Posts

स्त्रिया आणि ब्लॉगिंग

तुम्ही कधी उंच डोंगराच्या कड्यावर उभे राहून दरीपल्याड आवाज दिला आहेत? त्वरित ऐकू येणार्‍या प्रतिध्वनीने तुम्हाला आनंदून जायला झाले आहे? असे कधी ना कधी नक्कीच घडलेले असणार. त्या आनंदामागचे कारण एकच असते - त्या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी हाताशी असलेले एकमेव साधन आपण यशस्वीपणे वापरलेले आहे हे तुम्ही मनोमन ओळखलेले असते. प्रतिध्वनी हा खरेतर ‘बोनस’, मुळात खच्चून ओरडणे ही तुमच्या अभिव्यक्तीची त्या क्षणीची गरज पूर्ण झालेली असते. ब्लॉग-विश्व हे काहीसे असेच आहे. समोर अथांग अशी आंतरजालाची दुनिया पसरलेली असते. त्या पसार्‍यात आपलाही आवाज कुणीतरी ऐकावा अश्या आंतरिक इच्छेपोटी आधुनिक जगातील ब्लॉगरूपी खणखणीत साधन वापरून एक साद दिली जाते. ती कुणी ऐकेल, न ऐकेल, ही झाली नंतरची बाब, ‘बोनस’च्या स्वरूपातील. पण व्यक्त होणे ही प्राथमिक गरज मात्र तिथे भागलेली असते. ब्लॉग्ज्‌च्या माध्यमातून स्त्री-अभिव्यक्तीचे कुठले निरनिराळे आविष्कार पहायला मिळतात, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कशा तर्‍हेने डोकावते, त्यांच्यात काही साम्यस्थळे आढळतात का, हे पाहणे मोठे मनोरंजक ठरते. लेखन, चित्रे, फोटो, व्हिडिओ अश्या अनेक तर्‍ह...

पिंक-कलर्ड रुईया फाईल

"दुसरं काहीतरी लिही," मॅडमनी सांगितलंय. का म्हणून? उद्या म्हणाल....उद्या म्हणाल....काय बरं? आर्याला योग्य उपमाच सुचेना. उद्याचं परवावर जायला लागलं. तिनं हातातली डायरी खाटकन बंद करून टाकली. डाव्या हातानं स्वतःलाच एक टप्पल मारून घेतली. अशी डाव्या हाताची टप्पल बसली, की समजावं, काहीतरी बिनसलंय. बिनसलं, की पहिली तिला आठवते अर्पिता; आणि मग श्वेता. अर्पिताच्या तुलनेत श्वेता हे तसं ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. केवळ आर्या सांगतेय, म्हणून श्वेता तिचं ऐकते, तिनं लिहिलेलं वाचते, तिच्याशी चर्चा करते, गप्पा मारते; आर्याला तरी काय, तेवढंच हवं असतं; कारण "अशा चर्चेतूनच काहीतरी क्लू मिळतो" हे मॅडमचं म्हणणं तिला पुरेपूर पटतं. तिला मॅडमचं सगळंच पटतं, नेहमीच आणि अर्पिताला तेच आवडत नाही. "फार मॅडम, मॅडम करत असतेस तू, स्वतः स्वतःचं काही आहे, की नाही तुला?" अर्पिताची नाराजी नेहमी या वाक्याचं बोट धरूनच अवतरते. "मग काय तुझ्यामागे ताई, ताई करू?" अर्पिताला त्यात प्रॉब्लेम काय वाटतो तेच आर्याला कळत नाही कधी. "पण दुसर्‍याच्या नावाचा जप हवा कशाला?" "सगळे तुझ्य...

