Posts

पहिला धडा

केशव गजाभाऊ कदम. वय वर्षे २२. नोकरीत फारसा रस नसलेला एक पदवीधर; आई वडील नोकरी शोध म्हणून मागे लागलेले असताना आजकाल काही नवे सवंगडी भेटलेला, आपणही त्यांच्यातलंच एक व्हायचं या वेडानं हळूहळू झपाटायला लागलेला एक पदवीधर; ना उच्च, ना कनिष्ठ, नुसत्याच मध्यमवर्गाचा तरूण प्रतिनिधी असा एक पदवीधर. गेले काही दिवस केशव खूप उत्साहात होता. निवडणुका जाहीर होणार होत्या. पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मिरवणारे केशवचे नवे सवंगडी त्याला अधूनमधून ‘समाजविधायक’ कामांमध्ये मदत करायला बोलवत असत. केशवनं ओळखलं होतं की हीच संधी आहे. आपण मन लावून, तहानभूक विसरून, झपाटून पार्टीचं पडेल ते काम करू. कॉलेजातली पदवी तर मिळवून झाली पण आता या निवडणुका संपेस्तोवर आपल्या नावापुढे ‘पार्टीचा तरूण कार्यकर्ता’ ही पदवीही झळकायलाच हवी. त्यादृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे हे देखील केशवनं तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा सात‍आठ दिवसांपूर्वी दिनेशकरवी संभादादांनी त्याला अनपेक्षितपणे बोलावून घेतलं होतं. त्यादिवशी दादांनी त्याच्यावर सोपवलेली एक महत्त्वाची कामगिरी आज त्याला पार पाडायची होती. ‘आता आई-आप्पांना समजेलच थोड्या दिवसांत की ...

तेव्हा आणि आता

(या प्रसंगांमधला ‘तेव्हा’ म्हणजे साधारण वीस वर्षांपूर्वीचा काळ आणि ‘आता’ म्हणजे सध्याचा काळ समजावा.) --------------------------------------------------------------------- तेव्हा मुलगी (वय वर्षे १४) : आई, शाळेच्या युनिफॉर्मला इस्त्री करू? आई : युनिफॉर्मला काय करायचीये इस्त्री-बिस्त्री? उगीच नुसते नखरे नकोयेत शाळेत जाताना ... !! आता आई : अगं, किती हा आळशीपणा... युनिफॉर्मला जरा इस्त्री-बिस्त्री कर ना. मुलगी (वय वर्षे १४) : असू दे गं! मला बोअर होतं रोज-रोज इस्त्री करायला... ------------------------------------------------ तेव्हा वडील (आपल्या शाळकरी मुलाला) : अरे, काय सारखी रेडियोवरची गाणी ऐकत बसतोस... जरा कधीतरी बाहेर खेळत जा... आता वडील (आपल्या शाळकरी मुलाला) : अरे, काय सारख्या व्हिडीओ गेम्स खेळत असतोस... जरा कधीतरी गाणी-बिणी पण ऐकत जा... !!! ------------------------------------------------ तेव्हा मुलगा : आई, या सुट्टीत पण बालनाट्य बघायला नेशील ना, प्लीऽऽऽज... आता मुलगा : या सुट्टीत पण बालनाट्य?? नको ऽऽऽ... आई, प्लीऽऽज! ------------------------------------------...

सांगड : झेंडावंदनाची, दहीहंडीची आणि विज्ञानाची!

