पुस्तक परिचय : इति-आदि (अरुण टिकेकर)
आपल्या रोजच्या वापरातल्या, पाहण्यातल्या, अनुभवातल्या आणि इतिहासातल्याही लहान-मोठ्या गोष्टींबद्दल माहितीपर, उद्बोधक, रंजक स्वरूपात केलेलं लेखन आहे. छोटे छोटे २-३ पानी लेख आहेत. मिरची, केळी सिताफळ अशा आहारातल्या गोष्टी, भारतात खाण्याचा बर्फ कधी अवतरला, चुलीचा (म्हणजे अन्न शिजवण्याचा इतिहास), गुलाबाच्या अत्तराचा इतिहास, छपाईकला, गोधडी शिवण्याची कला अशा अनेको गोष्टींवर लिहिलं आहे.
सामान्यज्ञान, सामान्य विज्ञान, आहारशास्त्र,
मानववंशशास्त्र, अलीकडचा इतिहास (फडणविशी थाट, पेशवाईतल्या जेवणाच्या मेनूचं डिटेल
वर्णन), संतसाहित्य, etymology असे अनेक पैलू या लेखनात येत राहतात. जुन्याजुन्या ग्रंथांतले संदर्भ दिले
आहेत. इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या नोंदींचेही अनेक संदर्भ येतात. टिकेकरांचं
स्वतःचं वाचन केवढं प्रचंड होतं ते यातून समजतं. आपल्याला माहिती असणार्या गोष्टी
वाचकांनाही रंगवून सांगण्याची असोशीही दिसते.
पुस्तकाचं कोणतंही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात
करावी, असा हा विरंगुळा आहे. प्रत्येकाला आपापल्या
आवडीनुसार यातले काही लेख आवडतील, लक्षात राहतील. तर काही वाचून बाजूला सारले जातील.
Comments