Posts

गोळीबाराच्या खुणा... अश्या आणि तश्या.

Image
आत्ता चाळीशीत प्रवेश करणारे माझ्यासारखे अनेकजण ऐंशीच्या दशकातील पंजाबमधील हिंसाचाराच्या बातम्या ऐकत, वाचत मोठे झालेले आहेत. एकमेव दूरदर्शनचं चॅनल असण्याच्या त्या काळात संध्याकाळच्या प्रादेशिक किंवा रात्रीच्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये खलिस्तान, भिंद्रनवाले, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, लोंगोवाल, अकाली दल, सुवर्ण मंदीर, ऑपरेशन ब्लू-स्टार या संज्ञाच सतत कानावर पडायच्या. इंदिरा गांधींची हत्या, नंतर (चक्क पुण्यात) जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या, त्याबद्दलच्या बातम्या, त्यामुळे काहीसे सटपटलेले घरातल्या मोठ्यांचे चेहरे हे सर्व अजूनही माझ्या चांगलं लक्षात आहे. तेव्हा शाळेत येता-जाता रस्त्यात एखाददुसरा फेटेवाला शीख दिसला तर त्याला बावरल्या नजरेनं निरखलं जायचं. इंदिरा गांधींच्या हत्येच्या दुसर्‍या दिवशी सकाळी त्याबद्दलच्या मोठ्यांच्या सर्व चर्चा ऐकल्यावर, ताजं वर्तमानपत्र घरच्या सर्वांचं वाचून झाल्यावर, मी पुन्हा गुपचूप हातात घेतलं होतं आणि त्यातलं सतवंतसिंग आणि बियांतसिंगचं वर्णन दोन-तीनदा वाचलं होतं. एका सुरक्षारक्षकानेच हत्या करण्यातला विरोधाभास आणि त्या सुरक्षारक्षकाचं शीखधर्मीय असण...

एका वाक्यातलं आर्ट ऑफ लिव्हिंग

शाळेत असताना ‘सुविचार’ हा एक छळवाद मागे लागलेला असायचा. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच्या सूचनाफलकावर आणि नंतर वर्गातल्या फळ्यावर रोज एक नवा सुविचार लिहिण्याचं काम आळीपाळीने करावं लागायचं. सहावी-सातवीत असेपर्यंत त्या सुविचारांचा पुरवठा न चुकता मराठीच्या बाईंकडून व्हायचा. आठवीपासून ती ही अतिरिक्त जबाबदारी अंगावर येऊन पडली. बर्‍याच वेळेला असंही व्हायचं की जी वाक्यं आम्ही ‘सुविचार!’ म्हणून निवडायचो ती बाईंच्या मते अगदीच साधी ठरायची. पुन्हा, ‘अति तिथे माती’सारखी घासून गुळगुळीत झालेली वाक्यं लिहायची म्हणजे शान के खिलाफ! त्यातूनच कधीतरी सुविचाराच्या जागी एखादं संस्कृत सुभाषितही चालतं हे कळलं. कळल्यावर बर्‍यापैकी हायसं वाटल्याचं मला अजूनही आठवतंय. मग, वर्गात सर्वांसमक्ष ज्यांचा अर्थ सांगणं त्यातल्या त्यात सोपं जाईल अशी सुभाषितं संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातून शोधून आम्ही फळ्यावर लिहायचो. सुविचारांचा अन्वयार्थ लावण्याच्या दृष्टीनं मराठी (आणि काही अंशी संस्कृत) त्यातल्या त्यात बरं पडायचं. इंग्रजीची मात्र त्या आघाडीवर जरा कठीणच अवस्था होती. काहीकाही इंग्रजी सुविचार तर एखाद्या अत्यंत अवघड कोड्याप्रमाणे ...

पुस्तक परिचय : 'द फर्म'

रविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख. मूळ लेख  इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ------------------------------- ‘The Firm’ ही जॉन ग्रिशॅमची पहिली अशी कादंबरी की ज्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळाली. वकिली पेश्याच्या पार्श्वभूमीवरील वेगवान कथानक, थरारक घटनांची तितक्याच कुशलतेने केलेली मांडणी ही ग्रिशॅमच्या लेखनातील वैशिष्ट्ये या कादंबरीतदेखील आढळतात. या कादंबरीची अनिल काळे यांनी अनुवादित केलेली आवृत्ती ‘द फर्म’ याच शीर्षकाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. ही कादंबरी मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. मु्खपृष्ठावर वरच्या भागात एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचे वाटावे असे चित्र आणि त्याखाली अंधाऱ्या रात्री कशापासून किंवा कुणापासूनतरी लांब पळू पाहणारा एक उंची पेहरावातील तरुण... हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षण घेऊन नुकताच बाहेर पडलेला हा तरुण वकील आहे मिचेल मॅकडिअर ऊर्फ मिच. अतिशय हुशार असलेल्या मिचने प्रतिकूल कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेले असते. साहजिकच तो आणि त्याची सुस्वरूप पत्नी अ‍ॅबी ...

