Posts

मैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...!

ती : (मी प्यायला दिलेल्या ताज्या ताकाचा एक घोट घेत) ताई , हे घरी बनवलंय ? मी : (प्रफुल्ल चेहर्‍यानं) हो !! ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं आणते!! मी : 😐😐 * ती केर काढत होती. मी फोनवर काहीतरी करत होते. ती : ताई , माझ्या नवर्‍याने माझ्या पोराचा फोटो टाकलाय... फेसबुकवर... गणपतीसोबत मी : बरं... ती : तुमी फोनवर उघडा ना फेसबुक , मी दाखवते... मी : माझ्या फोनवर फेसबुक नाहीये. ती : 😲😲 * ती : ताई , लादीचा कपडा फाटायला आलाय... मी : बरं , उद्या दुसरा काढून ठेवते. ती : डी-मार्टात ‘पोछे का कपडा’ म्हणून मिळतो , मस्त असतोय , तो का नाही आणत ? मी : 😒😒 * ती : ताई , हायपरसिटीत सेल लागलाय... मी : हो का ? ती : मला जायला वेळच होत नाही... मी : 😑😑 * ती : (भांड्यांच्या साबणाचा डबा बघून) ताई , बारहून हा डबा स्वस्त पडतो ? मी : काय माहित! डबा नाहीतर बार , दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते. ती : दुकानातून का ?? डी-मार्टातून नाही आणत ?? मी : डी-मार्ट म्हणजे दुकानच ना ? ती : 🙆🙆 ...

न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २)

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला) ---------- पाहिया, रोटोरुआची भटकंती संपवून वेलिंग्टनला पोहोचलो तोवर अशा आयत्यावेळी ठरवून केलेल्या वॉक्सची जवळपास चटक लागल्यासारखं झालं होतं. वेलिंग्टनच्या वाटेवर असताना नकाशात हॉटेलचा पत्ता वगैरे पाहत होते; तेव्हा हॉटेलपासून जवळच ‘माऊंट व्हिक्टोरिया लूक-आऊट’ नावाचा ट्रेल दिसला. तिथे जायचं हे ओघानं आलंच. वेलिंग्टनला हॉटेल चेक-इन केलं, i-SITE ची वारी केली, तिथे दुसर्‍या दिवशीच्या ‘झीलँडिया टूर’ची व्यवस्था लावली, तिथून जवळच्याच ‘बेसिन-रिझर्व क्रिकेट ग्राऊंड’मध्ये एक फेरफटका मारला आणि मग माऊंट व्हिक्टोरियाची वाट पकडली. आमचं हॉटेल आणि आसपासचा रहिवासी भाग एका अर्थानं मा.व्हिक्टोरियावरच वसलेला होता. कारण आम्ही लूक-आऊटच्या दिशेला चालायला लागलो तो चांगलाच चढाचा रस्ता निघाला. जवळपास दहा-एक मिनिटं हाशहुश करत चालत होतो. दोन्ही बाजूंना टुमदार घरं नाहीतर २-३ मजली इमारती दिसत होत्या. पण चढ असा होता की ...

फॅक्ट आणि फिक्शनच्या सीमारेषेवर

कॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी असायचे, तेव्हा कायम माझ्या बसच्या आधी एका खासगी कंपनीची बस यायची. स्टॉपलगत उभे असलेले त्या कंपनीतले दोघं-चौघं बसमध्ये चढायचे. त्यात एक तरूण मुलगीही असायची. माझा तिच्याकडे पाहून फुल्ल फॅन झालेला असायचा. तिचे ऑफिसी कपडे, खांद्यावरची बॅग, पायांतले सँडल्स, गळ्यातलं आय-कार्ड, एका मनगटावर घड्याळ, दुसर्‍या हातात ब्रेसलेट किंवा तत्सम काहीतरी, एकदम टकाटक कॉर्पोरेट लूक! आपण पुढे नोकरी करायची तर अश्याच कंपनीत, अश्याच अवतारात ऑफिसला जायचं, अश्याच बसमधून, हे मी तिच्याकडे बघून तेव्हा मनाशी पक्कं केलं होतं... पुढे बर्‍याच वर्षांनी ‘गोष्टीवेल्हाळ’ (लेखक : मधुकर धर्मापुरीकर) या कथासंग्रहातली ‘वधू’ ही कथा वाचताना मला अगदी अचानक ती कॉर्पोरेट मुलगी आठवली. मला इतकं आश्चर्य वाटलं! दोघींमध्ये कणमात्रही साम्य नव्हतं... की होतं? कथेतला नारायणराव हा एका विवाहेच्छुक मुलाचा बाप. लग्न जुळवताना वधूपित्यांनी चपला झिजवायच्या, आपण नाही, या विचारांचा त्याच्यावर पगडा आहे. पण तरी मुलाचं लग्नाचं वय टळून चाललंय, चांगली स्थळं येतच नाहीयेत या विचारानं तो हतबलही झालेला आहे. ओळखीपाळखी...

