Posts

Showing posts from January, 2021

Kindle सोबतचं एक वर्ष

Image
हो-नाही करत गेल्या वर्षाच्या सुरुवातीला kindle reader घेतलं. स्क्रीनवर आपण किती पुस्तकं आणि किती काळ वाचू शकू, एखादं पुस्तक महिना-पंधरा दिवस वाचत असू तर डोक्यात ते पुस्तक होल्ड करायला जमेल का, वाचत असताना मध्येच मागे जाऊन काही संदर्भ पुन्हा शोधता येईल का, मुळात स्क्रीनवर मागे जात जात तो संदर्भ सापडेल का.... यातल्या कशाचंच उत्तर माहीत नसताना त्या गोष्टीवर इतका खर्च करावा का .... हे सर्व प्रश्न Kindleनं पहिल्या पुस्तकालाच पुरते बाद ठरवले. आणि अनेक वर्षांनी मी अधाश्यासारखी भरपूर पुस्तकं वाचली. १० कादंबऱ्या, ६ थ्रिलर्स, ४ आत्मकथा, ३ ऐतिहासिक कादंबऱ्या, ४ दस्तऐवजी लिखाणाची पुस्तकं, २ रिपोर्ताज. पैकी ३ मराठी पुस्तकं, बाकी इंग्रजी. यातली ५ अनुवादित. हे just for the sake of classification. यातल्या काही पुस्तकांनी पुरता भ्रमनिरास केला; काही पुस्तकं फार्फार आवडली. पण ते सुद्धा जाऊ दे…. वाचावीशी वाटतील अशी इंग्रजी पुस्तकं हाताला लागणे मुश्किल झालं होतं. Kindleनं इंग्रजी पुस्तकांचं एक मोठंच्या मोठं गोदामच उघडून दिलं. त्यातली कैक पुस्तकं, अनेको लेखक एरवी समोर येण्याची कणभरही शक्यता नव्हती. आता शंभर

क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’

Image
  “Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.” – UNHCR, Policy on Refugee Children   "... तुर्कस्थानातून ग्रीसच्या किनार्‍यावर होड्या भरून आलेले निर्वासित... मोठी माणसं , लहान मुलं... सगळे असे कोर्‍या चेहर्‍याने इथे तिथे बसलेले... मला कळेना , यांच्यासमोर मी काय सादर करणार... तरी मी खिशातून नेहमीचे गंमतीदार मोठे दात काढले , ते माझ्या दातांवर बसवले आणि भुवया उडवून जरासा हसलो ; तर एका लहानगीचा चेहरा लगेच खुलला , तिने शेजारच्या मुलाला कोपराने जरासं ढोसून खुणेने सांगितलं , तो बघ , कोण आहे!” हे सांगणारा क्ले मेझिंग एक विदूषक आहे. आधुनिक जगात सर्कसच्या बाहेर विदूषक बघायला मिळणं तसं दुर्मिळच. आज मेझिंगसारखे अनेक विदूषक आपली ही दुर्मिळ पण अस्सल कला जगभरातल्या निर्वासित मुलांसमोर सादर करण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रसिद्धी नको आहे , पैसा नको आहे ; निर्वासित मुलांच्या चेहर्‍यांवर हसू फुलावं इतकीच त्यांची इच्छा आहे. मेझिंगसारख्या विदूषकांना एकत्र आणलंय ‘क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर (सीडब्ल्यूबी)’ या आंतरराष्ट्रीय स्व