Posts

मतदान आणि आनंदाश्रू

मी सुयश काटकर. एफ. वाय. बी. एस्स. सी. मागच्या आठवड्यात पेपरमध्ये एक छोटीशी बातमी वाचली - मुंबई अतिरेकी हल्यानंतरची एक उपाययोजना म्हणून गेट-वे च्या समुद्रातल्या सगळ्या होडी, बोटी हटवण्यात येणार आहेत म्हणे! का? तर अतिरेकी समुद्रातून आले म्हणून! यडचाप आहेत का हे राजकारणी, पोलीस? बोटी हटवणार काय... त्याच नियमानं मग लोकलगाड्यांत बॉंबस्फोट होतात म्हणून लोकलगाड्या बंद करा किंवा WTC वर विमानं धडकली म्हणून अमेरिकेतली विमानं बंद करा! अरे, काय हे! इनको कोई लेके जाओ या ऽ ऽ र! बोटी बंद केल्या तर मग लोकांनी एलिफंटा केव्हज पहायला जायचं कसं? तो तुमचा सांस्कृतिक ठेवा की काय आहे ना? अरे, साधा विचार करा... बोटी बंद झाल्या, एलिफंटाची वर्दळ कमी झाली की हेच अतिरेकी एक दिवस तिथेही आपला अड्डा बनवतील! आणि उद्या, म्हणे, समुद्रात तुम्ही शिवाजीमहाराजांचं भव्य वगैरे स्मारक उभारणार आहात! मग तिथेही लोकांनी कसं जावं असं तुमचं म्हणणं आहे? पोहत की उडत? कॉलेज कॅंटीनमध्ये सगळ्यांना ही बातमी सांगितली. ते ऐकून सम्या लगेच उठला आणि म्हणाला, "चला, बिना बोटींचा गेट-वे चा समुद्र कसा दिसतो ते बघून येऊ"! हा सम्या सुद्...

सुजी, की आणि जागतिक बदलाचे वारे

मी सुजाता काटकर। इ. ९ वी. सध्या आमच्या वर्गात वार्षिक परिक्षेनिमित्त निबंधलेखनाचा सराव चालू आहे। तसा प्रत्येक विषयाचा काही ना काही सराव चालूच आहे. तरी गणितं किंवा सायन्सचं जर्नल त्यातल्या त्यात बरं असतं - म्हणजे पुस्तकातून तश्या प्रकारची गणितं पहायची आणि ती पाहून ही सोडवायची. सायन्सच्या जर्नलमधल्या आकृत्या वगैरे तर सरळ सरळ पुस्तकातून कॉपी करायच्या असतात. पण भूगोलाचे नकाशे किंवा निबंध आला की वाट लागते. निबंधाला तर फुल्ल आपापलंच डोकं चालवावं लागतं. गेला आठवडाभर त्या बराक ओबामाच्या शपथविधीनं आणि निबंधानं डोकं पकवलं. वीस लाख लोक जमले होते म्हणे त्या शपथविधीच्या जागी! दुसऱ्या दिवशी एक फॉरवर्डेड मेल आली होती, ती दादा दाखवत होता बाबांना - त्या गर्दीत एक माणूस ’ARREST BUSH’ असा फलक घेऊन उभा आहे असा एक फोटो होता. (असल्या काही मेल्स आल्या की दादा अगदी लगेच शिष्ठासारखा बाबांना बोलावून दाखवतो. मला मात्र तेव्हा कॉंप्युटरच्या आसपासही फिरकू देत नाही!) तरी त्यादिवशी मी त्यांच्या मागे उभं राहून पाहिलीच ती मेल. तो फोटो आणि तो फलक पाहून दादा एकदम खूप एक्साईट झाल्याचं दाखवत होता... उगीच! (मुंबईवर अतिरे...

अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि अश्वेत टी. व्ही. स्क्रीन!

