Posts

Kindle सोबतचं एक वर्ष

Image
हो-नाही करत गेल्या वर्षाच्या सुरुवातीला kindle reader घेतलं. स्क्रीनवर आपण किती पुस्तकं आणि किती काळ वाचू शकू, एखादं पुस्तक महिना-पंधरा दिवस वाचत असू तर डोक्यात ते पुस्तक होल्ड करायला जमेल का, वाचत असताना मध्येच मागे जाऊन काही संदर्भ पुन्हा शोधता येईल का, मुळात स्क्रीनवर मागे जात जात तो संदर्भ सापडेल का.... यातल्या कशाचंच उत्तर माहीत नसताना त्या गोष्टीवर इतका खर्च करावा का .... हे सर्व प्रश्न Kindleनं पहिल्या पुस्तकालाच पुरते बाद ठरवले. आणि अनेक वर्षांनी मी अधाश्यासारखी भरपूर पुस्तकं वाचली. १० कादंबऱ्या, ६ थ्रिलर्स, ४ आत्मकथा, ३ ऐतिहासिक कादंबऱ्या, ४ दस्तऐवजी लिखाणाची पुस्तकं, २ रिपोर्ताज. पैकी ३ मराठी पुस्तकं, बाकी इंग्रजी. यातली ५ अनुवादित. हे just for the sake of classification. यातल्या काही पुस्तकांनी पुरता भ्रमनिरास केला; काही पुस्तकं फार्फार आवडली. पण ते सुद्धा जाऊ दे…. वाचावीशी वाटतील अशी इंग्रजी पुस्तकं हाताला लागणे मुश्किल झालं होतं. Kindleनं इंग्रजी पुस्तकांचं एक मोठंच्या मोठं गोदामच उघडून दिलं. त्यातली कैक पुस्तकं, अनेको लेखक एरवी समोर येण्याची कणभरही शक्यता नव्हती. आता शंभर...

क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’

Image
  “Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.” – UNHCR, Policy on Refugee Children   "... तुर्कस्थानातून ग्रीसच्या किनार्‍यावर होड्या भरून आलेले निर्वासित... मोठी माणसं , लहान मुलं... सगळे असे कोर्‍या चेहर्‍याने इथे तिथे बसलेले... मला कळेना , यांच्यासमोर मी काय सादर करणार... तरी मी खिशातून नेहमीचे गंमतीदार मोठे दात काढले , ते माझ्या दातांवर बसवले आणि भुवया उडवून जरासा हसलो ; तर एका लहानगीचा चेहरा लगेच खुलला , तिने शेजारच्या मुलाला कोपराने जरासं ढोसून खुणेने सांगितलं , तो बघ , कोण आहे!” हे सांगणारा क्ले मेझिंग एक विदूषक आहे. आधुनिक जगात सर्कसच्या बाहेर विदूषक बघायला मिळणं तसं दुर्मिळच. आज मेझिंगसारखे अनेक विदूषक आपली ही दुर्मिळ पण अस्सल कला जगभरातल्या निर्वासित मुलांसमोर सादर करण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रसिद्धी नको आहे , पैसा नको आहे ; निर्वासित मुलांच्या चेहर्‍यांवर हसू फुलावं इतकीच त्यांची इच्छा आहे. मेझिंगसारख्या विदूषकांना एकत्र आणलंय ‘क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर (सीडब्ल्यूबी)’ या आंतरराष्ट्रीय...

