पुस्तक परिचय : The Cases That India Forgot (लेखक - चिंतन चंद्रचूड)

We often tend to think of judgements as the text, whereas judgements can more accurately be conceived of as performance, as the culmination of a process. - चिंतन चंद्रचूड देशभरात गाजलेल्या, खळबळजनक, सनसनाटी कोर्टकेसेसबद्दल वाचण्यात कुणालाही जास्त रस असतोच. पण अनेक केसेस अशाही असतात ज्यांची त्या-त्या वेळेला चर्चा होते आणि नंतर त्या विस्मृतीत जातात. या पुस्तकात अशाच विस्मृतीत गेलेल्या १० कोर्ट केसेसचं वर्णन आहे. या सगळ्या केसेस हायकोर्टात नाहीतर सुप्रीम कोर्टात लढवल्या गेल्या. त्यांचे निकाल आपल्या देशाच्या सामाजिक, न्यायिक जडणघडणीवर दूरगामी परिणाम करणारे होते. कायद्याच्या अभ्यासकांमध्ये या केसेस आजही परिचित आहेतच; मात्र सर्वसामान्यांना त्याचा विसर पडलेला आहे. पुस्तकात या १० केसेस ४ प्रकारांत विभागलेल्या आहेत - Politics, Gender, Religion, National Security. यातल्या काही केसेस १९५०-६०च्या दशकातल्या आहेत, तर काही बर्यापैकी अलिकडच्याही आहेत. न्यायालयीन खटल्यांचं वर्णन, वकिलांचे युक्तीवाद, त्यामागचं त्यांचं कसब, निकालांचा ऊहापोह या बाबी त्यातल्या कायदेशीर भाषेमुळे वाचाय...