पुस्तक परिचय : THE ARGUMENT (Victoria Jenkins)
एका चौकोनी कुटुंबाच्या कथेतून मांडलेलं सायकॉलॉजिकल थ्रिलर.
टीनएजर मुलांचं विचित्र वागणं यावर फोकस ठेवून पुस्तकाची सुरुवात होते. आई आणि टीनएजर मुलगी यांच्या दृष्टीकोनातून आळीपाळीने प्रकरणं येतात आणि त्यातून कथा पुढे सरकते.
कथेत डायरीचं हुकुमी अस्त्र आहेच, मात्र त्याचा
अतिरेक नाहीये. प्लस त्याबद्दलचा एक लहानसा ट्विस्ट आहे, तो मला आवडला.
६०-७० टक्के पुस्तक संपेपर्यंत मुख्य फॅमिली ड्रामाच आहे. (किंडलवर वाचताना हे पर्सेंटेज कळतं म्हणून लिहिलं ) त्यानंतर दोन मोठे ट्विस्ट येतात. आणि पुढच्या घटना घडून पुस्तक संपतं. त्या अर्थाने थ्रिलरपेक्षा हा सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. पण कथानकात दोन गुन्हे आहेत, त्यामुळे थ्रिलर म्हणू शकतो.
निवेदनात आई आणि मुलीची विचारप्रक्रिया, मनातले उलटसुलट विचार, घालमेल, त्यातून नकळत येणारा फ्लॅशबॅक हे सगळं गुंतवून ठेवणारं आहे. मात्र वडिलांचा दृष्टीकोन फारसा कळत नाही. पण त्याचं कारण ट्विस्टमध्ये कळतं.
एकंदर पुस्तक एकदा वाचण्यासारखं आहे.
Comments