किर्ती समाजशास्त्राचं प्रोजेक्ट संपलं तशी शाळेत पंधरा ऑगस्टच्या विज्ञान-प्रदर्शनाची गडबड सुरू झाली. पण आमच्या पाचजणींपैकी कुणीच त्यात भाग घेतलेला नसल्यामुळे जरा बरं होतं. प्रदर्शनात भाग घेतलेला नसला तरी प्रदर्शन बघायला आम्हाला आवडतं. ते आम्ही करणारच आहोत. पण दरम्यान आम्ही आपापसांत एक वेगळाच प्लॅन केला होता. प्रज्ञाच्या आत्याच्या घराजवळ एका मुलींच्या गोविंदा-पथकाची रोज रात्री प्रॅक्टिस असते. प्रत्यक्ष गोकुळाष्टमीदिवशी गर्दीत जाऊन ‘लाईव्ह दहीहंडी’ कधीच बघता येत नाही. म्हणून आम्ही काल ती प्रॅक्टिस बघायलाच गेलो होतो. प्रज्ञाची आई आमच्या बरोबर आली होती. एखाद्या हिंदी सिनेमाच्या जाहिरातीसाठी नाही का ते ‘द मेकिंग ऑफ अमूक’, ‘बिहाईंड द सीन्स् ऑफ तमूक’ दाखवत असतात सारखं... कधी कधी प्रत्यक्ष सिनेमापेक्षा ते कार्यक्रमच जसे छान वाटतात, तसंच टी. व्ही. वर दरवर्षी ज्या दहीहंड्या दाखवतात त्यापेक्षा हा सराव बघायलाच जाम मजा आली. त्या मुली सहा-सात थर तर लावतच होत्या पण आठव्या थरासाठीही त्यांचा प्रयत्न चालू होता. सहाव्या आणि सातव्या थरावर चढणाऱ्या मुली तश्या लहानच होत्या - तिसरीचौथीतल्या. पण त्यांच्या इत...

पाणी-बचतीचं प्रोजेक्ट

दि. ६ ऑगस्ट २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा माझा लेख. ----------------------------------------------------------- किर्ती शेवटी ९०:१०च्या जोडीला आपली कमाल दाखवायची संधी मिळालीच नाही. म्हणजे आता आमचं भाकीत खरं ठरणार... इजा-बिजाची वाट लागली, आता पुढच्या वर्षी कुठला तिजा शोधतात ते बघायचं! दरम्यान शाळेत आमची युनिट टेस्ट पार पडली। पाठोपाठ दरवर्षीप्रमाणे पावसावरचा एक निबंध आम्हाला लिहायला सांगण्यात आलेला आहे. आजकाल पावसाळा ‘नेमेचि’ येईनासा झालाय पण या निबंधाचा मात्र नेम काही चुकत नाही. तसा यावेळेला अगदीच निबंध एके निबंध लिहायचा नाहीये म्हणा... आम्हाला समाजशास्त्राचं एक प्रोजेक्ट करायचंय - ‘पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल’ या विषयावर आणि त्याचाच एक भाग म्हणून तो निबंध लिहायचा आहे. आचरेकर बाईंनी वर्गात प्रोजेक्टचा हा विषय जाहीर केल्यावर प्रज्ञा बधीर चेहऱ्यानं आमच्याकडे बघायला लागली. तिला त्याचा अर्थच कळला नाही. "अगं, म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंऽऽग... " तिला मागच्या बेंचवरून मराठी अस्मितानं इतक्या जोरात सांगितलं की ते आख्ख्या वर्गाला ऐकू गे...

जोडी नं. १

(दि. १६ जून २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा लेख.) -------------------------------------------------------------------------------- सबसे फेवरिट जोड़ी सुजाता मागच्या बुधवारी आमच्या शाळेत नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाचं चर्चासत्र होतं। (त्याचत्याच विषयांवर ‘सतरा’वेळा चर्चा करायची असेल की त्याला चर्चा‘सत्र’ म्हणतात - ही त्या शब्दाची फोड अर्थातच ‘की’ची!) विषय होता ‘परिक्षा आणि निकालांना तोंड कसं द्यावं’. त्यादिवशी शाळेचे रोजचे तास झाले नाहीत. घरी दादानं त्यावरून उगीच कावकाव केली - "नववीला कश्याला हवं ते डॅम सेमिनार?" (कॉलेजला जातो म्हणून चर्चासत्र शब्द वापरायची याला लाज वाटते; ‘डॅम सेमिनार’ म्हणे!)... "आमच्या वेळी कुठे होतं असलं काही? "... (मग मी काय करू त्याला?)... "उगीच शाळा बुडवून तिथे फालतूपणा करत बसणार तुम्ही! " (हा सुट्टीच्या दिवशी एक्स्ट्रा लेक्चरच्या नावाखाली कॉलेजमध्ये काय करायला जातो ते विचारा ना याला!)... पण दादाचं एक मात्र बरोबर होतं - दहावीला परिक्षेची तयारीबियारी करावीच लागते पण नववीला कश्याला? पण तिथे जावं तर ला...

