मैं और मेरी कामवाली, अक्सर ये बातें करते हैं...!
   ती : (मी प्यायला दिलेल्या ताज्या ताकाचा एक घोट घेत) ताई ,  हे घरी बनवलंय ?   मी : (प्रफुल्ल चेहर्यानं) हो !!   ती : (जरासं नाक मुरडत) मी नाही असलं काही करत बसत... सरळ डी-मार्टातून अमूलचं आणते!!   मी : 😐😐     *     ती केर काढत होती. मी फोनवर काहीतरी करत होते.   ती : ताई ,  माझ्या नवर्याने माझ्या पोराचा फोटो टाकलाय... फेसबुकवर... गणपतीसोबत   मी : बरं...   ती : तुमी फोनवर उघडा ना फेसबुक ,  मी दाखवते...   मी : माझ्या फोनवर फेसबुक नाहीये.   ती : 😲😲     *     ती : ताई ,  लादीचा कपडा फाटायला आलाय...   मी : बरं ,  उद्या दुसरा काढून ठेवते.   ती : डी-मार्टात ‘पोछे का कपडा’ म्हणून मिळतो ,  मस्त असतोय ,  तो का नाही आणत ?   मी : 😒😒     *     ती : ताई ,  हायपरसिटीत सेल लागलाय...   मी : हो का ?    ती : मला जायला वेळच होत नाही...   मी : 😑😑     *     ती : (भांड्यांच्या साबणाचा डबा बघून) ताई ,  बारहून हा डबा स्वस्त पडतो ?   मी : काय माहित! डबा नाहीतर बार ,  दुकानात गेल्यावर जे मिळेल ते मी आणते.   ती : दुकानातून का ??  डी-मार्टातून नाही आणत ??   मी : डी-मार्ट म्हणजे दुकानच ना ?    ती : 🙆🙆 ...