मी कीर्ती सुपुत्रे. इ. ९ वी. सध्या आमच्या वर्गात वार्षिक परीक्षेसाठी निबंधलेखनाचा सराव चालू आहे. आमच्या बाई म्हणतात की "नेहमीच्या ’दूरदर्शन : शाप की वरदान’, ’फलाटाचे आत्मवृत्त’, ’जिचे हाती पाळण्याची दोरी... ’ यांसारख्या हमखास येणाऱ्या विषयांव्यतिरिक्त - (त्याला आम्ही मैत्रिणी ’हमखास भेडसावणारे विषय’ म्हणतो! ) - तर त्यांव्यतिरिक्त चालू घडामोडींपैकी एखाद्या विषयावर पण निबंध लिहिता आला पाहिजे. " आला पाहिजे तर आला पाहिजे! पण आजच्या ’चालू घडामोडी’ या परीक्षेच्या वेळेपर्यंत ’घडून गेलेल्या घडामोडी’ नाही का होणार? मग आता केलेल्या सरावाचा काय उपयोग तेव्हा? आणि परीक्षेच्या वेळी ज्या घडामोडी चालू असतील त्यावर तेव्हा बिनसरावाचा निबंध कसा काय लिहायचा? मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर बाईंनी आम्हाला "त्यासंदर्भात एकतरी निबंध येणारच" असं ठामपणे सांगितलंय. "पुढचे काही दिवस रोजचा पेपर वाचा, अग्रलेख वाचा, त्या विषयाची तयारी करून ठेवा" असंही त्या सांगत असतात. पण रोजच्या पेपरमध्ये त्याविषयी जास्त काही माहिती मिळतच नाही. ’कसाब आमचा नाही’ आणि ’तुमच्या देशातले अतिरेकी तळ उद्ध्...

पु. ल. आणि आजकालची मुलं

स्त्री मासिकाच्या जुलै-२०१२च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला. ---------------------------------------------------- लहानपणी शाळेत असताना जून महिन्यात नवीन वर्षाची पाठ्यपुस्तकं आणली की त्यातलं मराठी (बालभारती)चं पुस्तक मी सगळ्यात आधी अधाश्यासारखं वाचून काढायचे। इयत्ता सातवी किंवा आठवीत मराठीच्या पुस्तकात ’परोपकारी गंपू’ असा एक धडा होता. तो मला वाचल्यावाचल्याच अतिशय आवडला होता. आमच्या सुदैवानं तेव्हा शाळा-शिक्षकही चांगले होते. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरही बाई तो धडा केव्हा शिकवायला घेतील याची मी आतुरतेनं वाट पाहिल्याचं मला आजही चांगलं आठवतंय. ’पु. ल. देशपांडे’ या असामीशी ती माझी पहिली भेट होती. आमच्या अजून एका मोठ्या सुदैवानं त्या धड्याच्या सुरूवातीलाच कंसात एक टीप दिलेली होती की हा धडा पु. ल. देशपांडे लिखित ’व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातून घेतलेला आहे. वाचनालयातून ताबडतोब आणून तेही पुस्तक मी अधाश्यासारखं वाचून काढलं होतं... त्याच्या पुढच्याच वर्षी (बहुतेक इयत्ता नववीत) ’अपूर्वाई’ पुस्तकातला एक उतारा धडा म्हणून होता. सविस्तर उत्तरे लिहा, संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, लेखकाचा दृष्टीक...

... गेला सूर्यास्त कुणीकडे!

"काय अप्रतिम आलाय फोटो!... रंग कसले सॉलिड दिसतायेत!... मावळत्या सूर्याचा केशरी गोळा बघ ना, काय छान वाटतो फोटोत...!... आणि त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब... " मी आनंदून म्हणाले। यावर, माझ्या एकुलत्या एक श्रोत्याचा म्हणजे माझ्या मुलाचा चेहेरा कोराच! मला नाही म्हटलं तरी रागच आला। आदल्याच दिवशी मी काढलेला तो सूर्यास्ताचा फोटो इतका सुंदर आला होता पण जरा कौतुक होईल तर शप्पथ! "मी काढलाय ना हा फोटो! नाहीच आवडणार तुला... तू काढलेल्या फोटोंचं मात्र मी अगदी तोंडभरून कौतुक करायचं... " मी जरा घुश्श्यातच त्याला म्हटलं. पण पठ्ठ्या चेहेऱ्याच्या कोऱ्या कागज पे या फोटोच्या प्रशंसेचं नाम लिखायला काही तयार नव्हता। उलट मगाशी त्या कोऱ्या कागदावरच्या आडव्या ओळी तरी किमान दिसत होत्या, माझ्या या वाक्यानंतर त्या पण गायब झाल्या। "छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंदच घेता येत नाही तुम्हाला... " मी माझी टेप पुढे सुरू ठेवली। "आई, आजपर्यंत अश्याच किमान शंभर-दीडशे छोट्या गोष्टींचा आनंदही घेतलाय आणि कौतुकही केलंय, बरं का! " चेहेऱ्याच्या कोऱ्या कागदावर अखेर एक वाक्य खरडून तो तिथून उठून...

