मोसाद : इस्त्राएली गुप्तचर मोहिमांचा थरार

मध्यंतरी जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून MOSSAD : The Greatest Missions of the Israeli Secret Services हे पुस्तक घेतलं. लेखक मायकेल बार-झोहार आणि निसिम मिशाल. पुस्तक एकदम ‘स्पाय-थ्रिलर’ प्रकारचं आहे. मला या प्रकारची पुस्तकं आवडतात. Munich आणि The House on Garibaldi Street या सिनेमांमुळे हे पुस्तक वाचण्याआधी मला मोसादच्या त्या दोन मोहिमा तेवढ्या माहिती होत्या. पुस्तकातलं सर्वात उत्कंठावर्धक आणि थरारक प्रकरण म्हणजे हीच अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्स शहरातल्या गॅरीबाल्डी स्ट्रीटवरच्या घरातून अडॉल्फ आईकमनला ‘उचलण्या’ची कथा. आईकमनला ताब्यात घेणे हे जितकं महत्त्वाचं होतं , तितकंच त्याला अर्जेंटिनातून बेमालूम बाहेर काढणे गरजेचं होतं. ती मोहिम मोसादनं ज्या प्रकारे आखली आणि पार पाडली त्याला तोड नाही. ही कथा वाचत असताना आईकमनपर्यंत मोसादचे एजन्ट्स पोहोचतात कसे याकडेच आपलं लक्ष केंद्रित झालेलं असतं. त्यालाच जोडून मोसाद प्रमुखांनी आईकमनला अर्जेंटिनातून बाहेर काढण्याच्या खास पुरवणी योजनेवरही विचार केलेला होता. ती योजना आपल्यासमोर येते तेव्हा आश्चर्यानं तोंडात बोटं घालाविशी वाटतात. आईकमन ...