काही ऑस्करविजेते चित्रपट

Image
गेल्या ८-१५ दिवसांत काही ऑस्करविजेते चित्रपट पाहिले. ' द आर्टिस्ट ' - स्पेशल इफेक्टस् आणि कम्प्युटर ग्राफिक्सच्या युगात एखाद्याला मूकपट काढावासा का वाटतो - ही मुख्य उत्सुकता होती. पण सिनेमा पाहिल्यावर जाणवलं, की बोलपट काढला असता, तर तो अन्य सर्वसाधारण सिनेमांप्रमाणेच झाला असता. नायक - ज्याँ दुयॉर्दिन (उच्चार  ) - त्याचा चेहरा किती एक्स्प्रेसिव्ह आहे! आयुष्यातल्या भरभराटीच्या काळात, आनंदी, उल्हसित नायक हसतो, तेव्हा त्याचे डोळेही हसतात. कठीण काळात तो अधूनमधून केविलवाणा हसतो, तेव्हा मात्र डोळे हसत नाहीत. हे पडद्यावर दाखवणं किती कठीण आहे! २०च्या दशकाचा उत्तरार्ध वेषभूषेतून आणि भवतालातून निव्वळ अफलातून उभा केलेला आहे. (कथानक हॉलिवूडमधे घडतं. पण हा सिनेमा एक फ्रेंच निर्मिती आहे - हे मला टायटल्स पाहताना कळलं.) विकीपेडियावर दिलंय, की It was also the first film presented in the 4:3 aspect ratio to win since 1955's Marty, मग या aspect ratioला गूगल केलं. ती एक तांत्रिक बाब आहे हे तर झालंच, पण सिनेमाच्या एकत्रित प्रभावी परिणामामागे हे एक महत्त्वाचं कारण असावं - असं जाणवलं. ...

तंत्रज्ञान? नव्हे, ही तर बदलत्या काळाची सुरेखशी पाऊले!

नुकतीच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एका मोठ्या आणि प्रसिध्द दुकानात गेले होते. निमित्त होते तिथूनच काही महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या पेन-ड्राईव्हने अचानक संप पुकारण्याचे. तो पेन-ड्राईव्ह घेतला तेव्हा एकतर मला दुकानात शिरल्या शिरल्या कॅश-काऊण्टरजवळच मिळाला होता. शिवाय त्यादिवशी मी जरा घाईतही होते; अवघ्या पाच-दहा मिनिटांत ती खरेदी उरकून बाहेर पडले होते. थोडक्यात, तेव्हा त्या दुकानात मला नीटसा फेरफटका मारता आलेला नव्हता. पण मग माझ्या दुसर्‍या फेरीच्या वेळी मात्र मी ती कसर भरून काढली. तसेही, दुकानातल्या तथाकथित ‘सेल्स-एक्झिक्युटीव’नामक मनुष्यविशेषाने मला त्या पेन-ड्राईव्हची निर्मिती करणार्‍या कंपनीच्या कार्यालयात जाण्याचा मौलिक सल्ला देऊन दोन मिनिटांत वाटेला लावलेच होते. माझ्या फेरफटक्याची सुरूवात अर्थातच स्वयंपाकघरात वापरात येणार्‍या वस्तूंच्या विभागापासून झाली. वॉटर-प्युरिफायर्स्‌, मायक्रोवेव्ह ओव्हन्स्‌, मिक्सर-ग्राइण्डर्स्‌, सॅण्डविच-टोस्टर्स्‌, रेफ्रिजरेटर्स्‌ ही सर्व मंडळी आपल्याला ऐकून-पाहून-वापरून बर्‍याच वर्षांपासूनची तशी चांगली परिचित असलेली. पण त्यातही असलेली विविधता, तंत्रज्ञान...

पुस्तक परिचय - ’पंखाविना भरारी’

व्हीलचेअरवर बसलेले एखादे अपंग मूल आणि सोबत त्याचे पालक असे दृष्य सार्वजनिक ठिकाणी कधी दिसले, तर आपण काय करतो? तर, त्या मुलाचे अपंगत्त्व नक्की कशा प्रकारचे आहे त्याच्या तपशीलात शिरण्याच्या फंदात न पडता आधी नुसते हळहळतो, मग जे ‘त्यांच्या’ नशीबी आले ते आपल्याला भोगावे लागत नसल्याबद्दल मनोमन देवाचे आभार मानतो आणि पुढे चालायला लागतो. बस्स! काही वर्षांपूर्वी प्रसाद घाडी या शाळकरी वयाच्या मुलाला ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात गाताना जेव्हा मी टेलिव्हिजनच्या पडद्यावर प्रथम पाहिले, तेव्हाही त्याच्या व्हीलचेअरकडे पाहून मनोमन चुकचुकणे हीच माझी प्रमुख प्रतिक्रिया होती. पुढे काही दिवस त्याचा प्रसन्न चेहरा, खड्या आवाजातले गाणे आठवत राहिले; नंतर ते ही विसरायला झाले. ‘पंखाविना भरारी’ हे शरयू घाडी यांनी लिहिलेले पुस्तक हातात आल्यावरही ‘हाच तो, त्या कार्यक्रमात व्हिलचेअरवर बसून गायलेला मुलगा’ हेच आधी डोक्यात आले. त्याचे व्हिलचेअरवरचे जखडले जाणे हे असे नकळत मनात रुतून बसलेले होते. व्हिलचेअरवर बसून घराबाहेर जाणे तर दूरच, मुळात अंथरुणातून उठून, खरेतर कुणीतरी दुसर्‍याने उठवून व्हिलचेअरवर बसते करणे, हाच...

