Posts

... आणि कल्पनेचं वारू (कायमचं) खाली बसलं!

'स्त्री' मासिकाच्या ऑगस्ट-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला. ----------------------------------------------------- खाद्यपदार्थांच्या काही जोड्या या ऐकताक्षणी विजोड वाटतात. जसं पिठलं-पोळी. म्हणजे, वेळप्रसंगी भुकेला ही जोडी काही वाईट नाही पण पिठलं-भाकरी ची मजा त्यात नाही हे ही खरं. आमटीभात किंवा आमटीभाकरी खाणाऱ्याला पोट भरल्याचं समाधान नक्कीच वाटेल. पण आमटी-ब्रेड? झालं ना तोंड वाकडं? चिवड्यावर दही किंवा ताक अनेकजण घेतात पण चिवड्यावर दूध कसं लागेल? किंवा चकली दुधात बुडवून खाल्ली तर? तर काही नाही; फक्त दिवाळी, फराळ आणि एकंदरच मराठी खाद्यसंस्कृतीचा बट्ट्याबोळ ठरलेला!... कल्पनेचं वारू चौखूर उधळवून सुद्धा या पलिकडे मला उदाहरणं सुचेनात. पण कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यातच असे अनुभव येतात की ते वारू देखील उधळणं विसरून, आपले चारही खूर आवरून मटकन खाली बसतं. आता हेच पाहा ना... सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक उच्चशिक्षित उत्तर भारतीय कुटुंब राहत असे. (पुढे येणाऱ्या वर्णनाचा त्यांच्या उत्तर भारतीय असण्याशी काहीही संबंध नाही. तेव्हा कृपया... सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. ) म...

एक विनोदी चित्रपट, प्रमुख भूमिकेत : चप्पल!

’स्त्री’ मासिकाच्या सप्टेंबर-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला. --------------------------------------------------------- सकाळची साडेसहा-सातची वेळ, रविवार असूनही फलाटावर चिक्कार गर्दी होती. पण त्या गर्दीची मला मात्र पर्वा नव्हती... कारण त्या दिवशी मी अनेक दिवसांनी - दिवसांनी कशाला अनेक महिन्यांनी, कदाचित अनेक वर्षांनी - एकटीच मुंबईला निघाले होते. म्हणजे, ’प्रवास करणारी एकटी बाई’ या अर्थाने नव्हे तर बरोबर माझा मुलगा नाही, काहीही सामान नाही आणि मुख्य म्हणजे नवरा पण नाही अशी एकटी!!... सडी-फटिंग आणि म्हणूनच एकदम निवांत!! मुंबईला एका लग्नाला निघाले होते. लग्न आटोपून संध्याकाळी लगेच परतायचं होतं, पण तोपर्यंत म्हणजे तब्बल १२-१३ तास मी एकटी असणार होते आणि तीच माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय गोष्ट होती. गाडी यायला अजून दहा-पंधरा मिनिटं अवकाश होता. मी पर्स मधून पुस्तक काढून उभ्या-उभ्याच वाचायला सुरुवात केली. फलाटावर माझ्या शेजारीच एक वयस्कर जोडपं आणि त्यांचा तरूण मुलगा असे उभे होते. सोबत दोन-तीन पिशव्या आणि एक बॅग होती. आजी-आजोबा मुंबईला निघाले होते आणि त्यांचा मुलगा त्यांना रेल्वे-स्थानकावर ...

कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ....

’क’ या अक्षरापासून सुरू होणारे ’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हे वाक्य सर्वांना माहितीच आहे. अशीच इतर अक्षरांपासून सुरू होणारी ही काही वाक्ये. ( यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही .) ’अ’ : ओगलेवाडीचा आमदार आबाजी एकतारे उगीचच आमच्यावर ओरडत असतो. ’ख’ : खत्रूड खालिद खसखस खाता-खाता खाविंदांवर खेकसला. ’ग’ : गाणगापूरचा गोल गुळगुळीत गोटा गंगापूरच्या गाडीतून गडगडत गेला. ’घ’ : घनघोर घोरणाऱ्या घारपुऱ्यांच्या घरात घुबडे घुसली. ’च’ : चलाख चिरागने चाफेकरांच्या चपला चोरणाऱ्या चंदूला चिंचेखाली चोपले. ’छ’ : छे! छगनरावांची छोटी छकुली छळ-छळ छळते! ’ज’ : जाड जीवन जमनीस जीर्ण जानोरीकरांकडे जरूरीपेक्षा जरा जास्तच जेवला. ’झ’ : झुडुपामागे झोपलेल्या झगेवाल्या झीनतला झिपऱ्या झरिनाने झाडूने झोडपले. ’ट’ : टुकार टारझनने टारगट टोणप्यांना टेकडीवर टाचणी टोचली. ’ठ’ : ठेंगण्या ठुसक्या ठमी ठोसरला ठोमणेने ठणकावले. ’ड’ : डावखुऱ्या डबूने डुगडुगणाऱ्या डब्यात डासांना डांबले. ’ढ’ : ...