पुस्तक परिचय : विश्वामित्र सिण्ड्रोम (पंकज भोसले)

विश्वामित्र सिण्ड्रोम (पंकज भोसले) ९० च्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणानंतर आपल्याकडच्या शहरी भागांमध्ये झपाट्यानं बदल व्हायला लागले. नवनवी टीव्ही चॅनल्स, इंटरनेट कॅफे यांच्यामार्फत आधी कधीही न पाहिलेलं एक जग लोकांच्या घरात पोहोचलं. एम-टीव्ही, चॅनल-व्ही यांचाही यात मोठा हात होता. परदेशी पॉप गायकगायिका, त्यांचे म्युझिक व्हिडिओज, त्यातली फॅशन या सगळ्याचं विशेषतः तरुणांना वेड लागलं. पुढे अनेक घरांमध्ये PC दिसायला लागले. वॉकमन्स, मोबाइल फोन्स, CDs ची देवाणघेवाण हे पाठोपाठ होतंच. त्यातूनच पॉर्नोग्राफी बघण्याच्या व्यसनाने शिरकाव केला. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ पुस्तकात हा सगळा काळ येतो. त्यातही केंद्रस्थानी हे पॉर्न बघण्याचं व्यसन आहे. त्याला केंद्रस्थानी ठेवण्याचा आपला उद्देश लेखकानं प्रस्तावनेत स्पष्ट केला आहे. ठाण्यातल्या मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या एका आळीत घडणारी ही कथानकं आहेत. पहिल्या एक-दोन कथांमध्ये त्या आळीचा tone प्रस्थापित होतो. लेखकानं स्वतः ते जग तेव्हा पाहिलेलं आहे. तिथल्या तरुणाईचा तो सुद्धा एक भाग होता. त्या प्रवाहात ओढला जातानाच अनेक बारीकसारीक गोष्टी त्याच्या मनात...