न्यूझीलंड-६ : किवी क्रिकेट ग्राऊंड्स
न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला) न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २) ---------- न्यूझीलंड टूरच्या आधीच्या आठवड्यात टीव्हीवर रॉस टेलरचे इंग्रजी उच्चार समजून घेण्याचा प्रयत्न केला होता; तरी त्या देशात फिरताना खास क्रिकेट थीम मनात धरून फिरावं, बघावं असं काही निघताना डोक्यात नव्हतं. तिथे पहिल्याच दिवशी पाहियाच्या समुद्रकिनार्यावर (Horotutu Beach) भटकताना ही एक पाटी दिसली आणि तो धागा लक्षात आला. -- ज्ञात माहितीनुसार न्यूझीलंडमध्ये १८३२ साली पहिला किकेट सामना खेळला गेला. सामन्याची जागा त्या पाटीच्या आसपास कुठेतरी असावी असं त्यात लिहिलेलं होतं. हा फोटो काढला तिथे आता व्यवस्थित डांबरी रस्ता आहे. समोर समुद्र. म्हणजे रस्त्याच्या दुसर्या बाजूला ते ठिकाण असावं असा आम्ही अंदाज बांधला. आता त्या बाजूला घरं, हॉटेलं वगैरे आहेत. पाहियात क्रिकेटचा उल्लेख अन्यत्र कुठे दिसला नाही. पुढे रोटोरुआतही तसंच. शिवाय...