पुस्तक परिचय : Lab Girl (Hope Jahren)

हे एका पॅलिओबोटॅनिस्टचं memoir आहे. आणि बॉटनीसंदर्भातलं इतकं सुंदर पुस्तक मी या आधी वाचलेलं नव्हतं. वनस्पतीजगतातली वाढीची एक-एक स्टेप, त्यातल्या अद्भुत गोष्टी, त्यातले काही महत्वाचे शोध, आणि या सगळ्याची स्वतःच्या सायंटिस्ट म्हणूनच्या प्रवासाशी (वाचकांच्या नकळत) घातलेली सांगड, ही या पुस्तकातली बहारदार गोष्ट आहे. एका बीजाचा झगडा काय असतो, मुळं-खोडं गेली लाखो वर्षं काय काय करत आलेली आहेत, झाडाचं पान ही काय चीज आहे, झाडं-वृक्षं ही झाडं/वृक्षं का आहेत, इतर सजीव प्राण्यांहून ती वेगळी का आणि कशी आहेत, मातीकडे कसं बघायला हवं, हे पुस्तकात अतिशय रोचक पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्या वर्णनात काही काही फार सुंदर विधानं आहेत. त्यातल्या अनेक गोष्टी सामान्यज्ञान म्हणून आपल्यालाही थोड्याफार माहिती असतात; तरी त्या अशा पद्धतीनं सांगितल्या गेल्यामुळे वाचताना फार भारी वाटतं. आणि त्याच्या जोडीला अर्थात सायन्सवरचं प्रेम, लहानपणापासून नकळत जपणूक होत गेलेली संशोधक वृत्ती, पी.एचडी.साठीचे प्रयत्न, त्यानंतरची रिसर्च सायंटिस्ट म्हणून वाटचाल, असा हा सगळा प्रवास आहे. यात लेखिकेला पी.एचडी. रिसर्चच्या ...