Posts

Showing posts from August, 2017

पुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)

Image
जुन्या-नव्या पुस्तकांची ओळख करून देणारे लेख माझ्या खास आवडीचे. अशा लेखांमधून समजलेली काही पुस्तकं अगदी लक्षात राहतात. (पुढे ती आवर्जून मिळवून वाचली जातातच असंही नाही, तरीही.) काही दिवसांपूर्वी ‘अनुभव’च्या अंकात अशाच एका पुस्तकाबद्दल समजलं : The Seasons of Trouble. Life amid the ruins of Sri Lanka’s Civil War. तो लेख वाचला आणि प्रथमच असं झालं की पुस्तक मी लगेच विकत घेतलं. त्याला कारण ठरला पुस्तकाचा विषय! शाळेत असताना लंकन यादवीच्या बातम्या सतत कानावर पडायच्या. दिल्ली दूरदर्शनच्या हिंदी बातम्या देणारी एक बाई LTTE चा उच्चार करताना त्यातला L लांबवायची... एऽऽऽल्लटीटीई! आम्ही तिची नक्कलही करायचो. ही यासंदर्भातली सर्वात जुनी आठवण... LTTE, IPKF यांचे फुलफॉर्म्स माहित झाले होते. प्रभाकरन, कोवळे टायगर्स तरूण-तरूणी, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग असतं म्हणे, सायनाईडच्या कॅप्सूल्स, वगैरे सामान्यज्ञान वाढीस लागलं होतं. जाफना, नॉर्थ-साऊथ बट्टिकलोवा इत्यादी नावं अगदी ओळखीची वाटायची. श्रीलंकेत तामिळ-सिंहलींमधला काहीतरी गोंधळ चालू आहे, हे त्या सगळ्याचं सार. तेव्हा बातम्यांमधून त्याची राजकीय अंगाने