‘ब्रेक्झिट’, ‘इटलीव्ह’च्या पाठोपाठ...
जर्मनीघ !! फ्रान्सटक !! हंगरीजा !! हे काय आहे ? कसल्या घोषणा ? नाही. हे आहेत मराठी भाषेला बहाल होऊ शकणारे काही नवे शब्द. काय आहे , की दरवर्षी ऑक्सफर्ड शब्दकोशातर्फे इंग्रजी भाषेत नव्याने दाखल झालेल्या शब्दांची यादी जाहीर केली जाते. त्या यादीतले शब्द वाचून कधीकधी अवाक व्हायला होतं. इंग्रजी भाषेचं कौतुक वाटतं. मराठीतही अशी फ्लेक्झिबिलिटी हवी असं वाटून जातं! वरचे तीन शब्द म्हणजे त्याच जाणीवेचा स्वतःपुरता एक छोटासा हुंकार म्हणता येईल. (शेवटी व्यापक बदलांची सुरूवात अशी वैयक्तिक पातळीवरूनच व्हायला हवी.) तर या शब्दांच्या ‘ मेकिंग ’ बद्दल... २०१६ मधला एक गाजलेला इंग्रजी शब्द म्हणजे ‘ ब्रेक्झिट ’. गंमत बघा , ‘ ब्रेक्झिट ’ च्याच जोडीने मैदानात उतरलेल्या ‘ ब्रेमेन ’ शब्दाला हे वलय लाभलं नाही. ग्रेट ब्रिटनच्या सार्वमतात ब्रेमेनवाल्यांना बहुमत मिळालं असतं तरीही ब्रेक्झिट हा शब्दच शर्यत जिंकला असता हे नक्की. या ब्रेक्झिटबद्दल ऐकलं , थोडंफार वाचलं ; आणि मग मी एका जबाबदार (परदेशी) नागरिकाच्या भूमिकेतून ब्रिटनमधल्या दोघा मित्रमंडळींशी त्यावर माफक चर्चा केली. त्यातला एक ब्रेक्झिटच्या बाज...