Posts

नेटफ्लिक्सची गोष्ट (पुस्तक परिचय - That Will Never Work : Marc Randolph)

Image
मार्क रॅन्डॉल्फ हा नेटफ्लिक्सचा सहसंस्थापक. Online DVD rental ची कल्पना त्याच्या डोक्यात आली तेव्हापासून ते नेट्फ्लिक्स कंपनी पब्लिक लिमिटेड झाली आणि तो कंपनीतून बाहेर पडला तिथपर्यंतची ही ‘नेटफ्लिक्सची गोष्ट’. लेखकाने ती अगदी रंगवून रंगवून सांगितली आहे. तीन-चार start-ups उभे करून दिल्यानंतर त्याला वाटायला लागलं होतं की आपण काहीतरी वेगळ्या कल्पनेवर काम करावं, स्वतःची कंपनी सुरू करावी. त्या कंपनीद्वारे लोकांना एखादी ऑनलाइन सर्व्हिस देण्यावर त्याचा भर होता. तो आणि त्याचा सहकारी मित्र रीड हेस्टिंग्ज यांनी वेगवेगळ्या start-up ideas वर कशा चर्चा केल्या, त्यातून Online DVD rental ची कल्पना कशी समोर आली, ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधी दोघांनीच काय काय केलं, मग कंपनी स्थापण्याचं ठरलं, त्यासाठी पहिली team कशी गोळा केली, पुढे business development, असे टप्पे एक-एक करत पुस्तकात येत जातात. मार्क रॅन्डॉल्फच्या आयडिया आणि हेस्टिंग्जचा पैसा आणि मार्केटिंग स्किल्स, अशी ही जोडगोळी होती. नेटफ्लिक्समध्ये दोघांच्या भूमिका काय असाव्यात त्यावर मुख्य त्या दोघांच्यात स्पष्टता होती. त्यातू...

पुस्तक परिचय : मॉलमध्ये मंगोल (कथासंग्रह, सतीश तांबे)

Image
  'मानगुटीवर बसलेल्या ग्लोबलायझेशनच्या वेताळाला' अशी अर्पणपत्रिका पाहून पुस्तक वाचावंसं वाटलं.  बहुतेक कथांचं बीज चांगलंच आहे, पण कथाविस्तार आणि निवेदन मला खूपच पाल्हाळिक वाटलं. सगळ्या कथा प्रथमपुरुषी निवेदनात आहेत. पुस्तकाच्या मध्यात त्याचाही जरा कंटाळाच आला. (लेखकाची शैलीच तशी आहे, की या पुस्तकात हा योगायोग आहे, ते माहिती नाही.) कथा प्रथमपुरुषी केव्हा लिहितात, केव्हा लिहावी, याबद्दलचे काही ठोकताळे असतील तर मला कल्पना नाही. पण सरसकट सगळ्या कथा तशाच, हे मी पहिल्यांदाच पाहिलं. मध्यमवर्गीय वातावरण, तशीच पात्रं, भाषा साधी-सोपी, समोर बसून गप्पाटप्पांत आठवणी/अनुभव सांगावेत अशी शैली - या पुस्तकातल्या चांगल्या गोष्टी. पण अर्पणपत्रिकेतला भेदकपणा एकाही कथेत मला तितकासा दिसला नाही. त्यातल्या त्यात ‘तळघरातील बुरखेधार्‍याची गोष्ट’, ‘मॉलमध्ये मंगोल’, ‘बेडरूम तिथे पिकासो’ या तीन कथा चांगल्या वाटल्या. काही वर्षांपूर्वी या पुस्तकावर पेपरमध्ये, फेसबूक पोस्टींतून बरंच वाचलं होतं. म्हणून फार अपेक्षेने पुस्तक वाचलं; पण मला विशेष आवडलं नाही.

