शेवटचा मोदक (शतशब्दकथा)

 झालं एकदाचं, आता शेवटचा मोदक...!

पारी हातात गोल गोल फिरायला लागण्याच्या बेतात होती. एकीकडे सारणाचा अंदाज घेतला गेला. शेवटचा मोदक वळल्यावर अगदी थोडंसंच सारण उरलं असतं. मग आणखी थोडीशी उकड घेऊन पारी वाढवण्यात आली.

मोठी पारी, हातात गोल गोल फिरायला लागली. पारीच्या गोल वाटक्यात शेवटचं सारण भरलं गेलं.

शेवटचा घाणा वाफवायला ठेवला गेला.

पुढच्या दहा मिनिटांत जेवणाची तयारी केली गेली. गरमागरम मोदकांचा शेवटचा घाणा आधी टेबलावर आला.

आकारामुळे उठून दिसणारा शेवटचा मोदक सर्वात आधी उचलला गेला. आणि तूप घेण्यासाठी त्याचं नाक उकललं गेलं... Just like that!

अक्षरशः दहा मिनिटांपूर्वीच, पेशन्स संपल्याने, शेवटचा मोदक वळायला जरा जास्तच कसरत करावी लागली होती...

 

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)