न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)
  न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!!      न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच!   न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा    ----------    ‘नेचर अँड पार्क्स’ थीम ठरवून टूरचं प्लॅनिंग करत असताना ‘काय करायचं  नाही’ ते डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे, एखादा बीच-वॉक, एखादा जंगल-ट्रेल  करायला मिळाला तरी भरून पावलो, अशी भावना होती. कारण, करायचं नाही असं  ठरवलेलं खरंच न केल्याचा आनंद अधिक होणार होता. प्रत्यक्षात या टूरमध्ये  आम्ही ११ वॉक्स/ट्रेल्स करू शकलो; आणि त्यांपैकी तब्बल ७ मूळ प्लॅनमध्ये  नसलेले, उत्स्फूर्तपणे/ऐनवेळी ठरवून केलेले होते. त्यांतल्या सर्वात  आवडलेल्या अनुभवापासून सुरूवात करते...    ते-पुईयाची चार-एक तासांची ‘जिओथर्मल’ रपेट करून जस्ट बाहेर पडलो होतो.  तिथून आमचं हॉटेल तसं फार लांब नव्हतं; पण येताना टॅक्सीनं आलो होतो हे  कारण काढून टॅक्सीनंच परत जायचं ठरवलं. रस्त्यापर्यंत जाऊन पाहिलं तर  टॅक्सी-स्टँड वगैरे कुठे दृष्टीक्षेपात आलं नाही. येताना वाटेतही तसं काही  दिसलं नव्हतं. मग सरळ तिथल्या रिसेप्शन डेस्ककडे गेले. तिथे आम्हाला दुपारी  माओरी-सैर करवणारी बाई बसलेली होती. तिला म्हटलं, ...