पुस्तक परिचय - Hired: Six Months Undercover in Low-Wage Britain (James Bloodworth)

Image
जेम्स ब्लडवर्थ या ब्रिटिश पत्रकाराने ठरवून, प्लॅन करून सहा महिने ब्रिटिश कामगार वर्गाप्रमाणे तुटपुंज्या पगाराच्या नोकर्‍यांसाठी अर्ज करून चार प्रकारच्या नोकर्‍या केल्या. त्या त्या नोकरीच्या ठिकाणी त्याचे सहकारी, स्थानिक ज्या प्रकारे राहायचे तसंच तो देखील राहिला. (गलिच्छ वस्त्या, एका घरात दाटीवाटीने राहणारे कामगार) त्यांच्यासारखंच जेवण, ट्रान्स्पोर्ट, त्यांच्याप्रमाणेच महिन्याच्या कमाईत(च) कशीबशी गुजराण करून, त्याच लोकांच्यात मिसळून, त्यांच्याशी गप्पा मारून त्या सर्व अनुभवांवर त्याने हे पुस्तक लिहिलं आहे. अमॅझॉन पिकिंग ॲन्ड पॅकिंग वेअरहाऊस (Rugeley), केअर वर्कर (Blackpool), एका इन्शुरन्स कंपनीचं कॉल सेंटर (South Wales), उबरचालक (लंडन) अशा चार नोकर्‍या त्याने केल्या. पुस्तक लिहिण्याचं ठरवूनच त्यानं हे प्रोजेक्ट सुरू केलं. मात्र प्रस्तावनेत तो म्हणतो, की तो केवळ तुटपुंज्या पगारांच्या नोकर्‍या यापुरतं पुस्तक मर्यादित ठेवू शकला नाही. त्या नोकर्‍यांइतकंच त्या-त्या गावांबद्दल, तिथल्या माणसांबद्दल, पूर्वी त्या ठिकाणी भरभराटीला आलेले जुने पारंपरिक उद्योगधंदे, ते लयाला गेल्यानंतर ...

पुस्तक परिचय : Goat Days (Benyamin)

Image
'दुर्दैवाचे दशावतार' किती अवतार धारण करू शकतात ते हे पुस्तक वाचून समजतं. केरळमधला एक गरीब अशिक्षित मजूर. त्याच्या गावातले अनेकजण गल्फमध्ये नोकरी करून थोडेफार पैसे मिळवत असतात. याला जाण्याची संधी मिळते तेव्हा कर्ज काढून, कसेतरी पैसे उभे करून तो जातो. तिथे (रियाध) पोचल्यावर कुणाला भेटायचं, कुठे जायचं काहीही माहिती त्याच्याजवळ नसते.  त्याला न्यायला एक अरब येतो आणि त्याची रवानगी थेट वाळवंटातल्या एका मोठ्या बकर् ‍ यांच्या farm मध्ये होते. शेकडो बकर् ‍ यांची देखभाल करायची, त्यांना वाळवंटात फिरवून आणायचं, हे त्याचं काम. बदल्यात त्याला अक्षरश: गुलामासारखी वागणूक मिळते. वाळवंटात पाण्याचं दुर्भिक्ष्य, असलेलं पाणी बकर् ‍ यांसाठीच वापरायचं या कडक नियमामुळे त्याला अंघोळ, प्रातर्विधींसाठीही पाणी वापरायची मनाई असते. जेमतेम खायला मिळत असतं, कामात बारीकशी कुचराई/चूक झाली तरी चामड्याच्या पट्ट्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असते. ते सगळं वर्णन सुन्न करणारं आहे. तरीही निवेदनात एक साधा हलकेफुलकेपणा आहे. देवावरचा अढळ विश्वास, अशा परिस्थितीतही अरबी भाषा समजून, शिकून घेण्याचा प्रयत्न,...

पुस्तक परिचय : THE ARGUMENT (Victoria Jenkins)

