कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ....
’क’ या अक्षरापासून सुरू होणारे ’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हे वाक्य सर्वांना माहितीच आहे. अशीच इतर अक्षरांपासून सुरू होणारी ही काही वाक्ये. ( यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही .) ’अ’ : ओगलेवाडीचा आमदार आबाजी एकतारे उगीचच आमच्यावर ओरडत असतो. ’ख’ : खत्रूड खालिद खसखस खाता-खाता खाविंदांवर खेकसला. ’ग’ : गाणगापूरचा गोल गुळगुळीत गोटा गंगापूरच्या गाडीतून गडगडत गेला. ’घ’ : घनघोर घोरणाऱ्या घारपुऱ्यांच्या घरात घुबडे घुसली. ’च’ : चलाख चिरागने चाफेकरांच्या चपला चोरणाऱ्या चंदूला चिंचेखाली चोपले. ’छ’ : छे! छगनरावांची छोटी छकुली छळ-छळ छळते! ’ज’ : जाड जीवन जमनीस जीर्ण जानोरीकरांकडे जरूरीपेक्षा जरा जास्तच जेवला. ’झ’ : झुडुपामागे झोपलेल्या झगेवाल्या झीनतला झिपऱ्या झरिनाने झाडूने झोडपले. ’ट’ : टुकार टारझनने टारगट टोणप्यांना टेकडीवर टाचणी टोचली. ’ठ’ : ठेंगण्या ठुसक्या ठमी ठोसरला ठोमणेने ठणकावले. ’ड’ : डावखुऱ्या डबूने डुगडुगणाऱ्या डब्यात डासांना डांबले. ’ढ’ : ...