Posts

दंतमनोरंजन

माणूस दंतवैद्याकडे का आणि केव्हा जातो? या प्रश्नाला खरं म्हणजे काही अर्थ नाही. का जातो? - नाइलाज म्हणून; आणि केव्हा जातो? - नाइलाज झाल्यावर! कुणालाही विचारलं तर या प्रश्नाला एवढी दोनच उत्तरं मिळतील. तसंही, कुठल्याही वैद्य अथवा डॉक्टरकडे कुणीही नाइलाज झाल्याशिवाय जातच नाही म्हणा. दंतवैद्याकडे तर नाहीच नाही. मी मात्र गेले काही महिने दंतवैद्याकडे मनोरंजन करून घ्यायला जाते आहे! म्हणजे तिथे जाण्यामागचं माझं उद्दिष्ट मनोरंजन अथवा करमणूक करून घेण्याचं नसतं पण माझी करमणूक होते, आपोआपच! या सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या मुलाच्या दातांवरच्या उपचारांपासून. आपल्या दातांना 'ब्रेसेस' लावून घेण्याची अतिशय, नितांत, प्रकर्षानं, भयंकर गरज असल्याचा त्याला साक्षात्कार झाला आणि आमचा दंतवैद्याचा शोध सुरू झाला. 'शोधा म्हणजे सापडेल' या म्हणीच्या आड, शोधल्या म्हणजे ज्या-ज्या सापडतील अशा जगभरातल्या अक्षरशः असंख्य गोष्टींची यादी लपलेली आहे... दातांचा दवाखाना ही त्यातलीच एक. माणसं दंतरुग्ण जरी नाईलाजानं बनत असली तरी दंतवैद्य मात्र अगदी आवडीनं, आनंदानं बनत असावीत. नाहीतर रोजच्या भाजी, वाणसामान आ...

एका कवितेच्या निमित्ताने...

माझा मुलगा आदित्य, इ. ९ वी. समाजशास्त्राची एक असाईनमेंट म्हणून त्यानं शाळेत कुठल्याही पूर्वतयारीशिवाय ही एक अतिशय सुंदर कविता लिहीली. विषय होता : वन्यजीव आणि त्यांचे संरक्षण. Heal the wild, Heal the life and when their distress becomes mild go for it and invoke the past as our forefathers did Live with the animals, not against them Learn to weave and hem Your existence with them And when their pain becomes mild Go for it, foresee the future As we would do in the due coming time Or Animals from ages, Would be pushed to the edges, And then to the pages...... Off goes their existence, If we don't do the present or their sheer living, will get small as a crescent Heal the wild, Heal the life आज ही कविता इथे टाकण्याचं अजूनही एक कारण आहे. दहावीच्या परिक्षा, अकरावीचे प्रवेश, एस.एस.सी. बोर्ड विरुध्द सी.बी.एस.ई. बोर्ड इ. वरून चाललेले सततचे गदारोळ आपण वर्तमानपत्रातून वाचतच असतो. त्या पार्श्वभूमीवर (मराठीचा सार्थ अभिमान बाळगून) हे सांगावंसं वाटतं की सी.बी.एस.ई. बोर्डाच्या ...

एक विकट हास्य... कुंच्याचं !!

एक दिवस घरातल्या कागदपत्रांच्या फाईल्स्‌मधे मी एक पावती शोधत होते. निरनिराळी महत्त्वाची पत्रं, पावत्या इ. गोष्टी त्या-त्या फाईलला लावण्याचं काम माझा नवराच करत असल्याने (मी त्या कामात कधी लक्ष घालत नाही हे ओघानं आलंच!) ऐनवेळेला नवर्‍याच्या अनुपस्थितीत हवा तो कागद अथवा पावती योग्य त्या फाईलमधे शोधणं म्हणजे माझ्यासाठी एक मोठं कामच असतं! नवर्‍यानं खरं म्हणजे प्रत्येक फाईलवर व्यवस्थित नाव, नंबर इ.च्या चिठ्ठ्या डकवलेल्या आहेत. तरीही इष्ट कागद मिळण्यापूर्वी ती विशिष्ट फाईल मला कमीतकमी दोनवेळा तरी अथपासून इतिपर्यंत धुंडाळावी लागते. म्हणजे मुळात मी योग्य ती फाईल उचललेली असते, आतले कागद पालटायलाही सुरूवात केलेली असते, भसाभसा कागद चाळताना मला हवा तो कागद नेमका त्याच्या आधीच्या कागदाला चिकटून पालटला जातो आणि एकाक्षणी अचानक त्या फाईलचा मागचा रंगीत पुठ्ठाच माझ्या पुढ्यात येतो. चरफडत, नवर्‍यावर वैतागत, ‘नेमकी हीच पावती या फाईलला कशी नाही लावली याने...’ असं स्वतःशी बडबडत मी कपाटातून अजून तीनचार फाईल्स्‌ धपाधप काढते. कधीकधी त्या फाईल्स्‌वर लावलेल्या चिठ्ठ्यांचा आणि मी शोधत असलेल्या कागदाचा आपसांत का...

