Posts

एका शर्टाची गोष्ट

नुकतीच एका लग्नाला जाऊन आले. लग्नासारखे समारंभ म्हणजे एकत्र भेटण्याचे, गप्पाटप्पा करण्याचे अगदी हुकुमी प्रसंग. अशा कुठल्याही समारंभाला हजेरी लावण्यामागे निदान माझं तरी हेच प्रमुख उद्दीष्ट असतं. एकाच ठिकाणी, एकाच वेळी अनेक नातेवाईक, सुहृद, मित्रमैत्रिणी भेटतात. सर्वजण बोलावल्यासरशी आले म्हणून यजमानही खूष असतात (निदान तसं दाखवतात) आणि याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे एक साग्रसंगीत जेवणाचं ताट आयतं पुढ्यात येतं! मला माहितीय, मनातल्या मनात सर्वांना हे कारण अगदी पुरेपूर पटलेलं आहे. विशेषतः दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघरातल्या ओट्याशी झुंजणार्‍या तमाम महिलावर्गाला... आणि काही अपवादात्मक पुरूषांनाही. (हो! आजकाल या रटरटत्या क्षेत्रात ही जमातही हळूहळू पाय रोवते आहे.) तर असंच ते ही एक लग्न होतं. ‘लग्न’ नामक मोतीचुराचा हा लाडू खाऊन पस्तावलेले, पस्तावूनही काही उपयोग नसतो हे उमगलेले अनेकजण आपापसांत गप्पा मारण्यात, सुखदुःखाच्या गोष्टी करण्यात मग्न होते. पस्तावलेली इतकी माणसं आसपास असूनही डोळ्यांवर कातडं ओढून घेऊन त्या मोतीचुराच्या लाडूची चव घेण्यास आसुसलेलं त्यादिवशीचं ‘उत्सवमूर्ती’ जोडपं एकीकडे...

एक अविस्मरणीय दिवस : आय.एम.एस.विक्रांतच्या सहवासात

Image
नौदल सप्ताहाची जाहीरात वर्तमानपत्रात पाहिली आणि अंगात एकदम उत्साह संचारला. विक्रांत या आपल्या युध्दनौकेला भेट देण्याची माझी फारा वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता बळावली होती. २८ नोव्हेंबर २००९ ते ६ डिसेंबर २००९ अशी (फक्त) आठ दिवस विक्रांत सर्वसामान्यांसाठी खुली राहणार होती. लग्गेच कॅलेंडर काढून सोयीचा २९ नोव्हेंबरचा रविवार मुक्रर करून टाकला. भेट द्यायची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी छापली होती. ‘सकाळी लवकरच तिथे पोचू, म्हणजे काही भानगडच नको’ असं म्हणून मी घरादाराला नवाच्या ठोक्यालाच बाहेर काढलं. दरम्यान, विक्रांतला भेट देऊन आलेल्या काही जणांचं ब्लॉगरूपी लेखन नेटवर सापडलं. ते वाचून काढलं. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार सी.एस.टी.च्या टॅक्सीवाल्यांना ‘टायगर गेट’(विक्रांत जिथे नांगरून ठेवली आहे तिथे जाण्याचा नौदलाच्या ताब्यातला दरवाजा) सांगितलेलं पुरतं असं कळलं. पण तेवढा जाणकार टॅक्सीवाला नेमका आमच्या नशिबी नव्हता. त्यानं टॅक्सी बरोब्बर उलट दिशेला नेली. मग यू टर्न मारून काही ठिकाणी विचारत विचारत शेवटी ठीक ११ वाजता आमची वरात त्या टायगर गेट परिसरात पोचली. टॅक्सीतून उतरल्यावर समोर...

दंतमनोरंजन

माणूस दंतवैद्याकडे का आणि केव्हा जातो? या प्रश्नाला खरं म्हणजे काही अर्थ नाही. का जातो? - नाइलाज म्हणून; आणि केव्हा जातो? - नाइलाज झाल्यावर! कुणालाही विचारलं तर या प्रश्नाला एवढी दोनच उत्तरं मिळतील. तसंही, कुठल्याही वैद्य अथवा डॉक्टरकडे कुणीही नाइलाज झाल्याशिवाय जातच नाही म्हणा. दंतवैद्याकडे तर नाहीच नाही. मी मात्र गेले काही महिने दंतवैद्याकडे मनोरंजन करून घ्यायला जाते आहे! म्हणजे तिथे जाण्यामागचं माझं उद्दिष्ट मनोरंजन अथवा करमणूक करून घेण्याचं नसतं पण माझी करमणूक होते, आपोआपच! या सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या मुलाच्या दातांवरच्या उपचारांपासून. आपल्या दातांना 'ब्रेसेस' लावून घेण्याची अतिशय, नितांत, प्रकर्षानं, भयंकर गरज असल्याचा त्याला साक्षात्कार झाला आणि आमचा दंतवैद्याचा शोध सुरू झाला. 'शोधा म्हणजे सापडेल' या म्हणीच्या आड, शोधल्या म्हणजे ज्या-ज्या सापडतील अशा जगभरातल्या अक्षरशः असंख्य गोष्टींची यादी लपलेली आहे... दातांचा दवाखाना ही त्यातलीच एक. माणसं दंतरुग्ण जरी नाईलाजानं बनत असली तरी दंतवैद्य मात्र अगदी आवडीनं, आनंदानं बनत असावीत. नाहीतर रोजच्या भाजी, वाणसामान आ...

