इट्स टाइम फॉर आफ्रिका - ४
दगडधोंडे, डोंगरकपारी - ३ ‘हर्मानसचं सरप्राइज पॅकेज’ असं मागच्या लेखात म्हटलं, कारण आमच्या Hermanus experience चा काही भाग दगडधोंडे कॅटेगरीत मोडणारा आहे. तर काही भाग nature trails कॅटेगरीत मोडणारा आहे. शिवाय ओंजळभर हर्मानस उरणारच आहे, जमलं तर त्यावरही लिहिणार आहे. केप टाऊनहून हर्मानसची day tour करणे v/s हर्मानसमध्ये निवांत मुक्काम करणे, हे म्हणजे टूरिस्ट आणि ट्रॅव्हलर यांच्यातला फरक सांगणारे forwards येतात त्यातला प्रकार आहे. (मी टूरिस्ट आणि ट्रॅव्हलरच्या अधेमध्ये कुठेतरी आहे, ट्रॅव्हलरच्या बाजूला जरा जास्त आहे.) सांगायचा मुद्दा असा, की द.आ.ला गेलात आणि दक्षिण किनारपट्टीवर customised भटकंती करणार असाल, तुमच्या यादीत हर्मानस असेल, तर एकवेळ हर्मानसहून केप ऑफ गुड होपला आणि केप पॉइंटला day tour करा, पण उलट करू नका. एकवेळ केप टाऊनमध्ये मुक्काम केला नाहीत तरी चालेल, पण हर्मानसचा भोज्जा करू नका. असो. तर आधी हर्मानसचे दगडधोंडे. हर्मानस हे लहानसं टाऊन असावं. आम्ही तिथला जेवढा भाग पाहिला त्यावरून तरी तसंच वाटलं. समुद्रकिनार्याला समांतर मुख्य रस्ता, रस्त्याच्या दुसर्या बाजूला हॉटेल्स, द...