खा, प्या, मजा करा, पण आधी हात धुवा !!

कीर्ती मागच्या आठवडय़ात कोल्हापूरला आमच्या घरातलं एक लग्न होतं. मला शाळा आणि क्लास बुडवणं शक्य नव्हतं. म्हणून आई-बाबा दोघंच जाऊन आले. शुक्रवारचा अर्धा दिवस, शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा आख्खा दिवस मी एकटी होते. मी प्रथमच एकटी राहणार होते, त्यामुळे आई जाताना शंभर सूचना करून गेली. त्यातल्या नव्व्याण्णव सूचना मी ऐकून सोडून दिल्या. एक मात्र लक्षात ठेवली आणि सांगितलेल्या वेळी बरोबर अमलातही आणली. ती म्हणजे शुक्रवारच्या रात्री घरी कुठल्या तरी मैत्रिणीला सोबतीला बोलावण्याची. ही सूचना एकदम ब्येष्ट होती. त्याच्या बदल्यात आईच्या इतर नव्व्याण्णव सूचनाच कशाला, एकशे नव्व्याण्णव आज्ञा पाळायलाही मी तयार होते. फक्त ‘मैत्रिणीला’च्या जागी मी ‘मैत्रिणींना’ इतकाच बदल केला. सुजी, दोन्ही अस्मिता आणि प्रज्ञा चौघी क्लासमधून थेट माझ्या घरीच आल्या. आल्या आल्या आधी आम्ही सगळ्यांनी मिळून टीव्हीवर ‘हॅना मॉंटाना’ बघितलं. इतर वेळी आम्ही आपापल्या घरात एकेकटय़ाच ती सीरियल पाहतो. त्या दिवशी सगळ्यांनी मिळून बघायला सही वाटलं. मायली सिरस त्यात कस्सली दिसते, कस्सली धमाल काम करते. रॉक स्टार म्हणून अगदी शोभून दिसते. आमच्य...

मी, एक ‘गजर’वंत

अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अखिल मानवजातीची ही जी काही धावपळ, धडपड चालली आहे ती या गरजा भागवण्यासाठीच. त्या धावपळीत माझाही रोजचा थोडाफार वाटा असतोच. या दैनिक धावपळीचं अविभाज्य अंग म्हणजे पहाटे लवकर उठणे आणि माझं घोडं, जागं होता होता, पहिलं तिथेच अडतं! त्यामुळे, रोजची ही धावपळ सत्कारणी लावायची असेल तर माझ्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या यादीत अजून एका गोष्टीचा समावेश होणं अतिशय गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे गजराचं घड्याळ! रोज सकाळी कानाशी घड्याळाच्या गजरानं बोंबाबोंब करणं ही माझी दिनक्रमातली पहिली आणि मूलभूत गरज आहे. त्या गजरानं जर योग्य वेळी मला उठवलं नाही तर मग (उठण्याच्या बाबतीत) माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असणार्‍या बाकीच्या दोघांचं काही खरं नसतं... मग आदल्या दिवशीच्या उरलेल्या ‘अन्ना’चा नाश्ता उरकावा लागतो, इस्त्री-बिस्त्रीच्या फारश्या फंदात न पडता शाळेची आणि ऑफिसची ‘वस्त्रं’ अंगावर चढवावी लागतात आणि धावतपळत ‘निवारा’ सोडावा लागतो. गजराच्या मदतीशिवाय स्वतःहूनच पहाटे उठणारे आणि उठल्या उठल्या टवटवीतपणे लगेच आपापल्या कामाला लागणारे तमाम ‘उषाचर’ प्राणी म्हण...

