Posts

न्यूझीलंड:१ - माओरी! माओरी!!

Image
माओरी - हे न्यूझीलंडचे आदिवासी, हे शाळेत असताना कधीतरी वाचलेलं लक्षात होतं. दूर जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांशी या पलिकडे आपला का म्हणून संबंध यावा? नाही म्हणायला माओरींशी आपल्याकडच्या क्रिकेटप्रेमींचा आणखी एक बारीकसा संबंध मानता येईल. न्यूझीलंडचा एक बॅट्समन रॉस टेलर माओरी वंशाचा आहे हे आपण ऐकत आलेलो आहोत. तरी आम्ही न्यूझीलंडला जायचं ठरवलं तेव्हा तिथले माओरी काही विशेष डोक्यात नव्हते. न्यूझीलंडला जायचं ठरवलं, ते स्वतःच सगळं प्लॅनिंग करायचं, असं योजूनच. त्याप्रमाणे व्हीजासकट सगळी पूर्वतयारी केली. बुकिंग्ज झाली. न्यूझीलंडचा नकाशा धुंडाळताना बर्‍याच ठिकाणांची अ-इंग्रजी वाटणारी नावं दिसत होती- व्हांगारेई, वायटोमो, लेक वाकाटिपु, वगैरे. ती बहुदा माओरी भाषेतली असावीत अशी मनोमन नोंद झाली; पण त्यावर अधिक विचार केला गेला नाही. तयारीच्या तीन-चार महिन्यांदरम्यान इंटरनेटवरचे विविध फोरम्स, हाती लागतील ते ब्लॉग्ज, व्लॉग्ज, इतर माहिती धुंडाळणे, त्या देशाबद्दलची स्वतःच्या परिने एक पूर्वपीठिका तयार करणे, हे सुरू होतंच. स्वबळावर निवडणूक लढवतात तसं प्रथमच स्वबळावर परदेशी...

इयत्ता दहावी पास

एप्रिलच्या चैत्रवणव्यात भर दुपारी २ वाजता ट्रेनची अनाऊन्समेंट झाली , तेव्हा कुमार यश मोबाईलवर ‘ स्नेक-२ ’ गेम खेळत बसला होता. त्यापूर्वी थोडा वेळ तो उभाच होता. उभं राहून कंटाळा आला तेव्हा तो जवळच्याच एका लोखंडी खांबाला टेकायला गेला. पण खांब उन्हामुळे तापलेला होता आणि कुमार यशने स्लीव्हलेस टी-शर्ट घातलेला होता! त्याच वेळी कुमार यशच्या पुढ्यातून त्याच्यापेक्षा वयाने जराशीच लहान एक मुलगी आईचं बोट धरून निघाली होती. तिच्याकडे मोबाईलफोनयुक्त तुच्छतेने पाहण्याच्या नादात इकडे दंडाला बसलेल्या चटक्याने कुमार यशला दचकायला झालं. हातातून मोबाइल पडता पडता वाचला. शेजारीच कमरेवर एक हात ठेवून , दुसर्‍या हातातल्या रुमालाने वारा घेत हाश्श-हुश्श करत उभी असलेली बाई त्याच्यावर मंदसं खेकसली. ती त्याची आई होती. आपली बॅग आपल्याच पाठीवर लावलेला कुमार यश आपण स्वतंत्रपणे एकटेच रेल्वे स्टेशनवर आलोय हे इतरांना जाणवून देण्यात - त्याच्या मते - आतापर्यंत यशस्वी ठरला होता. त्या यशाला खांबाच्या चटक्याने क्षणार्धात चूड लावला होता. त्या चटक्याने गेममधल्या स्नेकचं अखेरचं लाईफही संपवलं होतं. मग दंड चोळत चोळत परत न्यू गे...

पुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)

Image
जुन्या-नव्या पुस्तकांची ओळख करून देणारे लेख माझ्या खास आवडीचे. अशा लेखांमधून समजलेली काही पुस्तकं अगदी लक्षात राहतात. (पुढे ती आवर्जून मिळवून वाचली जातातच असंही नाही, तरीही.) काही दिवसांपूर्वी ‘अनुभव’च्या अंकात अशाच एका पुस्तकाबद्दल समजलं : The Seasons of Trouble. Life amid the ruins of Sri Lanka’s Civil War. तो लेख वाचला आणि प्रथमच असं झालं की पुस्तक मी लगेच विकत घेतलं. त्याला कारण ठरला पुस्तकाचा विषय! शाळेत असताना लंकन यादवीच्या बातम्या सतत कानावर पडायच्या. दिल्ली दूरदर्शनच्या हिंदी बातम्या देणारी एक बाई LTTE चा उच्चार करताना त्यातला L लांबवायची... एऽऽऽल्लटीटीई! आम्ही तिची नक्कलही करायचो. ही यासंदर्भातली सर्वात जुनी आठवण... LTTE, IPKF यांचे फुलफॉर्म्स माहित झाले होते. प्रभाकरन, कोवळे टायगर्स तरूण-तरूणी, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग असतं म्हणे, सायनाईडच्या कॅप्सूल्स, वगैरे सामान्यज्ञान वाढीस लागलं होतं. जाफना, नॉर्थ-साऊथ बट्टिकलोवा इत्यादी नावं अगदी ओळखीची वाटायची. श्रीलंकेत तामिळ-सिंहलींमधला काहीतरी गोंधळ चालू आहे, हे त्या सगळ्याचं सार. तेव्हा बातम्यांमधून त्याची राजकीय अंगाने...

`इज पॅरीस बर्निंग?' ...जेव्हा एक पुस्तक परत भेटतं!

साधारण दीड व र्षां पूर्वीची गोष्ट. कुटुंबासमवेतच्या सुट्टीनिमित्त युरोपमधे होते; त्यातही पॅरीस शहरात ! मात्र तिथल्या ट्रॅफिकनं इतका वात आणला होता, की आमच्या पॅरीस-कार्यक्रमात आम्हाला काटछाट करावी लागली होती. पण कधीकधी सगळं मनाविरुद्ध घडत असतानाही एखादाच निसटता अनुभव असा येतो की त्याआधीच्या नाखुष करणार्‍या घटना आपण कधी आणि कश्या विसरून जातो ते कळत देखील नाही. पॅरीसमधल्या अखेरच्या संध्याकाळी मला असाच एक अनुभव येणार होता आणि आमची पॅरीस-भेट किमान माझ्यापुरती तरी अगदी संस्मरणीय बनून जाणार होती. त्याला कारणीभूत ठरणार होतं एक खूप जुनं इंग्रजी पुस्तक ! पुस्तकाचा संबंध पॅरीसशी होताच , शिवाय दुसर्‍या महायुद्धाशी ही होता . ‘जागतिक महायुद्ध’ या गोष्टीशी आपला सर्वसाधारणपणे प्रथम परिचय होतो तो शाळेच्या इतिहासात. माझाही तसाच झाला. दुसर्‍या महायुद्धानं तर मनावर पहिल्या भेटीतच गारूड केलेलं. तेव्हा इतिहासाच्या पुस्तकातले महायुद्धांवरचे ते दोन(च) धडे, सोबतचे नकाशे मी अनेकदा चाळत, बघत बसत असे. त्यानंतर (जगरहाटीनुसार) मी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ वाचलं. हे पुस्तक वाचलं की दुसर्‍या महायुद्धाबद्दलच...