Posts

Showing posts from November, 2011

पुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'

दि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे वाचता येईल. ---------- २६/११बद्द्ल सर्वकाही २६ नोव्हेंबर २००८. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. यादिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याची व्याप्‍ती आणि अघोरी स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न ‘२६/११ मुंबईवरील हल्ला’ या पुस्तकात केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त ज्यूलिओ फ्रान्सिस रिबेरो यांनी आणि रेडियो, टी.व्ही., छपाई आणि वेब या माध्यमांतील इतर काही नामवंत पत्रकार, लेखकांनी लिहिलेले लेख हरिंदर बावेजा यांनी संकलित केले आहेत. २६/११चा हल्ला सहजासहजी आपल्या विस्मृतीत जाणे अशक्यच. तरीही मग हे पुस्तक का वाचायचे? आपल्याला त्यातून नव्याने काही समजते का? तर, याचे उत्तर आहे ‘हो.’
दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान त्यांच्या सूत्रधारांशी फोनवरून केलेली संभाषणे पुस्तकात सविस्तर दिली आहेत. ती लक्षपूर्वक वाचा. या हल्ल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्यांचे भले ‘ब्रेन-वॉशिंग’ केले गेले असेल, पण एकदा धर्माच्या, जिहादच्या वेडाने झपाटल्यावर योजनेची आखणी,…