पुस्तक परिचय - आवा

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. २० फेब्रुवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख. (मूळ लेख इथे  वाचता येईल.) ------------------------------------------ चित्रा मुद्‌गल या हिंदीतील नावाजलेल्या लेखिका. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा कामगार चळवळींशी अगदी जवळून संबंध आला. कामगारांच्या आणि विशेषतः त्या समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या; अनुभवल्या. त्या सर्व अनुभवांचा परिपाक म्हणजे त्यांची ‘आवा’ ही कादंबरी. आवा - म्हणजे कुंभाराची भट्टी. कादंबरीत ही भट्टी प्रतिक बनून निरनिराळ्या रूपांत वाचकांसमोर येते. कामगारांच्या दैनंदिन जीवनात परिस्थितीचे चटके देणारी भट्टी, चंगळवादी समाजाची जणू खाजगी मालमत्ता भासणारी पैश्यांची ऊब देणारी भट्टी, आपल्याला निव्वळ उपभोग्य वस्तू मानणार्‍या समाजाला खडसावू पाहणारी स्त्री-क्षमतेची भट्टी आणि भविष्याची स्वप्ने पाहणार्‍या तरुणवर्गाच्या मानसिकतेची भट्टी. नायिका नमिता पांडेय ही विशीतील तरूणी. कामगार चळवळीतील आघाडीचे नेते असलेले तिचे वडील पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. घरची अर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे पाच जणांच्या कुट...

आर.टी.ओ.च्या नानाची... !!!

माझा दुचाकीचा लायसन्स मागच्या महिन्यात संपुष्टात आला. आता याला माझा वेंधळेपणा म्हणा, दुर्दैव म्हणा किंवा योगायोग म्हणा पण हे माझ्या लक्षात आलं ते लायसन्सनं ‘राम’ म्हटल्यानंतरच. यातला वेंधळेपणा हा की नूतनीकरणाची कुणकुण मला आधीचे २-३ महिने लागलेली होती आणि तरीही मी लक्षात ठेवून वेळेवर ते काम केलं नाही; दुर्दैव आणि योगायोग असे की आदल्या महिन्याच्या ज्या तारखेला लायसन्सनं शेवटचा श्वास घेतला होता, चालू महिन्याच्या नेमक्या त्याच तारखेला नूतनीकरण नक्की कधी आहे हे पाहण्याच्या उद्दीष्टानं मी अगदी कॅलेंडर बघून दिवस ठरवल्यासारखा तो उघडून पाहिला. एक महिन्यापूर्वीच आपला लायसन्स होत्याचा नव्हता झालाय हे लक्षात आल्यावर माझा चेहराही क्षणार्धात तसाच म्हणजे होत्याचं नव्हतं झाल्यासारखा झाला. (या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी इंग्रजीत It dawned upon me... असा एक अतिशय समर्पक शब्दप्रयोग आहे. प्रत्येक भाषेची अशी सौदर्यस्थळं असतात. त्यांना त्या त्या प्रसंगी दाद दिलीच पाहीजे, नाही का?) गेला महिनाभर आपण गावभर चक्क विनापरवाना गाडी चालवत होतो हे जाणवलं. तेवढ्या दिवसांत किमान पाच ते सहा वेळा ट्रॅफिक हवालदाराला दिल...

पुस्तक परिचय : 'कथा अग्निशिखांच्या'

लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. ३० जानेवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख. मूळ लेख  इथे  किंवा  इथे  (स्क्रोल-डाऊन करून) वाचता येईल. ----------------------------------------- सशक्त माहितीपट स्वातंत्र्यसंग्रामाचे धगधगते कुंड. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दीडशे वर्षे त्यात लाखो-करोडो आयुष्यांची आहुती पडली. त्यातल्या स्त्रियांच्या बलिदानाला कायमच दुय्यम स्थान मिळाले. पण त्याकाळच्या स्त्री-स्वातंत्र्यसैनिकांनी कधीही याची तमा बाळगली नाही. कधी स्थानिक पातळीवर तर कधी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर त्यांनी निष्ठेने आपली कर्तव्ये पार पाडली. स्वातंत्र्यलढ्यात खारीचा वाटा उचलला. महात्मा गांधी, आगरकर, कर्वे, आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी जी शिकवण दिली ती अंगिकारून आपापल्या परीने महान देशकार्य आणि समाजकार्य करणार्‍या अश्याच एकवीस अग्निशिखांचा परिचय लेखिका वीणा गवाणकर यांनी आपल्या ‘कथा अग्निशिखांच्या’ या पुस्तकात करून दिला आहे. हे पुस्तक छोटेखानी दिसत असले तरी त्यामागे बरेच संशोधन दडले आहे हे वाचताना पदोपदी जाणवते. पुस्तक वाचताना एखादा सशक्‍त माहितीपट पाहत असल्य...