पुस्तक परिचय : Grey Sunshine: Stories from Teach For India (Sandeep Rai)

Lockdown book #8 Teach for India बद्दल काही वर्षांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. त्यातले तपशील आठवत नव्हते, भारतातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी चालू असलेली ही एक चळवळ आहे, एवढं आठवत होतं. त्यामुळे किंडल suggestions मध्ये हे पुस्तक दिसल्यावर लगेच विकत घेतलं. उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी दोन वर्षांसाठी आपलं नेहमीचं काम-नोकरीधंदा बाजूला ठेवून गरीब वस्त्यांमधल्या मुलांच्या प्राथमिक शाळेत शिकवण्याचं काम करायचं, ही Teach for India मागची मूळ कल्पना आहे. त्याची प्रेरणा आहे Teach for America या मोहिमेत. लेखक संदीप राय या Teach for America मोहिमेत सामिल झालेले; अमेरिकेतल्या गरीब मुलांच्या शाळेत शिकवण्याचा अनुभव असणारे; भारतात शाहीन मिस्त्री यांनी या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली होती, त्याला हातभार लावण्यासाठी, आपल्या अनुभवांचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी म्हणून इथे आले. त्यानंतरच्या दहा-एक वर्षांच्या वाटचालीवर आधारित हे पुस्तक आहे. या मोहिमेत सामिल झालेले काही तरुण-तरुणी, गरीब वस्त्यांमधल्या प्राथमिक शाळांत शिकवायला सुरूवात केल्यानंतर त्यांनी खाल्लेले टक्केटोणपे, त्यातून पुढे त्यांची त्य...