Posts

Showing posts from September, 2013

स्त्रिया आणि ब्लॉगिंग

तुम्ही कधी उंच डोंगराच्या कड्यावर उभे राहून दरीपल्याड आवाज दिला आहेत? त्वरित ऐकू येणार्‍या प्रतिध्वनीने तुम्हाला आनंदून जायला झाले आहे? असे कधी ना कधी नक्कीच घडलेले असणार. त्या आनंदामागचे कारण एकच असते - त्या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी हाताशी असलेले एकमेव साधन आपण यशस्वीपणे वापरलेले आहे हे तुम्ही मनोमन ओळखलेले असते. प्रतिध्वनी हा खरेतर ‘बोनस’, मुळात खच्चून ओरडणे ही तुमच्या अभिव्यक्तीची त्या क्षणीची गरज पूर्ण झालेली असते. ब्लॉग-विश्व हे काहीसे असेच आहे. समोर अथांग अशी आंतरजालाची दुनिया पसरलेली असते. त्या पसार्‍यात आपलाही आवाज कुणीतरी ऐकावा अश्या आंतरिक इच्छेपोटी आधुनिक जगातील ब्लॉगरूपी खणखणीत साधन वापरून एक साद दिली जाते. ती कुणी ऐकेल, न ऐकेल, ही झाली नंतरची बाब, ‘बोनस’च्या स्वरूपातील. पण व्यक्त होणे ही प्राथमिक गरज मात्र तिथे भागलेली असते. ब्लॉग्ज्‌च्या माध्यमातून स्त्री-अभिव्यक्तीचे कुठले निरनिराळे आविष्कार पहायला मिळतात, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कशा तर्‍हेने डोकावते, त्यांच्यात काही साम्यस्थळे आढळतात का, हे पाहणे मोठे मनोरंजक ठरते. लेखन, चित्रे, फोटो, व्हिडिओ अश्या अनेक तर्‍ह

पिंक-कलर्ड रुईया फाईल

"दुसरं काहीतरी लिही," मॅडमनी सांगितलंय. का म्हणून? उद्या म्हणाल....उद्या म्हणाल....काय बरं? आर्याला योग्य उपमाच सुचेना. उद्याचं परवावर जायला लागलं. तिनं हातातली डायरी खाटकन बंद करून टाकली. डाव्या हातानं स्वतःलाच एक टप्पल मारून घेतली. अशी डाव्या हाताची टप्पल बसली, की समजावं, काहीतरी बिनसलंय. बिनसलं, की पहिली तिला आठवते अर्पिता; आणि मग श्वेता. अर्पिताच्या तुलनेत श्वेता हे तसं ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. केवळ आर्या सांगतेय, म्हणून श्वेता तिचं ऐकते, तिनं लिहिलेलं वाचते, तिच्याशी चर्चा करते, गप्पा मारते; आर्याला तरी काय, तेवढंच हवं असतं; कारण "अशा चर्चेतूनच काहीतरी क्लू मिळतो" हे मॅडमचं म्हणणं तिला पुरेपूर पटतं. तिला मॅडमचं सगळंच पटतं, नेहमीच आणि अर्पिताला तेच आवडत नाही. "फार मॅडम, मॅडम करत असतेस तू, स्वतः स्वतःचं काही आहे, की नाही तुला?" अर्पिताची नाराजी नेहमी या वाक्याचं बोट धरूनच अवतरते. "मग काय तुझ्यामागे ताई, ताई करू?" अर्पिताला त्यात प्रॉब्लेम काय वाटतो तेच आर्याला कळत नाही कधी. "पण दुसर्‍याच्या नावाचा जप हवा कशाला?" "सगळे तुझ्य