Image
एका चौकोनी कुटुंबाच्या कथेतून मांडलेलं सायकॉलॉजिकल थ्रिलर. टीनएजर मुलांचं विचित्र वागणं यावर फोकस ठेवून पुस्तकाची सुरुवात होते. आई आणि टीनएजर मुलगी यांच्या दृष्टीकोनातून आळीपाळीने प्रकरणं येतात आणि त्यातून कथा पुढे सरकते.  कथेत डायरीचं हुकुमी अस्त्र आहेच, मात्र त्याचा अतिरेक नाहीये. प्लस त्याबद्दलचा एक लहानसा ट्विस्ट आहे, तो मला आवडला. ६०-७० टक्के पुस्तक संपेपर्यंत मुख्य फॅमिली ड्रामाच आहे. (किंडलवर वाचताना हे पर्सेंटेज कळतं म्हणून लिहिलं ) त्यानंतर दोन मोठे ट्विस्ट येतात. आणि पुढच्या घटना घडून पुस्तक संपतं. त्या अर्थाने थ्रिलरपेक्षा हा सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. पण कथानकात दोन गुन्हे आहेत, त्यामुळे थ्रिलर म्हणू शकतो.  निवेदनात आई आणि मुलीची विचारप्रक्रिया, मनातले उलटसुलट विचार, घालमेल, त्यातून नकळत येणारा फ्लॅशबॅक हे सगळं गुंतवून ठेवणारं आहे. मात्र वडिलांचा दृष्टीकोन फारसा कळत नाही. पण त्याचं कारण ट्विस्टमध्ये कळतं. एकंदर पुस्तक एकदा वाचण्यासारखं आहे.

पुस्तक परिचय : There's Gunpowder in the Air (Manoranjan Byapari, अनुवाद - अरुणवा सिन्हा)

Image
या पुस्तकाचा किंडलवरचा सारांश जरा दिशाभूल करणारा आहे. सारांश वाचून मी पुस्तक घेतलं, पण त्यात म्हटलेल्या कथानकावर पुस्तकात मुख्य फोकस नाहीये. ७० च्या दशकातला एक मोठा तुरुंग, तिथले अंतर्गत व्यवहार कसे चालतात, गार्डस आणि कैद्यांमधलं नातं, नक्षलवादी कैद्यांच्या वेगळ्या कोठड्या, कैद्यांचा पलायनाचा प्रयत्न, वगैरे भरपूर मालमसाला आहे. डिटेलिंगही आहे. पण माझ्या अपेक्षा वेगळ्या झाल्यामुळे जरासा भ्रमनिरास झाला. तरी, नेटवर वाचलेली लेखकाची माहिती  इंटरेस्टिंग वाटली, म्हणून पुस्तक संपूर्ण वाचलं. 

उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग ४)

Image
आमच्या महिन्याभराच्या भटकंतीचा शेवटचा दिवस. डेन्मार्कमधल्या हेलसिंगॉर (Helsingør) इथला ‘क्रॉनबोर्ग कॅसल’ पाहायला निघालो होतो. रेनेसाँ काळातला उत्तर युरोपमधला हा एक महत्त्वाचा किल्ला. कोपनहेगन ते हेलसिंगॉर हा पाऊण तासाचा ट्रेन प्रवास, किल्ल्याचं स्थापत्य, थोडाफार इतिहास आणि किल्ल्यालगतची खाडी- त्या दिवसाच्या भटकंतीची इतकी पूंजी देखील भरपूर ठरली असती; स्वच्छ हवा, अहाहा गारवा, शांत वातावरण ही नेहमीची यशस्वी मंडळी जोडीला होतीच; मात्र आमच्या पर्यटकी ललाटावर त्याहून अधिक काही लिहिलेलं होतं आणि किल्ल्यात आतवर जाईपर्यंत त्याची आम्हाला कल्पना नव्हती. ठरलेली ट्रेन पकडून हेलसिंगॉरला पोहोचलो. स्टेशनवरून चालत, रस्ता शोधत शोधत कॅसल गाठला. तिकीट काढून आत शिरलो. तिथे येणार्‍या सर्वांनाच किल्ल्यात सहज मार्ग शोधत फिरता यावं अशी व्यवस्था होतीच. शिवाय तिकिटासोबत एक माहितीपत्रक आणि नकाशाही मिळालेला होता. माहितीपत्रकात लिहिल्यानुसार, क्रॉनबोर्ग किल्ल्याचा अभिजात इंग्रजी साहित्याशीही घनिष्ट संबंध आहे; कारण शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकाचं कथानक याच किल्ल्यात घडताना दाखवलं आहे. (नाटकात हॅम्लेट ...