Posts

सर्वोकृष्ट `रिअ‍ॅलिटी शो’

महिलांच्या पळण्याच्या कुठल्यातरी शर्यतीची (बहुतेक ४०० मीटर्स) एक प्राथमिक फेरी चालू होती. शर्यत सुरू होताच प्रेक्षकांचा सुरू झालेला गोंगाट हळूहळू वाढत गेला. स्पर्धक महिलांनी एक एक करून अंतिम रेषा ओलांडली. एकमेकींचं अभिनंदन केलं. ज्यांनी पात्रता निकष पूर्ण केले होते त्यांना कॅमेरावाल्यांनी घेराव घातला. शर्यत पूर्ण होताच प्रेक्षकांचा टिपेला पोहोचलेला टाळ्यांचा गजर थोडासा कमी झाला आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू झाला. आधी वाटलं, प्राथमिक फेरीतच एखादं रेकॉर्ड वगैरे मोडलं गेलं की काय; ते प्रेक्षकांच्या उशीराने लक्षात आलं की काय. पण नाही. कारण निराळंच होतं. शर्यत पूर्ण केलेल्या, थकल्या-भागल्या, कॅमेर्‍याला किंवा प्रेक्षकांना अभिवादन करणार्‍या धावपटूंवरून कॅमेरा एकदम पॅन झाला आणि पुन्हा एकदा ट्रॅकवर स्थिरावला. प्रथम तिथे कुणीच नजरेस पडलं नाही. नक्की काय प्रकार चाललाय--असं मनात येईपर्यंत ट्रॅकवरून धावणारी एक आकृती दिसली. कॅमेरा हळूहळू झूम-इन होत गेला आणि लक्षात आलं, की अजून एका धावपटूची शर्यत पूर्ण व्हायची होती. जरा आश्चर्यच वाटलं आधी. Faster, Higher, Stronger या शब्दांना लाजवेल अशा ऑलिंप...

...अनुभवू हा वैविध्यसोहळा

मायबोली डॉट कॉम तर्फे महिला दिनानिमित्त  लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख परिसंवाद विशेषांक  प्रकाशित करण्यात आला. त्या विशेषांकातला हा माझा लेख. मूळ लेख इथे  वाचता येईल. ------------------------- मी कॉलेजमधे असतानाची गोष्ट. ग्रूपमधली आमची एक मैत्रीण होती. हुशार, उत्साही, भरपूर बडबडी, जराशी टॉमबॉयिश. तिच्या बोलण्यात कायम एका मुलाचा उल्लेख यायचा. तो आमच्याच वयाचा, पण आमच्या कॉलेजमधला नव्हता. कौटुंबीक मैत्री किंवा दोघांचेही वडील बिझिनेस पार्टनर अशा कुठल्याशा कारणामुळे लहानपणापासून ते दोघं एकमेकांना चांगले ओळखत होते. आमची त्याच्याशी केवळ तोंडओळख होती, पण त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री होती, हे आम्हांला पदोपदी जाणवत असे. परीक्षेचा अभ्यास असो, सुट्टीतले कार्यक्रम असोत, इतर काही मौजमजा अथवा अडीअडचणी असोत किंवा एखाद्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असो, त्यांच्या एकमेकांशी सल्लामसलत-गप्पा-गुजगोष्टी या ठरलेल्या असायच्या. बरं, ती त्याला सोडून आमच्यात मिसळायची नाही म्हणावं, तर तेही नाही. ग्रूपच्या धमाल मस्तीत कायम हजर असायची, कॉलेजच्या सगळ्या उपक्रमांमध्येही पुढे असायची. हे कॉल...

घरोघरी मातीच्या चुली - 3

घरोघरी मातीच्या चुली - 1 घरोघरी मातीच्या चुली - 2 ---------- "ए, जरा मुलांकडे बघशील ना दुपारी? माझी ब्यूटिशियन येणारे घरी." "पुन्हाऽऽ?" "ओरडायला काय झालं इतकं?" "अगं, पंधरा-वीस दिवसांपूर्वीच आली होती ना?" "छे! महिना होत आला." "अगं, पण मग इतक्यात पुन्हा?" "हो, मग! असंच जाणार आहोत का आपण?? बरं दिसेल का ते?" "कुठे जाणार आहोत? आणि आपणऽऽ?? म्हणजे मी पण??" "(जरासा त्रासिक चेहरा करत) ओरडत जाऊ नकोस रे साध्या साध्या गोष्टींत..." "पण जायचंय कुठे?" "अरे, गेला आठवडाभर नाही का मी त्या डान्सच्या प्रॅक्टिसला जात होते..." "(हायसं वाटून) अच्छा, तो कार्यक्रम आहे होय." "शी! कार्यक्रम काय म्हणतोस त्यालाऽऽ!" "तेच गं ते, अर्थ एकच... जा तू बिनधास्त! मी सांभाळीन मुलांना." "मुलांना सांभाळायचं आहेच तुला, पुढचे ३-४ तास." "कधी जायचंय?" "आजच रात्रीऽऽऽ! आज ब्यूटिशियनला बोलावलंय, म्हणजे आजच असणार ना? की उद्या असणारे? इतक्या वर्षांत एवढंही कसं कळले...
सहज सुचत गेल्या आणि एकापुढे एक लिहित गेले या साखळी-चारोळ्या. गंमत म्हणजे, पुन्हा पहिल्या चारोळीपाशी नकळत परतले. ----------------------------- कुणी लिहितं कविता, कुणी खरडतं चारोळ्या, पसंद अपनी अपनी, कारण शेवटी सगळ्याच अंतरात्म्याच्या आरोळ्या... मारावी आरोळी, नाहीतर पिटावा हाकारा, पण समर्थपणे तोंड द्यावं, परिस्थितीच्या नकारा ! परिस्थिती, परिस्थिती, अरे कोण ही परिस्थिती? तिचं नाव पुढे घालून नशिबानं चालवलेली यथेच्छ निंदा-नालस्ती ती... जनाची निंदा, मनाची नालस्ती, करत होते का पुराणातले ऋषी अगस्ती? अरे, पुराणातली वांगी राहू देत पुराणात, आधी कामाकडे लक्ष द्या, मीठ विसरलंय वरणात ! मीठ काय अन्‌ साखर काय, निव्वळ दोन चवी, आयुष्यगाथा कशी पंचरसांनी परिपूर्ण हवी ! आयुष्याला म्हणावे गाथा नसते अशी प्रत्येकाकडे कथा, मग कुणी खरडतं चारोळ्या, तर कुणी लिहितं कविता !!

पुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'

दि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख. मूळ लेख  इथे  वाचता येईल. ---------- २६/११बद्द्ल सर्वकाही २६ नोव्हेंबर २००८. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. यादिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याची व्याप्‍ती आणि अघोरी स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न ‘२६/११ मुंबईवरील हल्ला’ या पुस्तकात केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त ज्यूलिओ फ्रान्सिस रिबेरो यांनी आणि रेडियो, टी.व्ही., छपाई आणि वेब या माध्यमांतील इतर काही नामवंत पत्रकार, लेखकांनी लिहिलेले लेख हरिंदर बावेजा यांनी संकलित केले आहेत. २६/११चा हल्ला सहजासहजी आपल्या विस्मृतीत जाणे अशक्यच. तरीही मग हे पुस्तक का वाचायचे? आपल्याला त्यातून नव्याने काही समजते का? तर, याचे उत्तर आहे ‘हो.’ दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान त्यांच्या सूत्रधारांशी फोनवरून केलेली संभाषणे पुस्तकात सविस्तर दिली आहेत. ती लक्षपूर्वक वाचा. या हल्ल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्यांचे भले ‘ब्रेन-वॉशिंग’ केले गेले असेल, पण एकदा धर्माच्या, जिहादच्या वेडाने झ...

पुस्तक परिचय - 'हेडहंटर'

रविवार दि. २८ ऑगस्ट २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तकपरिचयपर लेख. मूळ लेख  इथे  (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ---------------------------------- ‘ड्रीम जॉब’ हा कॉर्पोरेट जगतातला परवलीचा शब्द आहे. हव्या असलेल्या चांगल्या नोकरीची एखादी संधी जर चालून आली तर वैयक्‍तिक विकासासाठी तिचा उपयोग करून न घेणार्‍याला आजच्या स्पर्धेच्या युगात करंटाच ठरवले जाईल. अधिक चांगली नोकरी आणि अधिक पैसा यामागे जसे कनिष्ठ नोकरदार धावत असतात तसेच उच्चपदस्थ आणि अतिउच्चपदस्थही धावत असतात. उच्चपदस्थांच्या अश्या नोकरीबदलामुळे कंपन्यांनाही त्यांच्या जागी अन्य सुयोग्य माणसे हवीच असतात. आपल्याकडे जे, जितके आहे त्यापेक्षा अधिक काही मिळवण्याची हीच मानवी प्रवृत्ती काहीजणांच्या आयुष्याला एका निराळ्या पण योग्य अर्थाने कलाटणीही देऊ शकते. त्यांच्यातल्या अंगभूत गुणांना त्यामुळे स्वकर्तृत्वाचे कोंदण मिळते. ‘हेडहंटिंग’सारख्या भारतात अजून बाल्यावस्थेत असलेल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे गिरीश टिळक हे या वर्गाचे दमदार प्रतिनिधीत्त्व करतात. कॉर्पोरेट कंपन्यांची गरज ओळखून, त्यांच्यासाठी योग्य ...

हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन !!

‘बालगंधर्व’ चित्रपटावर भरपूर चर्चा केली, वाचली, ऐकली. ती चर्चा कानावर पडली नसती तरी सिनेमा पहायचा तर ठरवलाच होता. तसा तो ही पाहीला. सिनेमा पहायला बरोबर चक्क आमचे चिरंजीव आले होते. (आमच्या अर्धांगाच्या मनोरंजनाच्या कल्पना निराळ्याच असल्यामुळे अश्या कामी बहुतेकवेळा मुलाचीच मला साथ-सोबत असते. तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. असो.) सिनेमा पाहून आल्यावर सुबोध भावे, त्याची वेषभूषा, सिनेमातले सेट्स आणि बालगंधर्वांच्या आयुष्यातल्या नव्याने कळलेल्या काही गोष्टी हेच सगळं मनात जास्त घोळत राहीलं. काही दिवस गेले. अचानक पेपरमध्ये एक जाहीरात आली - ‘असा बालगंधर्व आता न होणे’ : बालगंधर्व चित्रपटावर आधारीत गाणी, गप्पा, किस्से यांचा कार्यक्रम. स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे. कार्यक्रमाचं आयोजन सिनेमाचा सहाय्यक संगीत दिग्दर्शक आदित्य ओक यानं केलं होतं. ट्रान्सफॉर्मर-३ची रिलीज डेट पाहण्यासाठी पेपर उघडलेल्या माझ्या मुलाची नजर प्रथम त्या जाहीरातीवर गेली. तो ‘आई, आपण या कार्यक्रमाला जायचंच.’ असं म्हणत अक्षरशः उड्या मारत माझ्याजवळ आला. मी प.फ.ची आ. मानून दुसर्‍या दिवशी आधी कार्यक्रमाची तिकिटं काढून आणली. सहभाग...