प्रागची जादू, स्ट्रीट म्युझिक वगैरे

प्रागमधला तिसरा दिवस. सकाळपासून म्हटलं तर randomly भटकत होतो. Letna Park च्या टेकडीवरून खाली उतरलो, समोर आलेला नदीपूल पार केला आणि Old Town Square ची दिशा धरली. या चौकाला ५००-६०० वर्षांचा इतिहास आहे. त्या काळाच्या मानानं हा चौक GRAND आहे. चौकाच्या भोवती अनेक बारीकसारीक रस्ते, चिंचोळ्या गल्ल्या आहेत. अशाच एका उपरस्त्यावरून आम्ही चौकाच्या तोंडाशी पोचलो. भरपूर गर्दी, वर्दळ, गजबज होती. अचानक उजव्या हाताला रस्त्याच्या कडेला एक वादक वाटणारा माणूस दिसला. Folding खुर्चीवर बसला होता. थकलेला चेहरा, पिकलेले केस, धीमेपणानं पुढ्यातल्या उलट्या टोपीतली नाणी गोळा करत होता. माझी नजर आपसूक शेजारच्या वाद्यांवर गेली. दोन saxophones होते. मी जरा वेळ रेंगाळले. पण म्हातारबाबांचा lunchtime झाला होता बहुतेक. ते काही वादन पुन्हा सुरू करेनात. आधी जरा हळहळायला झालं. पण street music म्हटलं की हे देखील आलंच. वाद्यांच्या लकेरी अचानक कानावर पडण्यातली मजा जशी आहे, तशीच ही हळहळ. आम्ही पुढे सरकलो. पुढचा तासभर तो grand चौक बघण्यात कसा गेला कळलं नाही. २ वाजून गेले होते. आता गारठा चांगलाच वाढला होता. आलो त्याच्या विरु...