दोन अनुत्तरित, गहन प्रश्न.

रोजच्यासारखीच एक घाईगर्दीची सकाळ. नवरा ऑफीसला निघून गेलेला होता; माझ्या कामांचं पहिलं सत्र आटोपलं होतं. (रोजच सकाळी नवरा एकदा(चा) घराबाहेर पडला की मला उगीचच एखादा गड सर केल्यासारखं वाटतं.) थोड्याच वेळात माझ्या तीन-चार वर्षांच्या मुलाला शाळेत सोडायला जायचं होतं. माझी कामाची घाई आणि त्यात मुलाची लुडबुड सुरू होती. त्याच्याबरोबर काहीतरी गाणी म्हणत, बडबड करत मी आता त्याचा किल्ला लढवत होते. मध्येच तो थोडा वेळ दुसऱ्या खोलीत जायचा आणि काही न सुचल्यासारखा परत यायचा. असं तीनचारदा झालं आणि अचानक त्यानं मला प्रश्न केला - "आई, चिमणी का असते गं? "... भरधाव वेगाने निघालेल्या गाडीसमोर अचानक एखादी म्हैस वगैरे यावी तशी मी गप्पकन थांबले. एखाद्या नवशिक्या गोलंदाजानं ऐन भरातल्या फलंदाजाला अनपेक्षितरित्या चकवून बाद करावं तसं माझ्या मुलानं हा प्रश्न विचारून मला ’क्लीन बोल्ड’ केलं. क्षणभर मी करत असलेलं काम विसरले. चिमणी का असते? म्हणजे?? मला वाटलं आपण ऐकण्यात काहीतरी चूक केली असेल. म्हणून त्याला परत विचारलं. तर मगाचच्या त्या फलंदाजाच्या विकेटचा ’ऍक्शन रीप्ले’ पाहावा लागला... "चिमणी का असते? ...

हा प्रत्यय’च’ हे करू शकतो!

वाक्यातल्या एखाद्या मुद्यावर भर द्यायचा असेल की आपण ’च’ किंवा ’सुद्धा’ असे प्रत्यय वापरतो. मराठी भाषेतल्या या ’च’च्या प्रत्ययाकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. पण हा प्रत्यय ’लई पॉवरबाज’ आहे असं माझं मत आहे. ’कुठल्याही दोन काड्या हलवून चौकोनाचा अष्टकोन करा’ वगैरे असली जी कोडी असतात त्यांत त्या दोन काड्यांमध्ये जी समोरचं दृश्य क्षणार्धात बदलायची ताकद असते तशीच ताकद या ’च’च्या प्रत्ययात असते. वाक्यातल्या वेगवेगळ्या शब्दांना हा ’च’चा प्रत्यय लावला की त्या वाक्याचा अर्थ लगेच बदलतो. उदाहरणादाखल एखादं अगदी साधं वाक्य घेऊ - ’मुलं प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात. ’ हे ते वाक्य.आता यातल्या एकेका शब्दाला पुढे ’च’ लावला की अर्थ कसा बदलतो ते पाहा. * मुलंच प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात. (म्हणजे, बाकी कुणी प्रश्न विचारले तरी चालतात. पण मुलं मात्र भंडावून सोडतात. ) * मुलं प्रश्नच विचारून मोठ्यांना भंडावून सोडतात. (म्हणजे, मुलांनी बाकी काही केलं तरी चालतं. पण प्रश्न विचारले की मोठे वैतागतात. ) * मुलं प्रश्न विचारूनच मोठ्यांना भंडावून सोडतात. (म्हणजे, मोठ्यांना भंडावून सोडण...