पुस्तक परिचय - ’आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.'

सध्या चाळीशीत किंवा पन्नाशीत असलेल्या पिढीला निरुपमा प्रधान या भारताच्या एक प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू होत्या हे कदाचित आठवत असेल. काही अपवाद वगळता (खासकरून क्रिकेट) आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेले आपले खेळाडू नंतर काय करतात, कुठे जातात याबद्दल आपल्याला फारसे ठाऊक नसते. त्याबद्दल जाणून घेण्याचा आपण विशेष प्रयत्नही करत नाही. या अनुषंगाने ‘आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.’ हे पुस्तक म्हणजे निरुपमा प्रधान यांनी बॅडमिंटन कारकीर्दीला निरोप दिल्यानंतरच्या त्यांच्या आयुष्याचा दीर्घ असा लेखाजोखा म्हणता येईल, जो त्यांनी स्वतःच्या शब्दांमधे वाचकांसमोर मांडलेला आहे. शीर्षकावरून सूचित होते, त्यानुसार जर्मनीतील तीस-पस्तीस वर्षांच्या वास्तव्याचे हे अनुभवकथन आहे. अतुल सोनाळकर यांच्याशी लग्न करून १९६८ साली निरुपमा प्रधान यांनी जर्मनीत (तेव्हाचा पश्चिम जर्मनी) पाऊल ठेवले. जास्तीत जास्त दीड ते दोन वर्षे तिथे रहायचे आहे या तयारीने त्या तिथे गेल्या होत्या. पण त्यांचे तिथले वास्तव्य वाढत गेले आणि पुढील पस्तीस वर्षे त्या तिथल्या मातीत जणू रुजूनच गेल्या. त्यांचा संसार, दोन्ही मुलांचे जन्म, त्य...

पुस्तक परीचय - ’सोन्याच्या धुराचे ठसके’

पूर्णपणे भिन्न भाषेशी, संस्कृतीशी, जीवनमानाशी काही कारणाने संबंध आला, तर त्याची तुलना आपल्या स्वतःच्या राहणीमानाशी, संस्कृतीशी करणे, दोन्हींतली साम्यस्थळे शोधणे, विरोधाभासांवर बोट ठेवणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी आठ-पंधरा दिवसांची परदेशी सहल केली, तरी प्रत्येकाच्या मनात अशा तौलनिक निरीक्षणांचा भरपूर साठा जमा होतो. मग काहीजण त्याला प्रकट रूप देतात, गप्पांचे फड रंगवून आपले अनुभवरूपी किस्से इतरांना सांगतात. त्या सहल-संचिताचा जीव तेवढाच असतो. पण जेव्हा पोटापाण्यासाठी प्रदीर्घ काळ परदेशात वास्तव्य करण्याची वेळ येते, तेव्हा परक्या संस्कृतीशी जुळवून घेतानाच्या अपरिहार्यतेतून झालेली सुरूवातीची ओढाताण, स्वतःला त्या मुशीत जाणीवपूर्वक घडवत जाण्याचा हळूहळू झालेला सराव आणि त्या ओघात व्यक्तीमत्त्व आणि वयोमान या दोहोंपरत्त्वे स्वतःशीच नोंदली गेलेली विविध निरीक्षणे ही नुसती निरीक्षणे न राहता सखोल आणि अभ्यासू चिंतनाची डूब घेत मनाचा तळ गाठतात. ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ हे डॉ. उज्ज्वला दळवी यांनी केलेले असेच एक प्रकारचे सखोल आणि अभ्यासू चिंतन आहे. हे चिंतन जगासमोर आणताना त्याचे स्वरूप तितक...