पुस्तक परिचय : मॉलमध्ये मंगोल (कथासंग्रह, सतीश तांबे)

 

'मानगुटीवर बसलेल्या ग्लोबलायझेशनच्या वेताळाला' अशी अर्पणपत्रिका पाहून पुस्तक वाचावंसं वाटलं. 

बहुतेक कथांचं बीज चांगलंच आहे, पण कथाविस्तार आणि निवेदन मला खूपच पाल्हाळिक वाटलं.

सगळ्या कथा प्रथमपुरुषी निवेदनात आहेत. पुस्तकाच्या मध्यात त्याचाही जरा कंटाळाच आला. (लेखकाची शैलीच तशी आहे, की या पुस्तकात हा योगायोग आहे, ते माहिती नाही.) कथा प्रथमपुरुषी केव्हा लिहितात, केव्हा लिहावी, याबद्दलचे काही ठोकताळे असतील तर मला कल्पना नाही. पण सरसकट सगळ्या कथा तशाच, हे मी पहिल्यांदाच पाहिलं.

मध्यमवर्गीय वातावरण, तशीच पात्रं, भाषा साधी-सोपी, समोर बसून गप्पाटप्पांत आठवणी/अनुभव सांगावेत अशी शैली - या पुस्तकातल्या चांगल्या गोष्टी.
पण अर्पणपत्रिकेतला भेदकपणा एकाही कथेत मला तितकासा दिसला नाही.

त्यातल्या त्यात ‘तळघरातील बुरखेधार्‍याची गोष्ट’, ‘मॉलमध्ये मंगोल’, ‘बेडरूम तिथे पिकासो’ या तीन कथा चांगल्या वाटल्या.

काही वर्षांपूर्वी या पुस्तकावर पेपरमध्ये, फेसबूक पोस्टींतून बरंच वाचलं होतं. म्हणून फार अपेक्षेने पुस्तक वाचलं; पण मला विशेष आवडलं नाही.

Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३