मैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...!
ती : (मी प्यायला दिलेल्या ताज्या ताकाचा एक घोट घेत) ताई, हे घरी बनवलंय?
मी : (प्रफुल्ल चेहर्यानं) हो !!
ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं
आणते!!
मी : 😐😐
*
ती केर काढत होती. मी फोनवर काहीतरी करत होते.
ती : ताई, माझ्या नवर्याने
माझ्या पोराचा फोटो टाकलाय... फेसबुकवर... गणपतीसोबत
मी : बरं...
ती : तुमी फोनवर उघडा ना फेसबुक, मी दाखवते...
मी : माझ्या फोनवर फेसबुक नाहीये.
ती : 😲😲
*
ती : ताई, लादीचा कपडा फाटायला
आलाय...
मी : बरं, उद्या दुसरा
काढून ठेवते.
ती : डी-मार्टात ‘पोछे का कपडा’ म्हणून मिळतो, मस्त असतोय, तो का नाही आणत?
मी : 😒😒
*
ती : ताई, हायपरसिटीत
सेल लागलाय...
मी : हो का?
ती : मला जायला वेळच होत नाही...
मी : 😑😑
*
ती : (भांड्यांच्या साबणाचा डबा बघून) ताई, बारहून हा डबा स्वस्त पडतो ?
मी : काय माहित! डबा नाहीतर बार, दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते.
ती : दुकानातून का?? डी-मार्टातून नाही आणत??
मी : डी-मार्ट म्हणजे दुकानच ना?
ती : 🙆🙆
*
ती : (भुवया उडवत, डोळ्यांत
चमक) ताई, कालचा
पेपर वाचला का?
मी : का? काय झालं?
ती : बगीतली का काय बातमी?? (१२ सप्टेंबरला ओ.बि.ला.च्या चेहर्यावरही इतकी चमक नसेल.)
मी : ......
ती : आमच्या इथली ती बाई नाई का... तिनं नवर्याच्या डोक्यात दगड घातला... पोलिसांच्या २ गाड्या आल्यावत्या... वाचलं का?
मी : (कटवण्याच्या सुरात) ही बातमी नव्हती पेपरात...
ती : होती ऽऽ... तुमी नीट पेपर वाचला नाई !!
मी : 😏😏

ती : ताई, जरासा तांदळाचा आटा पायजे होता...
मी : संपलाय. कशासाठी हवाय? काय करणारेस? (माझ्या डोक्यात काहीतरी पदार्थ वगैरे असं होतं.)
ती : फेसपॅक
मी : 😦
मी : संपलाय. कशासाठी हवाय? काय करणारेस? (माझ्या डोक्यात काहीतरी पदार्थ वगैरे असं होतं.)
ती : फेसपॅक
मी : 😦
ती : ते काल मी यूटूबवर पाहिलं... तांदळाचा आटा, शहद, गुलाबजल
(यू‘टू’ब, बरं का)
मी :
😳
ती : जवळचं लग्न आसतं तर ब्लीच, फेशियल केलं असतं; (या दोन्ही शब्दांचे उच्चार एकदम परफेक्ट) पण मामाच्या पोराचं लग्नए... त्याच्यासाटी एवडा खर्च कोन करनार...
मी :
😐
मी :
ती : जवळचं लग्न आसतं तर ब्लीच, फेशियल केलं असतं; (या दोन्ही शब्दांचे उच्चार एकदम परफेक्ट) पण मामाच्या पोराचं लग्नए... त्याच्यासाटी एवडा खर्च कोन करनार...
मी :
*
ती : ताई, ११व्या मजल्यावरच्या फराळवाल्या ताई बेसनाचे लड्डू
केवढ्याला देतात? माला अर्धा किलो पायजेत.
मी : किलोचे २६० रुपये.
ती : म्हंजे अर्ध्या किलोचे किती झाले?
मी (उद्गार-अधिक-प्रश्न सुरात) : (हिशोब) येत नाही ?!!
ती (माझा सूर लक्षात न घेता) : तुमाला पण येत नाही ?!!
मी : 😐😐
... मैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...!
Comments