एका कवितेच्या निमित्ताने...

माझा मुलगा आदित्य, इ. ९ वी. समाजशास्त्राची एक असाईनमेंट म्हणून त्यानं शाळेत कुठल्याही पूर्वतयारीशिवाय ही एक अतिशय सुंदर कविता लिहीली. विषय होता : वन्यजीव आणि त्यांचे संरक्षण. Heal the wild, Heal the life and when their distress becomes mild go for it and invoke the past as our forefathers did Live with the animals, not against them Learn to weave and hem Your existence with them And when their pain becomes mild Go for it, foresee the future As we would do in the due coming time Or Animals from ages, Would be pushed to the edges, And then to the pages...... Off goes their existence, If we don't do the present or their sheer living, will get small as a crescent Heal the wild, Heal the life आज ही कविता इथे टाकण्याचं अजूनही एक कारण आहे. दहावीच्या परिक्षा, अकरावीचे प्रवेश, एस.एस.सी. बोर्ड विरुध्द सी.बी.एस.ई. बोर्ड इ. वरून चाललेले सततचे गदारोळ आपण वर्तमानपत्रातून वाचतच असतो. त्या पार्श्वभूमीवर (मराठीचा सार्थ अभिमान बाळगून) हे सांगावंसं वाटतं की सी.बी.एस.ई. बोर्डाच्या ...

एक विकट हास्य... कुंच्याचं !!

एक दिवस घरातल्या कागदपत्रांच्या फाईल्स्‌मधे मी एक पावती शोधत होते. निरनिराळी महत्त्वाची पत्रं, पावत्या इ. गोष्टी त्या-त्या फाईलला लावण्याचं काम माझा नवराच करत असल्याने (मी त्या कामात कधी लक्ष घालत नाही हे ओघानं आलंच!) ऐनवेळेला नवर्‍याच्या अनुपस्थितीत हवा तो कागद अथवा पावती योग्य त्या फाईलमधे शोधणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं कामच असतं! नवर्‍यानं खरं म्हणजे प्रत्येक फाईलवर व्यवस्थित नाव, नंबर इ.च्या चिठ्ठ्या डकवलेल्या आहेत. तरीही इष्ट कागद मिळण्यापूर्वी ती विशिष्ट फाईल मला कमीतकमी दोनवेळा तरी अथपासून इतिपर्यंत धुंडाळावी लागते. म्हणजे मुळात मी योग्य ती फाईल उचललेली असते, आतले कागद पालटायलाही सुरूवात केलेली असते, भसाभसा कागद चाळताना मला हवा तो कागद नेमका त्याच्या आधीच्या कागदाला चिकटून पालटला जातो आणि एकाक्षणी अचानक त्या फाईलचा मागचा रंगीत पुठ्ठाच माझ्या पुढ्यात येतो. चरफडत, नवर्‍यावर वैतागत, ‘नेमकी हीच पावती या फाईलला कशी नाही लावली याने...’ असं स्वतःशी बडबडत मी कपाटातून अजून तीनचार फाईल्स्‌ धपाधप काढते. कधीकधी त्या फाईल्स्‌वर लावलेल्या चिठ्ठ्यांचा आणि मी शोधत असलेल्या कागदाचा आपसांत का...

खा, प्या, मजा करा, पण आधी हात धुवा !!

कीर्ती मागच्या आठवडय़ात कोल्हापूरला आमच्या घरातलं एक लग्न होतं. मला शाळा आणि क्लास बुडवणं शक्य नव्हतं. म्हणून आई-बाबा दोघंच जाऊन आले. शुक्रवारचा अर्धा दिवस, शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा आख्खा दिवस मी एकटी होते. मी प्रथमच एकटी राहणार होते, त्यामुळे आई जाताना शंभर सूचना करून गेली. त्यातल्या नव्व्याण्णव सूचना मी ऐकून सोडून दिल्या. एक मात्र लक्षात ठेवली आणि सांगितलेल्या वेळी बरोबर अमलातही आणली. ती म्हणजे शुक्रवारच्या रात्री घरी कुठल्या तरी मैत्रिणीला सोबतीला बोलावण्याची. ही सूचना एकदम ब्येष्ट होती. त्याच्या बदल्यात आईच्या इतर नव्व्याण्णव सूचनाच कशाला, एकशे नव्व्याण्णव आज्ञा पाळायलाही मी तयार होते. फक्त ‘मैत्रिणीला’च्या जागी मी ‘मैत्रिणींना’ इतकाच बदल केला. सुजी, दोन्ही अस्मिता आणि प्रज्ञा चौघी क्लासमधून थेट माझ्या घरीच आल्या. आल्या आल्या आधी आम्ही सगळ्यांनी मिळून टीव्हीवर ‘हॅना मॉंटाना’ बघितलं. इतर वेळी आम्ही आपापल्या घरात एकेकटय़ाच ती सीरियल पाहतो. त्या दिवशी सगळ्यांनी मिळून बघायला सही वाटलं. मायली सिरस त्यात कस्सली दिसते, कस्सली धमाल काम करते. रॉक स्टार म्हणून अगदी शोभून दिसते. आमच्य...