त्यालाऽऽ!" "तेच गं ते, अर्थ एकच... जा तू बिनधास्त! मी सांभाळीन मुलांना." "मुलांना सांभाळायचं आहेच तुला, पुढचे ३-४ तास." "कधी जायचंय?" "आजच रात्रीऽऽऽ! आज ब्यूटिशियनला बोलावलंय, म्हणजे आजच असणार ना? की उद्या असणारे? इतक्या वर्षांत एवढंही कसं कळले
सहज सुचत गेल्या आणि एकापुढे एक लिहित गेले या साखळी-चारोळ्या. गंमत म्हणजे, पुन्हा पहिल्या चारोळीपाशी नकळत परतले. ----------------------------- कुणी लिहितं कविता, कुणी खरडतं चारोळ्या, पसंद अपनी अपनी, कारण शेवटी सगळ्याच अंतरात्म्याच्या आरोळ्या... मारावी आरोळी, नाहीतर पिटावा हाकारा, पण समर्थपणे तोंड द्यावं, परिस्थितीच्या नकारा ! परिस्थिती, परिस्थिती, अरे कोण ही परिस्थिती? तिचं नाव पुढे घालून नशिबानं चालवलेली यथेच्छ निंदा-नालस्ती ती... जनाची निंदा, मनाची नालस्ती, करत होते का पुराणातले ऋषी अगस्ती? अरे, पुराणातली वांगी राहू देत पुराणात, आधी कामाकडे लक्ष द्या, मीठ विसरलंय वरणात ! मीठ काय अन्‌ साखर काय, निव्वळ दोन चवी, आयुष्यगाथा कशी पंचरसांनी परिपूर्ण हवी ! आयुष्याला म्हणावे गाथा नसते अशी प्रत्येकाकडे कथा, मग कुणी खरडतं चारोळ्या, तर कुणी लिहितं कविता !!