पुस्तक परिचय : Let Me Say It Now (Rakesh Maria)

मुंबईचे सुपर-कॉप राकेश मारिया यांनी आपल्या ३०+ वर्षांच्या पोलीस सेवेतले अनुभव, आठवणी लिहिल्या आहेत. सुरुवातीचं अकोला पोस्टिंग आणि नंतर एकदा रायगड जिल्ह्यातलं अल्प काळाचं पोस्टिंग वगळता त्यांनी कायम मुंबईत काम केलं. आणि त्यातही क्राइम डिटेक्शन हे त्यांचं आवडतं फील्ड होतं. १९९३ सालच्या मुंबई बाँबस्फोट तपासामुळे ते प्रकाशात आले. तेव्हाचं सगळं वर्णन, तपासाची माहिती, संजय दत्तला त्यांनी अटक केलं त्या आठवणी वाचायला इंटरेस्टिंग आहेत. तेव्हा मी या बातम्या बर्यापैकी फॉलो करायचे. ते सगळं पुन्हा आठवलं. नंतरही मुंबईतले काही स्थानिक गुन्हे, गाजलेल्या केसेस, काही गुन्हेगारांचा इतर राज्यांमध्ये काढलेला थरारक माग, नेपाळ बॉर्डरपर्यंतच्या मोहिमा मुंबईत बसून मॉनिटर करणे, हे सगळं पण भारी आहे. त्यातलं पोलिसी जार्गन (उदा. क्लीन पिक-अप) वगैरेमुळे थ्रिलर सिनेमे पाहत असल्यासारखं वाटतं. प्रत्येक मोहिमेतले त्यांचे ज्युनिअर सहकारी, कुणाची काय खासीयत होती, क्राइम डिटेक्शनसाठी खबर्यांचं जाळं कसं महत्वाचं असतं, हे सगळं त्यांनी खूप छान लिहिलं आहे. (खबर्यांचं विस्तृत आणि बारकाईने रचलेलं जाळं यासाठी ...