पुस्तक परिचय : SNARE

SNARE (Lilja Sigurdardottir)

Book 1 of the Reykjavik Noir Trilogy

Reykjavik Noir Trilogy (SNARE, TRAP, CAGE) पैकी पहिलं SNARE वाचलं.

स्टोरी चांगली आहे. सोनिया, एक घटस्फोटित आई, लहान मुलगा आळीपाळीने आई आणि वडिलांकडे राहत असतो. मुलाची पूर्णवेळ कस्टडी मिळवण्यासाठी आईला व्यवस्थित घर, इन्कम याची गरज असते. त्यातूनच ती ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये ओढली जाते. नेटाने त्यात ती तरबेजही होते. विमानतळावर कस्टम्समधून पार होण्यासाठी ती कोणकोणत्या युक्त्या करते ते थ्रिलरचा एक भाग म्हणून इंटरेस्टिंग आहे.

Reykjavik विमानतळावरचा एक कस्टम्स ऑफिसर हे आणखी एक प्रमुख पात्र आहे. कस्टम्सवाले प्रवाशांकडे कशा प्रकारे लक्ष ठेवतात, त्यांच्या सराईत नजरा काय-काय आणि कसं-कसं टिपत असतात, त्याला सोनियाचा संशय कसा येतो, संशयाची खातरजमा करण्यासाठी तो तिच्यावर कशी कशी पाळत ठेवतो, तिची देहबोली, वेषभूषा, तिचं सामान यातून काय काय अंदाज बांधतो हे सगळं तर फारच इंटरेस्टिंग आहे.
पुस्तक वाचताना कस्टम्सचे हे सीन्सच चालू रहावेत, बाकी उपकथानकं मध्येमध्ये नकोत असंच मला वाटत होतं.

याच्या जोडीला सोनिया आणि तिच्या नवर्‍याची एक कॉमन मैत्रीण Agla हिचाही ट्रॅक आहे. ते उपकथानक मला जरा बोअर झालं. पुढे पुढे तर त्यावरच जास्त फोकस येत जातो. त्याअर्थी किंडलवरच्या सिनॉप्सिसने पुन्हा एकदा माझी जरा दिशाभूल केली.
ठराविक पैसा हातात आला की सोनियाला ते काम सोडायचं असतं. पण (अपेक्षेप्रमाणे) ते शक्य होत नाही.

नेटवर ज्या प्रमाणात थ्रिलर म्हणून रेटिंग्ज आहेत त्या तुलनेत मला पुस्तक ठीकठाक वाटलं. किंवा त्या रेटिंग्जमुळेच मी फार अपेक्षा ठेवून वाचायला सुरुवात केली असावी.

शेवटाकडे दोन ट्विस्ट्स आहेत. दुसर्‍या भागात काय होतं बघायचं.

Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)