पुस्तक परिचय : Goat Days (Benyamin)
'दुर्दैवाचे दशावतार' किती अवतार धारण करू शकतात ते हे पुस्तक वाचून समजतं. केरळमधला एक गरीब अशिक्षित मजूर. त्याच्या गावातले अनेकजण गल्फमध्ये नोकरी करून थोडेफार पैसे मिळवत असतात. याला जाण्याची संधी मिळते तेव्हा कर्ज काढून, कसेतरी पैसे उभे करून तो जातो. तिथे (रियाध) पोचल्यावर कुणाला भेटायचं, कुठे जायचं काहीही माहिती त्याच्याजवळ नसते. त्याला न्यायला एक अरब येतो आणि त्याची रवानगी थेट वाळवंटातल्या एका मोठ्या बकर् यांच्या farm मध्ये होते. शेकडो बकर् यांची देखभाल करायची, त्यांना वाळवंटात फिरवून आणायचं, हे त्याचं काम. बदल्यात त्याला अक्षरश: गुलामासारखी वागणूक मिळते. वाळवंटात पाण्याचं दुर्भिक्ष्य, असलेलं पाणी बकर् यांसाठीच वापरायचं या कडक नियमामुळे त्याला अंघोळ, प्रातर्विधींसाठीही पाणी वापरायची मनाई असते. जेमतेम खायला मिळत असतं, कामात बारीकशी कुचराई/चूक झाली तरी चामड्याच्या पट्ट्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असते. ते सगळं वर्णन सुन्न करणारं आहे. तरीही निवेदनात एक साधा हलकेफुलकेपणा आहे. देवावरचा अढळ विश्वास, अशा परिस्थितीतही अरबी भाषा समजून, शिकून घेण्याचा प्रयत्न,