पुस्तक परिचय : And Then There Were None (Agatha Christie)

Lockdown book #3

कारण अधूनमधून काही classics वाचायची असतात!

आजकालच्या thrillersशी या पुस्तकाची तुलना करता कामा नये. विषय, मांडणी, भाषा सगळ्यांतच खूपच फरक पडला आहे...

पण १९३९ साली आलेलं पुस्तक आजही वाचावंसं वाटत असेल, त्यात तुम्ही गुंगून जात असाल, वाचत असताना अचानक फोन वाजल्यावर तुम्हाला दचकायला झालं असेल...
त्यातली ती कविता तुम्हाला haunting वाटत असेल...
खुन्याचं motive अंगावर काटा आणणारं वाटत असेल, त्यामागचं तर्कशास्त्र वाचून तोंडात बोटं घालाविशी वाटली असतील... 

तर मधला सत्तर-एक वर्षांचा कालावधी ही एक दुय्यम बाब ठरते. 

म्हणूनच, अधूनमधून अशी classics वाचायची असतात!

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)