पुस्तक परिचय : Cobalt Blue (सचिन कुंडलकर, अनुवाद - जेरी पिंटो)

Image
(‘कोबाल्ट ब्लू’ हे सचिन कुंडलकरलिखित पुस्तक ऐकून माहिती होतं. पण का कोण जाणे, मी सुरुवातीपासून ते इंग्रजी पुस्तक आहे, असंच समजत होते. किंडलवर मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दिसला तेव्हा हे लक्षात आलं. असो. थोडक्यात, मी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वाचला.) तर, पुण्यातल्या मध्यमवर्गीय जोशी कुटुंबातल्या दोन भावंडांची ही गोष्ट आहे. भाऊ, तनय, जरा अबोल, लाजराबुजरा; तर बहीण, अनुजा, ट्रेकिंग आवडणारी, बाइक चालवणारी; मेक-अप, सुंदर कपडे वगैरेशी फार देणेघेणे नसणारी. त्यांच्या घरी एक तरुण मुलगा पेइंग-गेस्ट म्हणून येतो. आणि या भावंडांच्या आयुष्यात एक वावटळ येते. दोघंही त्यात हेलपाटून जातात. वावटळ येते तशी यांना तडाखा देऊन निघूनही जाते. त्यानंतरच्या काळात पुस्तकाची सुरुवात होते. दोघं हेलपाटून का जातात, त्याचं कथानक flashback मध्ये येतं. त्याच ओघात पुढे दोघं त्यातून सावरण्यासाठी काय करतात, सावरू शकतात का, याचे धागे गुंफलेले आहेत. *** पुढच्या मजकुरात spoilers आहेत *** तीन तरुण पात्रं असल्यामुळे ही वावटळ अर्थात प्रेमाची, शारीरिक आकर्षणाची आहे. तनय आणि अनुजा दोघंही पाहुण्याच्या प्रेमात पडतात....

पुस्तक परिचय : मास्तरांची सावली (कृष्णाबाई सुर्वे)

Image
 प्रांजळ, प्रामाणिक आत्मकथन. साधीसुधी, गप्पा मारल्यासारखी भाषा. सुर्वे दांपत्याचं बालपण, तरुणपणीचा काळ केवढा ओढगस्तीचा होता! मधला काही काळ तर अक्षरशः अन्नान्न दशा होती. ते वाचताना अंगावर काटा येतो. नारायण सुर्वे शाळाशिक्षक होते, तर कृष्णाबाई एका शाळेत शिपाई होत्या. त्यांना चार मुलं झाली. प्रत्येकाची काही ना काही शोकांतिका झाली. अशातही आनंदी, खेळकर स्वभाव टिकवून ठेवणे, काव्यलेखन, आलागेला-पै पाहुणा, सगळं करणे, याची कमाल वाटते. त्याकाळची मुंबई पुस्तकात ठिकठिकाणी येते. ती चित्रं मनात उभी करायला मजा आली. कृष्णाबाईंनी पूर्णपणे स्वत:च्या नजरेतून, स्वत:च्या आयुष्याबद्दल लिहिलंय. नारायण सुर्वेंच्या कवि म्हणून कारकीर्दीतल्या महत्वाच्या गोष्टींबद्दल पुस्तकात केवळ उल्लेख येतात, ते मला आवडलं. लहानपणापासून कृष्णाबाईंचा स्वभाव विचारी, खमका होता. त्यांच्याजवळ भक्कम आत्मविश्वास होता. मात्र लग्नानंतर त्या नोकरी करत असल्या तरी इतर घराबाहेरची कामं, पैशांचे व्यवहार त्यांनी कधीच केले नाहीत; सुर्व्यांच्या कोणत्याही सत्काराला, सार्वजनिक कार्यक्रमाला त्या गेल्या नाहीत; हे वाचून आश्चर्य वाटलं. ...

पुस्तक परिचय : गोल्डा - एक अशांत वादळ (वीणा गवाणकर)

Image
गोल्डा मेयर यांच्या आत्मचरित्रावर बेतलेलं पुस्तक (वाटलं मला, कारण अधेमध्ये आत्मचरित्राचे उल्लेख आहेत.) हे पुस्तकही चरित्रात्मकच आहे. वाचताना पहिली प्रतिक्रिया होते ती म्हणजे काय जबरदस्त कणखर, करारी, कर्तृत्ववान बाई होती ही! त्यांचं बालपण अमेरिकेत गेलं, ही माहिती मला नवीन होती. बालपण, तरुण वयातली जडणघडण, इस्रायलच्या निर्मितीपूर्वीपासूनची ज्यूंसाठीची त्यांची धडपड, तळागाळातल्या माणसांचा विचार, त्यांच्याशी मनाने कायम जोडलेलं असणे, पुढे इस्रायलमधलं राजकारण, त्यात अनुभवाने आणि कर्तृत्वाने निर्माण झालेला दरारा, कामगार मंत्री, परराष्ट्रमंत्री, पंतप्रधानपद, अरब राष्ट्रांसोबतचे सततचे खटके, युद्धं, कॉफी आणि सिगारेट्सच्या अखंड व्यसनामुळे आलेली आजारपणं, निवृत्ती, मृत्यू... असा दीर्घ, वाचतानाही दमवणारा प्रवास आहे. त्यांची स्टोरीच मुळात इतकी इव्हेन्टफुल असल्यामुळे पुस्तक कंटाळवाणं झालं नाही हे खरं, तरी ते आणखी चांगलं करता आलं असतं, असं वाटलं. आणखी एक, म्हणजे किंडल आवृत्तीत प्रचंड typos आहेत. त्यामुळे फार विरस झाला. त्यापायी मध्ये काही दिवस पुस्तक अर्धवट वाचून बाजूला पडलं होतं. पण शेवटी नेटानं पूर्ण ...

