Posts

Showing posts with the label विरंगुळा

‘ब्रेक्झिट’, ‘इटलीव्ह’च्या पाठोपाठ...

जर्मनीघ !! फ्रान्सटक !! हंगरीजा !! हे काय आहे ? कसल्या घोषणा ? नाही. हे आहेत मराठी भाषेला बहाल होऊ शकणारे काही नवे शब्द. काय आहे , की दरवर्षी ऑक्सफर्ड शब्दकोशातर्फे इंग्रजी भाषेत नव्याने दाखल झालेल्या शब्दांची यादी जाहीर केली जाते. त्या यादीतले शब्द वाचून कधीकधी अवाक व्हायला होतं. इंग्रजी भाषेचं कौतुक वाटतं. मराठीतही अशी फ्लेक्झिबिलिटी हवी असं वाटून जातं! वरचे तीन शब्द म्हणजे त्याच जाणीवेचा स्वतःपुरता एक छोटासा हुंकार म्हणता येईल. (शेवटी व्यापक बदलांची सुरूवात अशी वैयक्तिक पातळीवरूनच व्हायला हवी.) तर या शब्दांच्या ‘ मेकिंग ’ बद्दल... २०१६ मधला एक गाजलेला इंग्रजी शब्द म्हणजे ‘ ब्रेक्झिट ’. गंमत बघा , ‘ ब्रेक्झिट ’ च्याच जोडीने मैदानात उतरलेल्या ‘ ब्रेमेन ’ शब्दाला हे वलय लाभलं नाही. ग्रेट ब्रिटनच्या सार्वमतात ब्रेमेनवाल्यांना बहुमत मिळालं असतं तरीही ब्रेक्झिट हा शब्दच शर्यत जिंकला असता हे नक्की. या ब्रेक्झिटबद्दल ऐकलं , थोडंफार वाचलं ; आणि मग मी एका जबाबदार (परदेशी) नागरिकाच्या भूमिकेतून ब्रिटनमधल्या दोघा मित्रमंडळींशी त्यावर माफक चर्चा केली. त्यातला एक ब्रेक्झिटच्या बाज...

हा प्रत्यय’च’ हे करू शकतो!

वाक्यातल्या एखाद्या मुद्यावर भर द्यायचा असेल की आपण ’च’ किंवा ’सुद्धा’ असे प्रत्यय वापरतो. मराठी भाषेतल्या या ’च’च्या प्रत्ययाकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. पण हा प्रत्यय ’लई पॉवरबाज’ आहे असं माझं मत आहे. ’कुठल्याही दोन काड्या हलवून चौकोनाचा अष्टकोन करा’ वगैरे असली जी कोडी असतात त्यांत त्या दोन काड्यांमध्ये जी समोरचं दृश्य क्षणार्धात बदलायची ताकद असते तशीच ताकद या ’च’च्या प्रत्ययात असते. वाक्यातल्या वेगवेगळ्या शब्दांना हा ’च’चा प्रत्यय लावला की त्या वाक्याचा अर्थ लगेच बदलतो. उदाहरणादाखल एखादं अगदी साधं वाक्य घेऊ - ’मुलं प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात. ’ हे ते वाक्य.आता यातल्या एकेका शब्दाला पुढे ’च’ लावला की अर्थ कसा बदलतो ते पाहा. * मुलंच प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात. (म्हणजे, बाकी कुणी प्रश्न विचारले तरी चालतात. पण मुलं मात्र भंडावून सोडतात. ) * मुलं प्रश्नच विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात. (म्हणजे, मुलांनी बाकी काही केलं तरी चालतं. पण प्रश्न विचारले की मोठे वैतागतात. ) * मुलं प्रश्न विचारूनच मोठ्यांना भंडावून सोडतात. (म्हणजे, मोठ्यांना भंडावून सोडण...

कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका : २

( पुन्हा एकदा, यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत। प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही.) अ - इचलकरंजीत असताना असे अनेक आलाप आमच्यासारख्यांनी अहमहमिकेने ऐकले आणि एकूणच इतर आलाप आवर्जून ऐकता-ऐकता आम्हाला आलापांच्या आयोजकांचे अशक्य इंगित उमगले। क - कॅल्शियमची कमतरता कमी करण्यासाठी कृश कुसुमने कोल्हापुरात कुलकर्ण्यांकडे किती काबाडकष्ट काढले ! ख - खेडजवळच्या खेड्यात खुरप्याने खालचं खोरं खुरपून खमक्या खापरपणजीने खानदानासाठी खूप खस्ता खाल्ल्या। ग - गुटगुटीत, गोऱ्या गोलूने गोड गाणे गायल्याने गोंधळलेल्या गोविंदाने गावातून गपगुमान गाशा गुंडाळला। घ - घाणेरडं घासलेट घेऊन घाईघाईने घरंदाज घारपुऱ्यांच्या घरात घुसणाऱ्या घोसावळेकरांवर घैसासांची घसघशीत घार घिरट्या घालेलच !! च - चुकार चंदूने चौथ्यांदा चरखा चालवता चालवता चेरी, चारोळीयुक्त चमचम चोरून चुटकीसरशी चाखली। छ - छटाकभर छुंद्यासाठी छत्तीसगढच्या छत्र्यांनी छोटासा छत्रीचा छाप छतावर छत्तीसवेळा छानपैकी छापला। ज - जर्मनीचा जाणकार ज्योतिबा जळगावच्या जोश्या...

कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ....

’क’ या अक्षरापासून सुरू होणारे ’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हे वाक्य सर्वांना माहितीच आहे. अशीच इतर अक्षरांपासून सुरू होणारी ही काही वाक्ये. ( यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही .) ’अ’ : ओगलेवाडीचा आमदार आबाजी एकतारे उगीचच आमच्यावर ओरडत असतो. ’ख’ : खत्रूड खालिद खसखस खाता-खाता खाविंदांवर खेकसला. ’ग’ : गाणगापूरचा गोल गुळगुळीत गोटा गंगापूरच्या गाडीतून गडगडत गेला. ’घ’ : घनघोर घोरणाऱ्या घारपुऱ्यांच्या घरात घुबडे घुसली. ’च’ : चलाख चिरागने चाफेकरांच्या चपला चोरणाऱ्या चंदूला चिंचेखाली चोपले. ’छ’ : छे! छगनरावांची छोटी छकुली छळ-छळ छळते! ’ज’ : जाड जीवन जमनीस जीर्ण जानोरीकरांकडे जरूरीपेक्षा जरा जास्तच जेवला. ’झ’ : झुडुपामागे झोपलेल्या झगेवाल्या झीनतला झिपऱ्या झरिनाने झाडूने झोडपले. ’ट’ : टुकार टारझनने टारगट टोणप्यांना टेकडीवर टाचणी टोचली. ’ठ’ : ठेंगण्या ठुसक्या ठमी ठोसरला ठोमणेने ठणकावले. ’ड’ : डावखुऱ्या डबूने डुगडुगणाऱ्या डब्यात डासांना डांबले. ’ढ’ : ...