Posts

Showing posts from January, 2011

पुस्तक परिचय : 'कथा अग्निशिखांच्या'

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. ३० जानेवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे किंवा इथे (स्क्रोल-डाऊन करून) वाचता येईल. ----------------------------------------- सशक्त माहितीपट स्वातंत्र्यसंग्रामाचे धगधगते कुंड. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दीडशे वर्षे त्यात लाखो-करोडो आयुष्यांची आहुती पडली. त्यातल्या स्त्रियांच्या बलिदानाला कायमच दुय्यम स्थान मिळाले. पण त्याकाळच्या स्त्री-स्वातंत्र्यसैनिकांनी कधीही याची तमा बाळगली नाही. कधी स्थानिक पातळीवर तर कधी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर त्यांनी निष्ठेने आपली कर्तव्ये पार पाडली. स्वातंत्र्यलढ्यात खारीचा वाटा उचलला.
महात्मा गांधी, आगरकर, कर्वे, आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी जी शिकवण दिली ती अंगिकारून आपापल्या परीने महान देशकार्य आणि समाजकार्य करणार्‍या अश्याच एकवीस अग्निशिखांचा परिचय लेखिका वीणा गवाणकर यांनी आपल्या ‘कथा अग्निशिखांच्या’ या पुस्तकात करून दिला आहे.
हे पुस्तक छोटेखानी दिसत असले तरी त्यामागे बरेच संशोधन दडले आहे हे वाचताना पदोपदी जाणवते. पुस्तक वाचताना एखादा सशक्‍त माहितीपट पाहत असल्यासारखे वाटते. प्रस्तावनेत नमू…