पुस्तक परिचय : Paper Moon (Rehana Munir)

फिजा नावाची मध्यमवर्गीय कॉलेज तरुणी, एकुलती एक, आईबरोबर मुंबईत राहत असते. एक बॉयफ्रेन्ड, ५ वर्षं स्टेडी असलेला. उच्चभ्रू, हिंदू. त्याच्या घरच्यांना ही पसंत असते. पण तो प्रपोज करतो तेव्हा मात्र ती आधी उत्तर टाळते, नंतर नाही म्हणते. (त्याचं नीटसं कारण पुस्तकात स्पष्ट होता होता राहिलंय असं वाटतं.) फिजाचे वडील तिच्या लहानपणीच घर सोडून गेलेले. (त्याचं कारणही स्टोरीत नीटसं कळत नाही.) त्यामुळे वडिलांबद्दल तिला थोडंफार कुतूहल असलं तरी ती त्यांच्या विचाराने फार ऑब्सेस्ड किंवा नाराज वगैरे नसते. वडिलांचा मृत्यू होतो. इच्छापत्रात त्यांनी फिजासाठी थोडीफार रक्कम ठेवलेली असते. त्या रकमेतून तिनं एक पुस्तकांचं दुकान काढावं अशी त्यांची इच्छा असते. इथे तिला वडिलांशी काहीतरी कनेक्शन आहे असं जाणवायला लागतं. कारण एकतर त्यांनी तिची आठवण ठेवलेली असते, आणि तिलाही वडिलांप्रमाणे पुस्तकांची खूप आवड असते. हो-नाही करता करता ती तिच्याही नकळत पुस्तकांच्या दुकानाचा विचार करायला लागते. इथपर्यंत कथानकाची बैठक बर्यापैकी जमली आहे. पुस्तकांच्या दुकानाच्या निमित्ताने, ते ही मुंबईत, काहीतरी वेगळं, इंटरेस्टिंग...