Posts

Showing posts from 2024

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ४

Image
दगडधोंडे, डोंगरकपारी - ३ ‘हर्मानसचं सरप्राइज पॅकेज’ असं मागच्या लेखात म्हटलं, कारण आमच्या Hermanus experience चा काही भाग दगडधोंडे कॅटेगरीत मोडणारा आहे. तर काही भाग nature trails कॅटेगरीत मोडणारा आहे. शिवाय ओंजळभर हर्मानस उरणारच आहे, जमलं तर त्यावरही लिहिणार आहे. केप टाऊनहून हर्मानसची day tour करणे v/s हर्मानसमध्ये निवांत मुक्काम करणे, हे म्हणजे टूरिस्ट आणि ट्रॅव्हलर यांच्यातला फरक सांगणारे forwards येतात त्यातला प्रकार आहे. (मी टूरिस्ट आणि ट्रॅव्हलरच्या अधेमध्ये कुठेतरी आहे, ट्रॅव्हलरच्या बाजूला जरा जास्त आहे.) सांगायचा मुद्दा असा, की द.आ.ला गेलात आणि दक्षिण किनारपट्टीवर customised भटकंती करणार असाल, तुमच्या यादीत हर्मानस असेल, तर एकवेळ हर्मानसहून केप ऑफ गुड होपला आणि केप पॉइंटला day tour करा, पण उलट करू नका. एकवेळ केप टाऊनमध्ये मुक्काम केला नाहीत तरी चालेल, पण हर्मानसचा भोज्जा करू नका. असो. तर आधी हर्मानसचे दगडधोंडे. हर्मानस हे लहानसं टाऊन असावं. आम्ही तिथला जेवढा भाग पाहिला त्यावरून तरी तसंच वाटलं. समुद्रकिनार्‍याला समांतर मुख्य रस्ता, रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला हॉटेल्स, द...

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३

Image
  गार्डन रूट – दगडधोंडे, डोंगर-कपारी : २ टूरचा नववा दिवस. हर्मानसचं सरप्राइज पॅकेज बॅगेत बांधून आम्ही Knysna ला पोहोचलो होतो. (उच्चार : नाय्ज्ना, ‘ज’ जहाजातला). हर्मानस ते नाय्ज्ना अंतर बरंच आहे. इतका कार प्रवास करण्याऐवजी आम्ही एक पर्याय शोधला. हर्मानसहून कॅबने उलटं केप टाऊनला आलो. (तास दीड तास प्रवास). केप टाऊनहून विमानाने George ला गेलो. (एक तास). जॉर्जहून कारने नाय्ज्नाला गेलो. (अर्धा तास). motion sickness वाल्यांना असे उलटे घास घ्यावे लागतात. असो. तर, नाय्ज्ना. हे एक टुमदार टाऊन आहे. नाय्ज्नात दुपारी १-२ वाजता पोहोचलो. रिपरिप पाऊस आणि प्रचंड गारठा होता. टाऊनचा काही रहिवासी भाग उंचावर वसलेला आहे. हे नुसतं टेकाड किंवा चढ नाही. याला तिथे ‘नाय्ज्ना हेड’ असं नाव आहे. तिथे अशी दोन हेड्स आहेत- east head आणि west head. दोन्हींच्या मधून नाय्ज्ना नदी समुद्राला मिळते. आमचा मुक्काम east head च्या अगदी हेडवरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये होता. (टूरमध्ये आम्ही बहुतेक ठिकाणी मोठी घरं converted into guest houses अशा ठिकाणी राहिलो. सगळीच घरं छान होती. आणि मुळात ‘घरं’ असल्यामुळे खोल्यां...

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

Image
  इट्स टाइम फॉर आफ्रिका - १   गार्डन रूट – दगडधोंडे, डोंगर-कपारी : १ पहिल्या भागात टूर प्लॅन लिहिला. पण पुढचे लेख त्या क्रमानुसार नाहीत. किंबहुना प्रत्येक ठिकाणासाठी एक लेख अशी विभागणी मला करताच येणार नाही. त्याचं एक कारण- गार्डन रूटची geology. दुसरं कारण- तिथे आम्ही केलेले nature trails, walking/hiking trails. आणि तिसरं कारण तिथला flora-n-fauna. आणि या सगळ्यांचं समुद्रासोबतचं अद्वैत! मी ना geology ची अभ्यासक आहे, ना botanist आहे. पण या सगळ्या गोष्टींचा एकजिनसीपणा, परस्परावलंबित्व, एकमेकांना धरून राहणे, तिथे ठिकठिकाणी इतकं विलक्षणरीत्या जाणवत होतं, की बस्स! त्यामुळे random क्रमाने लिहिणार आहे. सर्वात पहिला फोकस दगडधोंडे, rock structures यांच्यावर. नैसर्गिक खडकांबद्दल मला लहानपणापासून आकर्षण आहे. मोठाले फत्थर, शिळा, दगडधोंडे ते लहान गोटे, खडे सगळ्याबद्दल. बरं, महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या परिसरात राहणार्‍यांना मोठाले डोंगरकडे, शिळा वगैरेंचं नाविन्य असायचं कारण नाही. तरीही गार्डन रूटवरच्या डोंगरकड्यांनी, फत्थरांनी असं काही थक्क करून सोडलं की विशेषणं कमी पडावीत. आत्ता ...

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

Image
  पूर्वतयारी दक्षिण आफ्रिकेला जाण्याचं अनेक वर्षांपासून मनात होतं. २०१७ साली न्यूझीलंडला गेलो तेव्हाही आधी द.आ.च मनात होतं. पण त्याच्या आदल्या वर्षीच केपटाऊनमधल्या पाण्याच्या दुर्भिक्षाच्या बातम्या वाचल्या होत्या. त्यामुळे तेव्हा ते लांबणीवर टाकलं गेलं, ते यंदा प्रत्यक्षात आलं. सुरुवात प्लॅनिंगपासून करतेय, कारण आतापर्यंतच्या आमच्या टूर्समध्ये द.आ.चं प्लॅनिंग मला सर्वात चॅलेंजिंग वाटलं आहे. द.आ. म्हटल्यावर पहिल्यापासून माझ्या डोक्यात केप टाऊन आणि क्रूगर नॅशनल पार्क ही जोडी फिट्ट बसलेली होती. ती माझी चूक होती. नकाशा पाहिला तर कळतं, की केप टाऊन आणि क्रूगर जवळपास diagonally opposite आहेत आणि त्यांच्यातलं अंतर भरपूर आहे. (क्रूगर आसाम-अरुणाचल मानलं तर केप टाऊन गोवा आहे.) क्रूगर नॅशनल पार्क हे आफ्रिकेतल्या महत्त्वाच्या नॅशनल पार्कपैकी एक. क्रूगरला जवळचं मोठं शहर म्हणजे जो’बर्ग किंवा प्रिटोरिया. भारतातून जो’बर्गला रोज फ्लाइटस आहेत. शिवाय जो’बर्ग हे राजधानीचं शहर. त्यामुळे पहिला प्लॅन ठरला- मुंबई-जो’बर्ग, तिथून क्रूगर. पहिले प्लॅन्स थोड्याच दिवसांत मान टाकतात. हा प्लॅनही आठवड्...