Kindle सोबतचं एक वर्ष
स्क्रीनवर आपण किती पुस्तकं आणि किती काळ वाचू शकू, एखादं पुस्तक महिना-पंधरा दिवस वाचत असू तर डोक्यात ते पुस्तक होल्ड करायला जमेल का, वाचत असताना मध्येच मागे जाऊन काही संदर्भ पुन्हा शोधता येईल का, मुळात स्क्रीनवर मागे जात जात तो संदर्भ सापडेल का.... यातल्या कशाचंच उत्तर माहीत नसताना त्या गोष्टीवर इतका खर्च करावा का ....
हे सर्व प्रश्न Kindleनं पहिल्या पुस्तकालाच पुरते बाद ठरवले. आणि अनेक वर्षांनी मी अधाश्यासारखी भरपूर पुस्तकं वाचली.
१० कादंबऱ्या, ६ थ्रिलर्स, ४ आत्मकथा, ३ ऐतिहासिक कादंबऱ्या, ४ दस्तऐवजी लिखाणाची पुस्तकं, २ रिपोर्ताज. पैकी ३ मराठी पुस्तकं, बाकी इंग्रजी. यातली ५ अनुवादित.
हे just for the sake of classification.
यातल्या काही पुस्तकांनी पुरता भ्रमनिरास केला; काही पुस्तकं फार्फार आवडली. पण ते सुद्धा जाऊ दे…. वाचावीशी वाटतील अशी इंग्रजी पुस्तकं हाताला लागणे मुश्किल झालं होतं. Kindleनं इंग्रजी पुस्तकांचं एक मोठंच्या मोठं गोदामच उघडून दिलं. त्यातली कैक पुस्तकं, अनेको लेखक एरवी समोर येण्याची कणभरही शक्यता नव्हती.
आता शंभर-एक पुस्तकांची wish-list तयार झाली आहे. वर्षभरात इंग्रजी वाचनाचा वेग निश्चित वाढला आहे. हे झाले collateral फायदे; ते ही जाऊ दे….
मुख्य काय, Kindle! And I’m loving it!! 



Comments