न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा ---------- ‘नेचर अँड पार्क्स’ थीम ठरवून टूरचं प्लॅनिंग करत असताना ‘काय करायचं नाही’ ते डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे, एखादा बीच-वॉक, एखादा जंगल-ट्रेल करायला मिळाला तरी भरून पावलो, अशी भावना होती. कारण, करायचं नाही असं ठरवलेलं खरंच न केल्याचा आनंद अधिक होणार होता. प्रत्यक्षात या टूरमध्ये आम्ही ११ वॉक्स/ट्रेल्स करू शकलो; आणि त्यांपैकी तब्बल ७ मूळ प्लॅनमध्ये नसलेले, उत्स्फूर्तपणे/ऐनवेळी ठरवून केलेले होते. त्यांतल्या सर्वात आवडलेल्या अनुभवापासून सुरूवात करते... ते-पुईयाची चार-एक तासांची ‘जिओथर्मल’ रपेट करून जस्ट बाहेर पडलो होतो. तिथून आमचं हॉटेल तसं फार लांब नव्हतं; पण येताना टॅक्सीनं आलो होतो हे कारण काढून टॅक्सीनंच परत जायचं ठरवलं. रस्त्यापर्यंत जाऊन पाहिलं तर टॅक्सी-स्टँड वगैरे कुठे दृष्टीक्षेपात आलं नाही. येताना वाटेतही तसं काही दिसलं नव्हतं. मग सरळ तिथल्या रिसेप्शन डेस्ककडे गेले. तिथे आम्हाला दुपारी माओरी-सैर करवणारी बाई बसलेली होती. तिला म्हटलं, ...

पुस्तक परिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)

Image
कधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला!... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं. सलग काही इंग्रजी पुस्तकं वाचली गेल्यावर मराठी पुस्तकाची तातडीची गरज निर्माण झाली आणि मग ते बाहेर निघालं. पुस्तक विकत घेतानाच त्याच्या ब्लर्बमधून ‘ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा’ यापलिकडे फारसं काही समजलं नसल्याचं लक्षात होतं. त्यामुळे थेट वाचायला सुरूवात केली. पुस्तकात एकूण ६ कथा आहेत. सगळ्याच कथा संथ लयीत, बारीकसारीक तपशील टिपत पुढे जाणार्‍या आहेत. त्यांतलं कथानक सूक्ष्म पातळीवर उलगडतं. मात्र त्या क्लिष्ट मुळीच नाही...

मोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार

Image
मध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची पुस्तकं आवडतात. Munich आणि The House on Garibaldi Street या सिनेमांमुळे हे पुस्तक वाचण्याआधी मला मोसादच्या त्या दोन मोहिमा तेवढ्या माहिती होत्या. पुस्तकातलं सर्वात उत्कंठावर्धक आणि थरारक प्रकरण म्हणजे हीच अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरातल्या गॅरीबाल्डी स्ट्रीटवरच्या घरातून अडॉल्फ आईकमनला ‘उचलण्या’ची कथा. आईकमनला ताब्यात घेणे हे जितकं महत्त्वाचं होतं , तितकंच त्याला अर्जेंटिनातून बेमालूम बाहेर काढणे गरजेचं होतं. ती मोहिम मोसादनं ज्या प्रकारे आखली आणि पार पाडली त्याला तोड नाही. ही कथा वाचत असताना आईकमनपर्यंत मोसादचे एजन्ट्स पोहोचतात कसे याकडेच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यालाच जोडून मोसाद प्रमुखांनी आईकमनला अर्जेंटिनातून बाहेर काढण्याच्या खास पुरवणी योजनेवरही विचार केलेला होता. ती योजना आपल्यासमोर येते तेव्हा आश्चर्यानं तोंडात बोटं घालाविशी वाटतात. आईकमन ...

न्यूझीलंड-३ : हा खेळ मिनरल्सचा!

Image
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! ---------- भूगर्भीय हालचाली म्हटलं की एकतर वज्रेश्वरी-गणेशपुरीची गरम पाण्याची कुंडं आठवतात; किंवा मग थेट कुठलातरी (प्रत्यक्ष न पाहिलेला) जागृत ज्वालामुखी. मध्यंतरी इंडोनेशियातल्या एका जागृत ज्वालामुखीच्या पर्यटनावरचा एक लेख वाचनात आला होता. तो वाचून ते ठिकाण तेव्हाच माझ्या विशलिस्टमध्ये आलेलं होतं. गरम पाण्याची कुंडं लहानपणी पाहिलेलीच होती. त्यामुळे एकदा इंडोनिशियाला एक फेरी केली, म्हणजे चारधामच्या चालीवर भूगर्भीय हालचालींचं द्विधाम पूर्ण झालं असं समजायला हरकत नाही असं मनोमन ठरवून टाकलेलं होतं. पण मग न्यूझीलंडच्या रोटोरुआनं खांद्यावर टॅप करून ‘शुक...शुक’ केलं, आणि सांगितलं, ‘हमारे जैसे भी खडे हैं राहों में...’ रोटोरुआच्या एअरपोर्टवर विमानातून बाहेर पाऊल टाकलं आणि एक वेगळाच वास नाकात शिरला. म्हटलं तर त्याची नोंद घेतली गेली; म्हटलं तर नाही. १०-१५ वर्षं गुजराथच्या अत्यंत प्रदूषित औद्योगिक पट्ट्यात राहिल्यानं अशा वेगळ्या वासाची नाकाला इतकी सवय झाली आहे, की तो वास आल्यावर आधी गुजराथचीच आठवण आली. ग...