एव्हरेस्ट आणि अस्मिता

(१८ जून २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा लेख.) ॥१॥ किर्ती आमच्या वर्गात अस्मिता नावाच्या दोन मुली आहेत... एक अस्मिता देशपांडे आणि दुसरी अस्मिता शर्मा. एकीला हाक मारली की दोघीही वळून बघतात. म्हणून आम्ही त्यांची ‘मराठी अस्मिता’ आणि ‘हिंदी अस्मिता’ अशी नावं ठेवलीयेत. तशी अस्मिता शर्माही चांगलं मराठी बोलते. सातवीपासून आहे आमच्या वर्गात. पण घरी तिला हिंदी बोलायची सवय आहे. त्यामुळे शाळेत आमच्याशी बोलताना ती मधूनच कधीतरी हिंदीत सुरू करते. त्यामुळेही ती नावं त्यांना अगदी ‘फिट्ट’ बसतात. शिवाय, ‘काल अस्मिता भेटली होती... कोण अस्मिता? शर्मा की देशपांडे?... देशपांडे’ इतकी लांबड लावण्यापेक्षा ‘काल मराठी अस्मिता भेटली होती’ असा सोप्पा शॉर्टकटही मारता येतो आम्हाला! या त्यांच्या नावांवरून एकदा फुल्ल कॉमेडीच झाली - रोज सकाळी शाळेत ग्राऊंडवर प्रार्थनेनंतर ताज्या बातम्या माईकवरून सगळ्यांना वाचून दाखवल्या जातात. ते काम गेली अनेक वर्षं आमच्या समाजशास्त्राच्या आचरेकर बाईच करतात. त्यादिवशी कृष्णा पाटीलनं एव्हरेस्ट सर केल्याची प्रमुख बातमी होती. ती वाचून दाखवताना बाईंनी ‘मराठी अस्मिता उंचावेल ...

घरपोच सुख!

आपण घाईघाईनं आवरून घराबाहेर पडतो. विशिष्ट वेळेत आपल्याला कुठेतरी पोहोचायचं असतं. दवडायला एक मिनिटही हाताशी नसतं. सुदैवानं कोपर्‍यावरच एक सोडून दोन रिक्षा दिसतात. आपण तिथे पोहोचण्यापूर्वी त्या रिक्षांना दुसरं कुणीही बोलवत नाही. त्यामुळे दुप्पट घाई करून आपण तिथे जाण्याचं सार्थक होतं. रिक्षावाला आपण सांगितलेल्या ठिकाणी ताबडतोब यायला तयार होतो. आपल्या चेहेर्‍यावर तिप्पट आनंद झळकायला लागतो. आपण सुटकेचा निःश्वास टाकून रिक्षात बसतो... सुख सुख म्हणजे तरी दुसरं काय असतं हो? उपलब्ध सार्वजनिक वाहनानुसार या प्रसंगातले तपशिल थोडेफार इकडे-तिकडे होतील इतकंच! बसस्टॉपवर पोहोचलं की जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटांत बस यावी, बसमध्ये थोडीफार गर्दी असली तरी हरकत नाही, व्यवस्थित उभं रहायला मिळालं तरी पुष्कळ आहे किंवा टॅक्सीवाल्यानं अजिबात खळखळ न करता आपण म्हणू त्याठिकाणी यायला लगेच तयार व्हावं... इतक्याच तर माफक अपेक्षा असतात आपल्या! पण आपल्यासारख्या साध्याभोळ्या, गरीब बिचार्‍या मध्यमवर्गीय माणसांच्या नशिबी हे असं सार्वजनिक-वाहन-सुख फार अभावानंच येतं। तरी कधीकधी आपल्या पदरातही अनपेक्षितरीत्या असं एखादं दान...