पुस्तक परिचय : संवादु अनुवादु (उमा कुलकर्णी)

Image
अनुवादाचा प्रवास मांडायला हवा, या भालचंद्र नेमाडेंच्या सूचनेवरून उमा कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहायला घेतल्याचं म्हटलं आहे. पुस्तकात केवळ अनुवादाचा प्रवासच नव्हे, तर त्यांचा आजवरचा जीवनप्रवासच येतो. त्यामुळे पुस्तक चांगलं घसघशीत आहे. पुस्तकाचं एका वाक्यात वर्णन करायचं तर हे त्यांच्या भोवतीच्या गोतावळ्याचं वर्णन आहे. गोतावळा- माणसांचा आणि पुस्तकांचाही. बेळगावातलं बालपण, तेव्हाचं घरचं वातावरण, लहानपणीचे सवंगडी, शेजारपाजारी, नातेवाईक, घरातले कुळाचार, लग्नानंतरचे सासरचे नातेवाईक, सासरमाहेरच्या नातेवाईकांचे निवेदनाच्या ओघात येणारे स्वभावविशेष, हे सगळं वाचताना आपल्या शेजारच्या घरातलं एखादं कुटुंब रोज येताजाता दिसत राहतं, तसं वाटतं. पुस्तकाचा मुख्य भाग उमा आणि विरुपाक्ष कुलकर्णी यांचं सहजीवन आणि त्यांतला कानडी-मराठी पुस्तकांचा सहभाग यावर आधारित आहे. दोघांच्या वाचनाच्या सवयी, उमा कुलकर्णी यांची कानडी समजून घेण्याची धडपड, त्यातून अनुवादाच्या कामात त्यांचं सहजगत्या शिरणं, हे अगदी गप्पांच्या ओघात सांगावं तसं त्यांनी लिहिलं आहे. त्या कामाच्या निमित्ताने कारंथ, भैरप्पा यांच्याशी त्यांचा स...

पुस्तक परिचय : The Messenger (Shiv Malik)

Image
There are more than two sides to every story - हे या पुस्तकाचं उपशीर्षक आहे. आणि अगदी पहिल्या पानापासूनच आपण ही तिसरी बाजू काय असेल याचा अंदाज बांधायला सुरुवात करतो. ७ जुलै २००५ यादिवशी लंडनमध्ये चार ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. लंडन पोलीस, इंग्लंडमधली प्रमुख वृत्तपत्रं, न्यूज चॅनल्स या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याच्या मागे होते. या हल्ल्यामागे ब्रिटिश जिहादी नेटवर्कचा (BJN) हात होता, हे स्पष्ट झालं होतं. शिव मलिक हा इंग्लंडमधला शोधपत्रकार सुरुवातीला मँचेस्टरमध्ये एका दुय्यम असाइनमेंटसाठी या नेटवर्कमधल्या एका सदस्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेला. त्याचं नाव - हसन बट्ट. हसन बट्ट इंग्लंडमधल्या वृत्तमाध्यमांमध्ये बर्‍यापैकी माहित असलेला चेहरा होता. BJN तर्फे माध्यमांना मुलाखती देणे, पत्रकारपरिषदेत बोलणे या गोष्टी तो करायचा. त्याचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं. हसन बट्टशी बोलताना शिव मलिकच्या लक्षात आलं, की तो BJN चा केवळ ‘चमको प्रवक्ता’ नव्हता. त्याची स्वतःची काही तत्वं होती, धर्माचारण म्हणजे नेमकं काय याबद्दल त्याची मतं स्पष्ट होती, आणि तरीही तो विवेकी विचार करणारा ह...