पुस्तक परिचय : तडा (कथासंग्रह, ले. गणेश मतकरी)
अनुभव अंकात मतकरींच्या ’बिनशेवटाच्या गोष्टी’ वाचल्या तेव्हापासून मी त्यांच्या कथालेखनाची फॅन आहे. (या गोष्टींचं नंतर पुस्तक झालं- ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’. ते २-३ वर्षांच्या अंतराने दोनवेळा वाचलं. पुन्हाही कधीतरी वाचू शकते.) त्यानंतर ‘इन्स्टॉलेशन्स’, ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हे त्यांचे कथासंग्रह वाचले. नुकतंच प्रकाशित झालेलं त्यांचं पुस्तक ’तडा’. या कथासंग्रहातल्या दोन कथा मला सर्वात आवडल्या. एक शीर्षककथा ’तडा’, त्यापेक्षाही आवडली ती ’ओळख’ कथा. ‘ओळख’ कथेत आपल्याकडचा एक ज्वलंत सामाजिक मुद्दा ज्या प्रकारे गोवलेला आहे ते मला फार आवडलं. एक-दोन कथा जरा ताणलेल्या/पाणी घातलेल्या वाटल्या. कोणती कथा आवडेल हे जरासं व्यक्तीसापेक्ष असू शकतं. त्यामुळे मुद्दा तो नाही. मतकरी ज्या perspective मधून कोणतीही कथा सुरू करतात आणि पुढे उलगडत नेतात ते note करण्यात मजा येते. टिपिकली कथेत ’पुढे काय होणार?’ किंवा ’शेवटी काय होणार?’ ही वाचकांना उत्सुकता असते, (किंवा तशी असणं अपेक्षित असतं.) पण मतकरींच्या कथांमध्ये destination पेक्षा journey जास्त इंटरेस्टिंग असते. कथांचा जर्म नंतर मनात summarize करायलाही ...