हिमालय ही चीजच तशी आहे...!!

Image
उत्तर भारतातली कुठलीही सहल करायची म्हटली की आपल्याला आधी आठवते ती तिथली थंडी आणि पाठोपाठ आठवतो तो बर्फ. ‘नॉर्थ’ची सहल केली पण बर्फ बघितला नाही असं जर कुणी आपल्याला सांगितलं तर गोव्याला जाऊन समुद्र न बघता परतलेल्या माणसासारखं आपण त्या व्यक्तीला लगेच मूर्खात काढू. उत्तर भारताचं पर्यटन आणि बर्फाच्छादित शिखरं यांचं असं इतकं घट्ट नातंच आपल्या मनात आपण बाळगलेलं आहे.त्यामुळे एखादा वारकरी विठ्ठलदर्शनासाठी जितका आसुसलेला असतो तितकीच, किंबहुना त्याहून कणभर जास्तच मी आसुसलेले होते त्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन घेण्यासाठी आणि ‘देवभूमी उत्तरांचल’मधे प्रवेश करून दोन दिवस उलटून गेले तरी त्या दर्शनाचा लाभ काही होत नव्हता.काय गम्मत आहे! तिकडे देशाच्या दुसर्‍या टोकाला केरळ पर्यटनाच्या जाहीरातीतही आपण ‘गॉड्स ओन कंट्री’ असं लिहीलेलं वाचतो आणि नवी दिल्लीहून राष्ट्रीय महामार्ग क्र. ८७चं बोट पकडून नैनितालला जाताना उधमसिंगनगरच्या जरासं अलिकडेही ‘देवभूमी उत्तरांचलमें आपका स्वागत है।’ अशा पाटीनंच आमचं स्वागत केलं. (उधमसिंग या शब्दामुळे असेल कदाचित पण इतकी वर्षं उधमसिंगनगर हे गाव/शहर पंजाबमधे आहे असंच मला वाट...

कॉर्बेटचा वाघ

"काय मग? कशी झाली तुमची ट्रीप? कॉर्बेटमध्ये दिसला का काही वाघ-बिघ?" नैनीताल-मसूरी-जिम कॉर्बेट नॅशनल पार्क अशी, म्हणजे थोडक्यात उत्तरांचलची सहल करून आल्यानंतरच्या आठवड्याभरात किमान दहा पंधरा वेळा तरी हा प्रश्न आम्हाला विचारला गेला. (आणि त्या प्रश्नाला आम्ही तितक्यांदाच नकारार्थी उत्तर दिलं. खोटं कशाला बोलू?) खरंतर उत्तरांचल म्हणजे हिमालयाच्या जवळपास(च) कुठेतरी येतं इतपत सामान्यज्ञान सर्वांनाच असतं। पण म्हणून "मसूरीला दिसली का काही बर्फाच्छादित शिखरं-बिखरं?" असा प्रश्न कुणालाही विचारावासा वाटला नाही. त्या प्रश्नाला तर आम्ही ‘होऽऽ! भरपूर...’ असं उत्तर द्यायला आसुसलो होतो. पण ते नाही; व्याघ्रदर्शनाची मात्र पदोपदी चौकशी!जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट देऊन आलेले, किंबहुना कुठल्याही नॅशनल पार्कला भेट देऊन आलेले, न आलेले, सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आमचं ते नकारार्थी उत्तर ऐकल्यावर एक प्रकारचं मंद स्मित झळकायचं. म्हणजे, ‘असंच पाहीजे! तुम्हाला पण नाही ना दिसला? आम्हाला पण नव्हता दिसला.’ किंवा ‘नाही दिसत ना तिथे वाघ? म्हणूनच आम्ही तिथे जाण्याच्या फंदात पडत नाही.’ असे काहीतरी भाव ...